मित्रहो,
आपण भारतीय विज्ञानाचा अभ्यास करतो, पण तो डॉक्टर किव्हा इंजिनिअर होण्याकरिता कधी वैज्ञानिक बनण्याचा विचारही आपण करत नाहीत. वैज्ञानिक बनण्यासाठी विज्ञानाचे मुळापासून संशोधन करणे गरजेचे असते. वैज्ञानिक तयार करणारी ही एक अनोखी मुलाखत.
भाग-१
मुलाखत
सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार जर एखादी वस्तू मोठ्या पिंडाच्या भोवती फिरत असेल तर त्यावस्तूसाठी वेळ हा हळू होतो.पण मला कळत नाही,दुपारच्या वेळेला आपण कोणत्या पिंडाच्या भोवती फिरत असतो? दुपारचा वेळ म्हणजे तीन घंटे एका घंट्या समान. सवंगडी मस्त झोप घेत होते. मला काही केल्या झोप येत नव्ह्ती.कसातरी वेळ घालवावा म्हणून खालच्या मजल्यावरच्या टी.व्ही. रूममध्ये आलो. टी.व्ही. बंद होता. टी.व्ही. चालू करून चैनल पाहिले, काही मराठी- हिंदी चैनल पहिल्यानंतर इंग्लिश चैनल सुरु झाले.त्यामध्ये एका चैनलवर सूत्रधार मोठ्या आवाजात ओरडत होता.
"अमेरिकेच्या इतिहासातील अनोखा वैज्ञानिक सर रिचर्ड फेन्मन ह्यांची प्रसिद्ध मुलाखत पुन्;प्रक्षेपित केली जाणार आहे."
सुत्राधारच्या म्हणण्यानुसार कार्याकार्मची वेळ दुपारी २ ते ३ अशी होती म्हणजे आजून अर्धा घंटा बाकी होता. त्या कार्यक्रमाची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो कारण मी रिचर्ड पी. फेन्मन ह्यांच्या बद्दल खूप काही वाचले होते. त्यांची भौतिकशास्त्राची पुस्तके म्हणजे विज्ञानातील ज्ञानेश्वरीच. खूप साध्या व सोप्या भाषेत विज्ञान शिकता आणि मांडता येते,हे त्यांची पुस्तके वाचणारा कोणीही छाती ठोकपणे म्हणू शकेल. पदवीत्तर शिक्षण घेत असताना त्यांना मान्हात्तन इथे बोलावण्यात आले. मान्हात्तन (लोस अल्मोस) हे काय आहे? हा साहजिकच पडणारा प्रश्न. जपानचे दोन शहरे अमेरिकेच्या अणुबॉम्बने उधवस्त केले, ते अणुबॉम्ब कोठे बनले असावे? तर ते बॉम्ब लॉस अल्मोस ह्या शहरात बनले आणि त्या प्रकल्पाला मान्हात्तन प्रकल्प म्हणून देखील ओळखले जाते.
आपल्या देशात सर डॉ. होमी भाभा हे जे व्यक्तिमत्व आहे, ते खरच खूप पूजनीय आहे. जर भाभा दुसर्या महायुद्धानंतर भारतात आले नसते तर कदाचित आपण विज्ञान विकासात आणखीन पन्नास वर्षे माघे गेलो असतो. भारतासाठी अणुबॉम्ब बनवून त्यांनी आपल्याला स्वयंपुर्ण बनवले. असेच काही घडले लॉस अल्मोस येथे.
एका अणूमध्ये अफाट उर्जा सामावली आहे,हे दोन जर्मन केमिस्टला सर्वप्रथम समजले, ते होते ऑटो हॉन आणि फ्रित्झ स्तोस्स्मान. हा प्रयोग दुसर्या महायुद्धाच्या सुरवातीला झाला.पण ह्यामध्ये एक अडथळा होता,तो म्हणजे युरानिअम ज्या अणु पासून ही उर्जा मिळणार होती, तो अणु निसर्गतः उपलब्ध नव्हता. युरानिमच्या दुसर्या संयुगापासून त्याला वेगळा कसा करायचे? ह्यासाठी इंग्लड,जर्मनी आणि अमेरिकेचे वैज्ञानिक कामाला लागले. ज्याच्याकडे तंत्रज्ञान त्याकडे जगाची सत्ता जाणार, हे उकल असलेले समीकरण बनले होते. युद्ध परिस्थिती पाहता इंग्लडला स्वतःचे असे शस्त्र बनवणे संभव नव्हते.म्हणून इंग्लंडचा वैज्ञानिक ताफा अमेरिकेची मदत करू लागला. अमेरिकेची ताकद वाढणार होती कारण ब्रिटीश वैज्ञानिक अनुविज्ञानात प्रसिद्ध होते. अमेरिकेसाठी जगप्रसिद्ध वैज्ञानिक ओपनहेमर, नेता बनून प्रकल्पाची दिशा ठरवत होता. ह्याच ओपनहेमरनी फेन्मन ह्यांना प्रकल्पावर काम करण्यासाठी बोलाविले.
