Skip to main content

अनपेक्षित ..

लेखक विदेश
Published on शुक्रवार, 13/07/2012
. काहीतरी चांगल पोस्ट करायला जातो, नेमकी एरर समोर येते आणि आपण काहीतरी करण्याआधीच पोस्ट अपडेट होते .. अनपेक्षित पेचातून सुटका ! पोस्टला कुणी लाईक केले आहे का पहातो, तो पोस्टला चार शेअर दिसतात .. अनपेक्षित आनंदाचा झटका ! रस्त्यातून जाताना पुढच्यास ठेच- म्हणून शहाणा व्हायला जातो, तर आपल्याला ठेचच लागत नाही तर आपण नेमके समोरच्या खड्ड्यात पडतो .. अनपेक्षित शहाणपणापणाला फटका ! वाहतुकीचा सिग्नल तोडून पुढचे दोघे भरधाव निघाले की, आपणही 'प्रयत्न' करायला जातो आणि नेमके 'त्या'च्या तावडीत सापडतो .. अनपेक्षित प्रयत्न लटका ! बायकोला फोन करून खूष करण्यासाठी सिनेमाची तिकीटे घेऊन गेल्यावर, समोरच घरात पाहुणे आलेले दिसतात .. अनपेक्षित बायकोशी उडणारा अबोल्याचा खटका ! जमा झालेले मासिक वेतनच पाहायला जातो, तेव्हां अचानक कसलातरी जुना फरक जमा झालेला दिसतो .. अनपेक्षित लागलेला मटका ! ह्या आणि असल्या अनपेक्षितपणाने आयुष्यात घडणाऱ्या घटनामुळे तर जीवन सुसह्य अथवा असह्य होते .. जगणे जगणे म्हणतात, ते असल्या झटक्या-फटक्यांमुळे तर जगावे वाटते. .. नाहीतर जीवन नीरसच ! पटतंय का ? .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2708
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त लिहिले आहे..

मस्त.
अनपेक्षित बायकोशी उडणारा अबोल्याचा खटका
म्हंजे काय हो?

अनपेक्षित विचाराने छान लिहिणे.... ----विचाराचा झटका....

अशा कविता चेपूवरच टाकत चला. इकडे काय सद्दी नाय अशा कवितांची.

अशा कविता चेपूवरच टाकत चला. इकडे काय सद्दी नाय अशा कवितांची. सुन्दर दोनोळी. ('कविता' असती , तर ती मी नक्कीच ' जे न देखे ..' मधे टाकली असती . ज्याअर्थी 'जनातल मनातल' मधे लिखाण टाकल आहे ..... सूज्ञास अधिक ...)