Skip to main content

दुष्काळी शेतकऱ्याचे मनोगत ...

लेखक अमितसांगली यांनी सोमवार, 21/05/2012 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
भिखेची तिजोरी, पैशाचा तुटवडा जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... निसर्गाची साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही, थकलेल्या हातांनी या, करू कसा सामना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... उसालाही दर नाही, कापसालाही भाव नाही, दोन वेळच्या अन्नाची पण, सोय काही होत नाही, हरलेल्या जीवाचा या, प्राण काही जाईना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... प्याकेजच्या नावाखाली केला विकासाचा भास, मतांचे राजकारणच फक्त, यांच्यासाठी खास जीवघेण्या या राज्यात, कोंडतोय माझा श्वास, नाही राहिली आता मला, कशाचीच आस, दारिद्र्याचे चटके आता, काही केल्या सोसेना, जीव घे रे
काव्यरस

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह

लेखक यकु यांनी रविवार, 20/05/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले.

रेघोटया

लेखक रेशा यांनी रविवार, 20/05/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका मित्राशी chat करत असताना तो म्हणाला की "nothing is permanant , मित्र - मैत्रिणी, नाती, त्यांचे संदर्भ सगळच बदलतं जातं, गरजेच्या वेळी आपले आपले म्हणशील ते मित्र-मैत्रिणी जवळ असतीलच असे नाही. म्हणजे ते स्वार्थी आहेत असेही माझे म्हणणे नाही, पण... वेळ, काळ, busy schedule या सगळ्यात ते तुझ्या बरोबरच असतीलच असेही नाही." मी म्हटले, " असे कसे ?

'मुंबई' कट्टा १९ मे २०१२

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 20/05/2012 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
१९ मे की २० मे यावर यथासांग काथ्याकूट होऊन १९ मे रोजी कट्टा (एकदाचा) ठरला. ठाणे मुंबईत आहे का नाही इ. इ. प्रश्न उद्भवू नयेत याची खबरदारी म्हणून परळ (हुच्चभ्रूंनी "अप्पर वरळी" असे वाचावे) येथील "व्हेज ऑलवेज" ही जागा ठरवण्यात आली (धन्स टू प्रासभौ). नेमके याच नावाचे एक हॉटेल के.ई.एम.समोर (परळ - ईस्ट) येथे असल्याने माझा गोंधळ झालाच. मग अमोल खरे, वि.मे. यांच्या 'मार्ग'दर्शनानंतर योग्य जागी पोहोचलो. मी येईपर्यंत हॉटेलच्या आवारात खुर्च्या मांडून अमोल खरे, स्पा, चचा, सौरभ उप्स, जयपाल, प्रास, पुष्कर, विमे यांची गप्पांची मैफल रंगली होतीच. थोड्याच वेळात मस्त कलंदर - निखिल देशपांडे जोडीचेही आगमन झाले.

निःशब्द तळ्याच्या काठी

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 19/05/2012 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
निःशब्द तळ्याच्या काठी, रात्रीचे चांदणे झुलते नि:संग फकिरी अवघी, मग कवितेसाठी झुरते... १ नादास मोह शब्दांचे, शब्दास शाप अर्थांचे मौनाच्या देहावरती, गाण्याचे गोंदण होते.... २ रात्रीस वेध दिवसांचे, दिवसास कूस रात्रीची सजणीचा उसवता श्वास, दिवसाचे सार्थक होते... ३ श्वासास तडे मृत्यूचे, मृत्यूत नभाशी संग मिसळता मीच माझ्यात, श्वासात कस्तुरी भिनते... ४ उःशाप विषादावरचा आकाश सांगूनी गेले भेदून व्यूह मन सगळे कृष्णा सामोरे जाते....५ तुज उशीर झाला सजणे, शब्दांच्या तुटल्या तारा देहात भिनूनी आता, निर्वाण प्रतीक्षा करते.... ६

दिल्लीवाली दाल फ्राय

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 19/05/2012 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
खालील पाककृती शिरीन अनवर ह्यांची आहे :) साहित्यः १ कप चण्याची डाळ १/२ कप तूरीची डाळ १ टेस्पून कसूरी मेथी १/२ टीस्पून हळद १/४ टेस्पून हींग वरील सर्व साहित्य प्रेशर कुकरला लावून ७-८ शिट्ट्या काढून शिजवून घेणे मसाल्याचे साहित्यः १ छोटा कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेला १ टीस्पून बारीक चिरलेला लसूण १/२ टीस्पून बारीक चिरलेले आले २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या कढीपत्ता काही पाने २-३ टेस्पून साजूक तूप (तेवढे लागतेच ;)) १ टीस्पून जीरे १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून गर

सिंड्रेला

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 19/05/2012 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसात मॅक्रो काढला नव्हता. तसे फुलाचे मॅक्रो काढायचा कंटाळा आला होता. तेवढ्यात एका मित्राच्या किचेनमधे हा काचेचा छोटा बूट दिसला. त्याला म्हटले देतोस का हा एक दिवस ? घेतला आणि काही फोटो काढले...त्यातील हा एक... फोटोला नाव दिले आहे "सिंड्रेलाच्या बेड्या". श्री. जयपाल यांनी picsizer हे सॉफ्टवेअर सुचवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. यात फोटो अजिबात खराब होत नाही. उदा. वरील चित्र १४ mb चे आणि आता आहे ९० kb चे.