प्रबळ ट्रबल
शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता.
कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय
डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड .
शेवटी प्रबळगडावर शिक्का मोर्तब झाले , आणि सर्वांना फोनवून सांगितले. शनिवारी भल्या पहाटे बाईक काढली , सौरभ आलेलाच होता .. मी सौरभ हर्शल आणि सिद्धू असे चौघ निघालो.. किसन पनवेलला भेटणार होता .. गणेशाने आयत्यावेळी टूल्ली दिली .
मिसळपाव


हिंदुस्थानचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य समरातील पाउल होते राणी लक्ष्मीचे आणि १९४३ मध्ये आजाद हिंद ने केलेल्या इंग्रजी साम्राज्यावरील लत्ताप्रहारात पाउल होते ते झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी यांचे.
हिंदुस्थानातील स्त्रीचे तेजस्वी रुप जगाला दाखविणारी आजाद हिंद सेनेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी आज हरपल्या.