Skip to main content

सहज सुचलं म्हणून

लेखक अन्तु बर्वा यांनी रविवार, 03/06/2012 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुलंचं व्यक्ती आणी वल्ली वाचतोय. कितव्यांदा? माहीत नाही, खरच. पुलं वाचतो, भीमसेन ऐकतो नेहमी. आणी कधी कधी वाटून जातं- आपण कालचक्रातील एक चुक ठरलो आहोत. आम्हाला ना पुलं ना प्रत्यक्ष अनुभवता आलं ना भीमसेन जोशींच्या मेहेफीलीं मधे दैवी सुरांच्या पावसात भिजता आलं. आपला सभोवताल किती बिघडलाय. काहीही चांगलं किती दुर्मिळ झालय. जगण्याच्या 'बेसिक नीड्स' पूर्ण करण्यातच आम्ही इतके दमतोय की साधं पुस्तक वाचण्यासाठी 'वीकेंड' ची वाट बघावी लागते. पर्याय मिळाला तर कधीही सवाई मधले भीमसेन, निवेदक पुलं निवडीन. एफबी, मोबाइल पेक्षा.

१. शाफहाउसन

लेखक दादा कोंडके यांनी रविवार, 03/06/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्याखाली रोममध्ये जायचं होतं म्हणून आंतरजालावर मराठी काही माहिती आहे का ते शोधत होतो. अपेक्षेप्रमाणे एक-दोन ब्लॉग तेही युरोप पर्यटनावर सोडले तर काहिच मिळालं नाही. दुसरं म्हणजे पुर्वी जाउन आलेल्या ठिकाणाबद्दल कुणी काही माहिती विचारली तर फोटो सोडले तर माझ्याजवळ काहीच नसतं. मग ठरवलं की आपल्या संदर्भासाठी आणि आठवणीसाठी (इमोशनल कॉलबॅक, यु नो! :)) प्रवासवर्णनं लिहुन ठेवायची. आता लिहिलंच आहे तर मिपावर टाका म्हणून टाकतोय. :) १. शाफहाउसन खूप दिवस कुठे फिरायला गेलो नव्हतो, त्यामुळे ह्या विकांताला कुठेतरी जायचं ठरवलं. जवळपासची सगळी ठिकाणं फिरून झाली होती.

काय चुकतंय ?

लेखक वैशाली . यांनी रविवार, 03/06/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
हि कायाच नकोशी झालीये आता.. वाटतंय सगळी काढून टाकावी ह्या मनावरून.. तसंच हे आयुष्य!! ह्यात नेमका कसूर तो कुणाचा ?? आज काढला राग त्या आईन्यावर.. माझी मीच नावडले मला.. आज परत वाटून गेलं.. कि काहीतरी चुकतंय..

कुछ मीठा हो जाय..

लेखक गवि यांनी रविवार, 03/06/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
गोड खाण्याचं टेम्प्टेशन एकदा का झालं की ते जाम जोरात होतं. सध्या अधूनमधून खाण्यावर कंट्रोल ठेवण्याचं भूत मानगुटीवर बसत असल्यामुळे गोडाशी संबंध संपल्यात जमा आहे. हो.. मोडायचाच निग्रह तर मासेमटणासाठी मोडावा, गोडासाठी नको.. पण आज पोराचा बालहट्ट झाला.. मुळात झालं असं होतं की मी माझ्या शाळकरी वयात रुचिराकृपेने एक चॉकलेटची पाककृती करायचो. ती एकदम जमून गेली होती. माझे बाबा मी बनवलेल्या चॉकलेटचं ताट रिकामं करुन टाकायचे. मग माझी कॉलर ताठ. बाबा गेल्यावर बरीच वर्षं, बरीच म्हणजे वीसेक वर्षं हे बनवलंच नाही. मग मलाच पोरगं झालं तेव्हा बनवलं.

मराठीतील भाषा सौंदर्य.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 03/06/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/21806 " दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या त-हा" या लेखावरील माझी प्रतिक्रिया म्हणून आणि आंतर्जालातील इकडून तिकडून आलेले खालील इ पत्र. मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी-नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला; मग मराठीचा गंध कसाअसणार? थोडं शिकवल्यावर मी तिला कही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले.तीन चार शब्दांचे अर्थ सगितले. शेवटचा शब्द होता-- लाव/लावणे. मी तिला म्हटलं, 'अगं, वाक्य लिहूनआणायचंस,नुसता अर्थ कसा सांगू?

मेसोअमेरिका(४.१) – माया ( Mysterious Mayans)

लेखक किलमाऊस्की यांनी शनिवार, 02/06/2012 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People) जगाच्या पाठीवर एकाच वेळी ठिकठीकाणी अनेक संस्कृती नांदल्या, बहरल्या. काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही आपला वारसा पुढच्या पिढीला देऊन लुप्त झाल्या. मेसोअमेरीकेच्या इतिहासातील माया संस्कृती ही अशीच एक. ‘२०१२ - जगाचा अंत – माया कॅलेंडर“ या तीन गोष्टींच्या परस्पर संबंधामुळे आजच्या जगाला माहित असलेली. बरीचशी गूढ आणि रहस्यमय अनेक दंतकथांमधून अजरामर झालेली. युरोपात रोमन साम्राज्य लयास जात असताना जगाच्या दुसर्‍या टोकाला अमेरीका खंडात प्रगत “माया” संस्कृती” बहरास येत होती.

(कोणत्या मिपापटुला मिपारत्न द्यावे?)

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 02/06/2012 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्या मिपापटुला "मिपारत्न" द्यावे? हा काथ्या कुटताना कामगिरी मधील सातत्य लक्षात घ्यावे. उगाच गेले नउ महीने काहीही लिहीले नाही आणि एखाद दुसरा प्रतिसाद देणार्‍या ना ह्या उपाधी साठी लक्षात घेउ नये. उपाधी देताना "का"? ची चर्चा अपेक्षित.