Skip to main content

<बद्ध लेखक>

लेखक लंबूटांग यांनी शनिवार, 25/08/2012 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख उत्तरं सोपी कुणा देईचिना आपली ती तंगडी दरवेळी वरती किती पडलो तेही आठवेना टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा रेग्युलरली जिणे काही झेपेचिना वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा डेडलाईनी काही केल्या चुकेचिना एकहार्ट पैसा काल रोब मरून सांगतोय काय नक्की कळेचिना अचाट अध्यात्म, पुचाट विचार जगतो ते लिहितो कोणा पटेचिना उपप्रतिसादी ओशट या जिलब्या लेख झाला जुना तरी संपेचिना वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक आपटली डोकी, तरी थांबेचिना

अजि म्यां ब्रह्म ऐकिले........

लेखक बॅटमॅन यांनी शनिवार, 25/08/2012 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड : शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात. प्रसंग होता २१ सप्टेंबर १९१५ रोजी केसरीवाड्यातील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका गायन समारंभाचा. बालगंधर्व, भास्करबुवा बखले आणि मास्तर कृष्णराव असे एकसे एक डॉन डॉन लोक बोलावले होते, लै गर्दी जमली होती.

कविता आणि स्तोत्रांची आवड

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 24/08/2012 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे. खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही.

(गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व)

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 24/08/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा - http://misalpav.com/node/22536 ही रचना) तर्ककुतर्की खंडनमंडन अभिनिवेशी मतप्रतिपादन चिल्लरसांख्यी बथ्थडगोडी सूज्ञजनांचे अरण्यरूदन छद्मसाधुत्व अतिबोभाटा गुरूपदप्राप्ती आटापीटा आंजासंस्थळ फुकटचव्हाटा सद्वस्तुप्राप्ती घडेना घंटा! निराकाराची धुंद समाधी भ्रांतप्रचिती वृथाउपाधी चित्तदशेची भगेंद्रव्याधी भक्ती साधी, भक्ती साधी .... तळटीपा: साधी - सरळ, सोप्पी, सुसाध्य
काव्यरस

संस्कार

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 24/08/2012 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय. बिल्डिंगमधून मी, माझा ८ वर्षाचा मुलगा आणि त्याची आजी असे बाहेर पडत होतो. मुलगा नेहमीप्रमाणे धावत सर्वात पुढे होता. बाहेर आल्या आल्या त्याला वर्तमान पत्रातून येणारी पत्रकं असतात तसला एक कागद (इथल्याच कुठल्यातरी बिजनेसच्या जाहिरातीचा) पडलेला दिसला. त्याने तो उचलला. मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अंगावर ओरडलो "जमिनीवरचा कचरा कशा उचलतोस?" त्याची आज्जीपण त्याला समजावत म्हणाली "अरे असं जमिनीवर पडलेले कागद तू कशाला उचलतोस?

कातरवेळ..

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 23/08/2012 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीला गच्ची जोडण्याचा आमचाही एक प्रयत्नः आठवांचे सूर, अश्रूंचे पूर, लागे हूरहूर, जीवालागी.. नि:शब्द बोलणे, हळूच ते स्मरणे, अव्यक्त भावना, हृदयात... मनात तू, स्पंदनात तू, जीवघेण्या श्वासात तू, ध्यानीमनी... दिशा सांजावल्या, गोकुळे बहरली, परि एकलेपण, कातरवेळी...!! - सुधीर बागुल, मस्त कलंदर
काव्यरस

दु:खाचे निखारे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 23/08/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले गालावर अमुर्त दु:ख ओघळले कोवळे ना दिशा, ना आकार ना झंकार माहित ओठांत अव्यक्त शब्द अडकले सगळे सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त ना दिशा, ना आकार ना झंकार माहित भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले ------ शब्दमेघ

जुलूस

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 23/08/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते. मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय.