Skip to main content

चिरफाड

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, 16/11/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ्पाव व तत्सम पदार्थ आपल्या खादडीचा भाग आहे. त्यातीलच मिसळ्पाव हा एक पदार्थ तर त्याचे नाव मिसळपाव पडले ते शोधायचा एक आचरट प्रयत्न - मिसळ बरीच व तिखट असल्याने माझ्यासारख्याला एका वेळेला सगळी संपत नाही म्हणून पावच खातो म्हणून असावे का! कि मिसळ तिखट झाल्याने करणार्याचे पाय(हिंदी-पाव) धरावेसे वाटतात म्हणून असावे, नाही मलातर वाटते की पोटात इतर पदार्थांबरोबर पाव मिसळला जातो म्हणूनच असावे . असे आणखी काही 'अनमोल' ! संशोधन असेल तर सांगा. हा प्रकार आपल्या अत्रुप्त आत्म्याला फार आवडतो नक्की लिहा वाट पाहतोय.

माझ्यातली चार अंगे..

लेखक ह भ प यांनी शुक्रवार, 16/11/2012 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण दोन वर्षापुर्वी वाचनात आला हा लेख.. कुठुन आला, कसा आला आठवत नाही.. तेव्हा लिहुन ठेवला होता.. ईंग्रजीतून होता, मी माझ्या कुवतीप्रमाणे मराठीत मांडत आहे.

वर्तुळ

लेखक ह भ प यांनी शुक्रवार, 16/11/2012 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहजपणे तुझे माझ्या जीवनात येणे, घेउन आले माझ्या साठी आनंदाचे लेणे.. वरचेवर आपल्या भेटी आता नित्य होउ लागल्या, तुझ्याच आठवणीत हरएक रात्री जागू लागल्या.. समजुनही उमजत नव्हतं ह्या नात्याला काय म्हणावं, सहजचं तू म्हणाली "ते मैत्रीसारखं असावं.." तितक्याच सहजपणे मी ते नातं स्विकारणं जमणारं नव्हतं मला तुझ्याशी नातं नाकारणं.. गुलमोहोरासवे आपली मैत्रीही बहरली, नकळतपणे तुलाही माझ्या अंतरीची ओढ लागली.. तुही माझ्या सारखीच हरएक रात्र जागू लागली, माझ्याच आठवणीत तू आता कूस बदलू लागली.. आपले नाते ना 'ते' राहिले माझी जीवनसाथी बनुन, "तू एक वर्तुळ पुर्ण केले.." कवीमित्र: अजय शे

धर्म आणि नीतिमत्ता

लेखक मराठे यांनी गुरुवार, 15/11/2012 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळीच ही बातमी वाचनात आली आणि पुन्हा धर्माच्या नावाखाली चाललेल्या अघोरी प्रकारामुळे तळतळाट झाला. सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी स्त्री डॉक्टरांनी अबॉरशन करायला नकार दिल्यामुळे मेली. अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर अबोर्शन करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्‍याने हरतर्‍हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला.

फराळ आणि फटाके : दिवाळीतले आणि जीवनातले!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 15/11/2012 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या सणांमध्ये दिवाळीचा वेगाळाच थाट सर्वांना अंधारामध्ये दाखवी प्रकाशाची वाट ... ... प्रकाश पसरवते पणतीची पेटलेली वात या दिवा़ळसणामध्ये करा दु:खावर मात ... ... निराशेच्या "भुईचक्राला" लावून टाका आग गोल गोल फिरत स्वतःमध्ये निराशा होईल खाक ... ... "फुलबाजीच्या" झगमगत्या आनंदी तुषारांद्वारे फुलवा मनामनांत आनंदाचे "झाड"... ... सद्वीचारांची ठीणगी लावा रॉकेटच्या मुखात महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या उंचच उंच आकाशात ... ... सुतळी "बॉम्बसारखे" छिन्नविछिन्न होवू द्या मनातले नकारात्मक कीडलेले भाग ... ... "शंकरपाळ्यांसारखी" चौकट तोडा बघा मोकळ्या मनाने या सुंदर जगात ... ... "चकलीसारखे" गुरफटू नका या
काव्यरस

देवाला रिटायर करण शक्य नाही

लेखक राजघराणं यांनी गुरुवार, 15/11/2012 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी तरी म्हटलं देवाला आता रिटायर करा मी म्हणालो नस्त्या भानगडी कशाला ? रिटायर करायला आधी त्याला कामावर कोण ठेविल ? अन्स्किल्ड लेबर ला अजकाल जॉब नाय भेटत भाउ. साधे भुकंप आणी वादळ ज्याला थांबवता येत नाहीत. आपत्ती देवाच्या कोपाने होते हे भाव थोपवता येत नाहीत त्याच्याविरुद्ध कोणी वागला तर ज्याच्या भावना काबूत रहात नाहीत असल्या मत्सरी देवाला आपण नाय कामावर ठेवणार माणुसकीच ग्रॅज्युएशन नापास झालेल्याला कोण दील काम ? त्यात पास व्हायला आधी तर्काची शाळा पास व्हावी लागते भौ दोन जमातींचे देव वेगळे असू शकत नाहीत एव्हढही त्याला कळत नाही काफिर आणी दलितांना जन्म देणारा तो महामूर्ख स्वतःच्याच हाताने हीन द
काव्यरस

