बर्याच दिवसांची सुट्टी मिळवण्यात चक्क यशस्वी झालो आणि एका आठवडाभराची सुट्टी घेऊन पुण्याला आलो. चेन्नैच्या उष्णदमट हवामानाला भयंकर वैतागलो असल्यामुळे पुण्यात आल्यावर ढगाळ आणि थंड वातावरणात एकदम दिल खुष झाला. कुठेतरी जवळच्याच शांत समुद्रकिनारी मुक्कामी जाऊन आराम करायचा बेत होता, जास्त ड्राइव्ह करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या मुरुड-जंजिरा येथे जायचा प्लान बनवला.
मागे एकदा मित्रांबरोबर मुरुड-जंजिरा, व्हाया अलिबाग, केले होते. त्यावेळी अलिबागला हॉटेल पतंग मध्ये भयंकर टेस्टी मासे खाल्ले होते, खासकरून 'तिसर्या मसाला'.