Skip to main content

Catch 22

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 06/01/2013 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
"हरन्याला पुलिस नी पकडुन नेलं ना बाप्पा.." कालू वरडत वरडतच येत व्हता. "का म्हुन?" बाप्पाच्या चेहऱ्यावर माशीही उडाली नाही. "ते काल नक्सलीनी मारलं व्हतं ना पुलिसले...हरन्या नक्सली हाये म्हनत व्हते" "नक्सली? हरन्या? काय येडबीड लागले का बे पुलिसले?" "कोनीतरी पायजे ना बाप्पा....रिकॉर्ड ले.. हरन्या वावरात गेला व्हता रात्री...धरला ना मग त्याले रस्त्यात...जंगल म्हुन वावराचा रस्ता हाये...तर तिथेच धरला पुलिसने..." "साली आपली तर जिदंगानीच खराब हाये साली...तिथे नक्सली इथे पुलिस..." "जाव दे...रोजचाच हाये..." "हा..

वेदना

लेखक kanchanbari यांनी रविवार, 06/01/2013 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
इवलस तूझ बाळ वेदनांनी झाल लाचार म्हणे काय केल त्याने पाप सर्वांना सांग तु आज मखमलीची असतात स्वप्नांची पिसं अत्याचारी या दुनियेत हिरमुसली तुझी कुस ओढवली आहे सर्वांनी अंधाराची चादर तुझ्या या संसाराला लागली कुणाची नजर डोळ्यांच्या या पापण्या बघतांनाही लुकलुकतात अश्रुंच्या या सागरात थेंब रक्ताचे मिसळ्तात अरे जगाच्या माय बापा तुच आहेस ना सर्वांचा भाग्य विधाता मग दुर कर नशिबातला काटा तेव्हा करेल वंदन तुला दाता
काव्यरस

अकबरुद्दीन ओवेसी या धर्मांधाचे देशाबाहेर पलायन

लेखक सागर यांनी रविवार, 06/01/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर मिपावर चर्चा झाली आहे असे दिसले नाही म्हणून हा धागा. अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला व एम.आय.एम या नावाने प्रसिद्ध असलेल्या पक्षाचा नेता अकबरुद्दीन ओवेसी याने एक अतिशय प्रक्षोभक भाषण केले होते. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे. पण त्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा केला व मग या महाशयांवर केस दाखल झाली. आपल्या भाषणात १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे हे अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत. असो.

'बीपी' (बालक पालक)

लेखक किसन शिंदे यांनी रविवार, 06/01/2013 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय! आपल्या भारतीय समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जातं. मग इतका संवेदनशील विषय कोणी, कसा आणी कधी शिकवायचा?? साधारण वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून हे असंही काही असतं याची जाणिव व्हायला सुरूवात होते आणि ते नेमकं काय असतं हे जाणून घ्यायच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहचतात. बरं कुतूहुल म्हणून वाटलेल्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मोठ्या माणसांकडे विचारायचीही सोय नसते. अशा वेळी पालकांची मानसिकता आड येते.

बलात्काराविरूद्धचा रामबाण उपाय

लेखक अर्धवट यांनी रविवार, 06/01/2013 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहावा की न लिहावा हे नक्की होत नव्हतं, पण माझ्या सर्व जालीय मित्रांच्या हे नजरेला पडलं असेलच असं नाही म्हणून मुद्दाम लिहितोय. मिडीयावर, जालावर, वृत्तपत्रांमधून आणि एकूणच सर्व समाजचव्हाट्यावर बलात्कार, पीडीतांना न्याय, बलात्कार्‍यांची मानसीकता यावर उहापोह चालू आहे. ह्या सर्व मंथनातून काही चांगले कायदे, अंमलबजावणीत सुसूत्रता व कठोरता, समाजाच्या एकूण मनोवॄतीत सुधारणा वगैरेर फायदे झाले तर ते निश्चीतच चांगले ठरेल. भेदरलेली जनता सध्यातरी रोज न्यूज चॅनलवर कोकलणार्‍या पॅनेलीस्टना पाहाणे याखेरीज काहीही करू शकत नाही.

Quail Fry (होला मसाला)

लेखक Mrunalini यांनी रविवार, 06/01/2013 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रान्स, जपान, माल्टा, पोर्‍तुगीज, पोलंड तसेच भारतात देखिल आवडीने खाल्ला जाणारा हा पक्षी आकाराने अगदिच लहान, शिजण्यास सोप्पा व चवीला उत्कृष्ट असतो. ह्यालाच भारतात "होला" असेही म्हटले जाते. मागच्याच महिन्यात इथल्या एका indian shop मधुन मी हा quail घेउन आले आणि एक साधीशी पाकृ try केली. चव एकदम मस्त होती, म्हणुन म्हटले मिपा वर देखील ह्याची पाकृ टाकावी. तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे. ;) q1 हा पक्षी जास्तकरुन आख्खाच केला जातो.

ड्रॅगनच्या देशात १३ – यांगशुओ : ली नदीची जलसफर आणि 'इंप्रेशन सांजे लिउ' शो

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 05/01/2013 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५...

खोबरे+खसखस पोळी (संक्रात स्पेशल)

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 05/01/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सारणासाठी: ओल्या नारळाचा चव दोन वाट्या, खसखस अर्धी वाटी, गूळ दीड वाटी, अर्धा चमचा वेलची पावडर. पारीसाठी: कणिक तीन वाट्या, रवा एक वाटी, तेल पाव वाटी,मीठ. क्रुती: खसखस भाजून पावडर करून घ्यावी. खोबरे व गूळ एकत्र करुन मोदकाप्रमाणे सारण करावे. सारण तयार झाल्यावर त्यात खसखस पावडर आणि वेलची पावडर मिसळावी. सारण तयार करण्यापूर्वी कणिक, रवा एकत्र करून त्यात तेल आणि चवीला मीठ घालून घट्टसर कणिक मळावी. सारण तयार होईपर्यंत कणिक भिजत राहू द्यावी. सारण गार झाले की मिक्सरला बारीक करून घ्यावे. कणिक फूड्प्रोसेसरला मऊ करून घ्यावी. सारणाच्या गोळीच्या दीड्पट (अंदाजे) पिठाची गोळी घ्यावी.

श्रद्धा अंधश्रद्धा

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 05/01/2013 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ रात्री बारा सव्वा बाराची, नदीकाठचा परिसर, डोळ्यात कुणी बोट घातले तरी कळणार नाही असा दाट अंधार,अमावाश्येचीच रात्र ती. सगळीकडे काळोखाचेच साम्राज्य,दूर गावाच्या बाजूला ग्राम पंचायतीचे दोन तीन दिवे क्षीणपणे लुकलुकताना दिसत होते.परंतु इथे स्मशानात त्यांचा काहीही उपयोग नव्हता. इथे त्याला फक्त अंधार नि अस्वस्थ करणारी शांतता यांचीच सोबत होती. . मस्त गार वारे सुटले होते तरी त्याला घाम आला होता. चेहऱ्यावरचा घाम पुसत त्याने घड्याळात पहिले. सव्वा बारा, धक्का बसून त्याने पुन्हा घड्याळ पहिले सव्वा बाराच वाजले होते. म्हणजे त्याला तिथं येऊन फक्त पंधराच मिनिटे झाली होती.