वाहनमहिमा

लेखक शरद यांनी गुरुवार, 15/11/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
वाहनमहिमा बारामासी दु:ख मानसी वाहतुक दाटे चोहिकडे ! क्षणात होते सिग्नल हिरवे क्षणात फिरुनी लाल गडे !! भवती बघता शतगाड्यांचा गोफ दुहेरी विणलासे ! अरुंद रस्ते काय बांधिले चालक वाटा काढितसे !! झाला पिवळा लाल वाटतो अहा ! अहा ! हिरवा उघडे ! झणी रस्त्यावर, उंच घरांवर काळा काळा धूर उडे !! उठती वरती आणि सभोवती प्रदूषणांचे रंग पहा ! सर्व थरांवर हाय रेखिले भीषणतेचे रूप महा !! वाहनमाला जाता भासे कल्पांताची माळची ते ! उतरूनी येती अवनीवरती कळीकाळची एकमते !! धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती !

कोपरगावात अनुभवा "तृप्ती"

लेखक १००मित्र यांनी बुधवार, 14/11/2012 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोपरगांव माहितिये ? साईबाबांच्या शिर्डी पासून फक्त १७ किमी वर. २ साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध. मी साधारण १९९२ पासून जातोय. मुद्द्याचं म्हणजे : इथे एक भार्री जेवणाची जागा आहे. "तृप्ती भोजनालय ". आम्ही , म्हणजे मी आणी माझा मित्र अजय , कधी कधी उशीरा पोचलोय तेव्हां आम्ही चक्क बंद केलेलं शटर सुधा उघडायला लावलेलय. दिवस भराचं काम सम्पवायचं आणी तृप्ती मधलं जेवण हाणायचं. आज सुधा तीच चव, तश्शीच व्यवस्था, तोच आखडू मालक.१९७७ पासून चालू आहे म्हणे. म्हणजे बघा , आपण जर प्रेमानी त्याचं कौतुक करायला गेलो , तर हा मनुष्य बिल्कूल बोलत नाही. फोटो काढायला दिले हेच नशीब.

जो पर्यंत प्राण आहे.... जब तक है जान

लेखक केदारविदिवेकर यांनी बुधवार, 14/11/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
यश राज फिल्म्स' - YRF, नाम तो याद होगा....(" *** नाम तो याद होगा ".. हा YRF चा अजरामर झालेला डायलॉग कोण विसरू शकेल..), असं जिव्हारी लागण्यासारखं नकळत, अबोलपणे कदाचित बोलून गेले असतील 'यश चोप्रा', असं वाटून जातं काहीसं, त्यांना हा माझा मानाचा मुजरा... 'जीवेत शरदम शतम' म्हणायचं राहून गेलं, असं काहीसं वाटून गेलं असेल तमाम सिनेमाप्रेमी लोकांना आणि त्यांना ही चुटपूट सदैव बेशक लागून राहील. पाहूया त्यांची ही 'सतत तेवत राहणारी प्रेमाची मशाल' कोण पुढे घेऊन जाईल ? शेवटी जस आपण म्हणतो, "सचिन तो सचिनच, किंवा लता ती लताच, तसं यश चोप्रा ते यश चोप्राच".

खांसाहेबांची खिचडी

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी बुधवार, 14/11/2012 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः दोन वाट्या बाजरी,पाव वाटी मुगाची डाळ,पाव चण्याची (हरभरा) डाळ, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या.(शक्यतो जाडसर पोलिश न केलेल्या) चार पाच लसूण पाकळ्या, अर्धा ईंच आले,एक चमचा धन्याची पुड, एक चमचा जिरे पुड (दोन्ही जरा भाजून केलेल्या) १ चमचा गरम मसाला, किसलेले सुके खोबरे,दोन तमालपत्रे,भिजवुन उकडलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला १ कांदा,बारीक चिरलेली कोथिंबिर,चार पाच लाल सुक्या मिरच्या,तेल,लोणी. प्रथम बाजरीला थोडा पाण्याचा हात लावून सडून घ्यावी पूर्वी आम्ही खलात छोट्या मुसळाने सडत होतो. आता योग्य तो प्रोसेसर वापरावा.एका बाजरीच्या दाण्याचे दोन तुकडे होतील ईतपत भरड असावे. नंतर ते चांगले पाखडावे.