उत्तर सांगा...
माझे नाव स्थिरबुद्धी. मी जंबूकाचार्यांचा शिष्य. अनाथ सापडलेल्या माझे संगोपन व शिक्षण जंबूकाचार्यांनी केले. अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा देताना आचार्य मला म्हणाले, 'स्थिरबुद्धी. तुला स्वतःचे कुणी नाही. मलाही मेधा या एकुलत्या एक मुलीखेरीज कुणी नाही. तू मेधाशी परिणय करुन हे गुरुकुल चालवावेस असे मला वाटते.'
त्यावर मी म्हणालो, 'गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो.
मिसळपाव