तिकडे जर्मनीचे नेतृत्व हेईसेन्बेर्ग ह्या अणुवैज्ञानिकाकडे होते. त्याने जर्मन लोकांसाठी शस्त्र बनवावे ही तेथील लोकांची रास्त अपेक्षा. जर्मन शास्त्रज्ञ झपाट्याने प्रयोग करत होते. युद्धाच्या पहिल्या एक वर्षात जर्मन अणुबॉम्ब बनवतील असे चित्र तयार झाले होते, पण अमेरिकेला सर्वप्रथम यश आले.नंतर जे झाले ते सर्व जग जाणते. जपानची दोन्ही शहरे पूर्णपणे नेस्तनाबूत झाली.
युद्धानंतर जर्मन वैज्ञानिकवर आभाळ कोसळले. सर्व देशांनी जर्मन वैज्ञानिकचे विसा नाकारले, ज्यांनी हिटलर सारख्या खलनायकाला मदत केली अश्या वैज्ञानिकाना आपल्या देशात थारा नाही. हेईसेन्बेर्ग आणि स्चोदिन्गेर ह्या परिस्तिथीमुळे फार दुखावले. ही परिस्तिथी सुधारण्यासाठी एक वैज्ञानिक पुढे आला तो होता इंग्लिश शास्त्रज्ञ पॉल डीराक,त्याच्यामते हेईसेन्बेर्गने जे केले ते योग्यच होते कारण, "लोकशाहीमध्ये महान बनणे सोपे असते हुकुमशाहीमध्ये नाही." ह्या वक्त्याव्यावर एका वाहिनेने त्यांना उलट प्रश्न केला " पण ह्यांनी हिटलरला मदत केली त्याचे काय?" ह्या प्रश्नाला चोख व सडेतोड उत्तर देऊन डीराकने मानवतेची उंच इमारतच बांधली. “काही शतकानंतर लोक हिटलरला विसरतील पण हेइसेन्बेर्गला नाही, त्याच्या कार्याला नाही."
कार्यक्रमाला पाच मिनिटे बाकी होती जाहिरातीचा भडीमार चालू होता. तेवढ्यात टी.व्ही. रूम मध्ये दोन-तीन मुले आली. आमच्याच विंगची होती.
'अरे महावीर,स्टारगोल्डवर हम दिल दे चुके सनम येत आहे, ते लाव ना. माझी आवडती मूव्ही आहे.'
'अरे खूप महत्वाचा कार्यक्रम सुरु होणार आहे, प्लीज मला तो पाहू द्या. मी तुला त्या मूव्हीची सीडी आणून देतो. पण आता मला हा कार्यक्रम पाहू दे. ' मी म्हणालो.
'ठीक आहे रे, पण सीडीचे तेवढे लक्षात ठेव म्हणजे झाले.'
'हो नक्की आणतो.'
सर्वजण आनंदात निघून गेले. पण इकडे कार्यक्रम सुरु होऊन पाच मिनिटे झाली. फेन्मन ह्यांच्या कार्याचा आढावा घेणारा माहितीपट दाखवला गेला होता. तो भाग,मी पाहू शकलो नाही,ह्याचे खूप दुखः वाटत होते.
(मुख्य मुलाखत सुरु होते.)
वाचने
2606
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्सुकता चाळवली गेली आहे...
लेख आवडला
??
In reply to लेख आवडला by रामपुरी
हे हे हे हे
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
अणुबाँब म्हटले की...
मस्त सुरुवात, क्रमशः टाकायचे
आमची इतिहासाची गोडी...