मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Quail Fry (होला मसाला)

Mrunalini · · पाककृती
फ्रान्स, जपान, माल्टा, पोर्‍तुगीज, पोलंड तसेच भारतात देखिल आवडीने खाल्ला जाणारा हा पक्षी आकाराने अगदिच लहान, शिजण्यास सोप्पा व चवीला उत्कृष्ट असतो. ह्यालाच भारतात "होला" असेही म्हटले जाते. मागच्याच महिन्यात इथल्या एका indian shop मधुन मी हा quail घेउन आले आणि एक साधीशी पाकृ try केली. चव एकदम मस्त होती, म्हणुन म्हटले मिपा वर देखील ह्याची पाकृ टाकावी. तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा आहे. ;) q1 हा पक्षी जास्तकरुन आख्खाच केला जातो. आकारने लहान असल्यामुळे त्याचे तुकडे करणे अवघड जाते. मी सुद्धा ते आख्खेच केले होते. त्यामुळे photo थोडा funny आहे, पण चव मस्त आहे. ;) साहित्यः Quail (होला) - २ आख्खे दहि - १/२ वाटी आले-लसुण पेस्ट - १ चमचा हळद - १ चमचा लाल तिखट - २ चमचे गरम मसाला - १ चमचा तेल - २-३ चमचे लिंबुचा रस - १/२ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. होले स्वच्छ धुवुन घ्यावे व tissue ने पुसुन घ्यावेत. २. त्यांना वरतुन थोडेसे मिठ, १ चमचा आले-लसुण पेस्ट, १/२ चमचा हळद व १ चमचा लाल तिखट लावुन १-२ तास marinate करावे. ३. कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात marinate केलेले होले टाकावेत व ३-४ मिनिटे सर्व बाजुने परतुन घ्यावेत. ४. त्यात उरलेली हळद, लाल तिखट, गरम मसाला, १/२ वाटी दही व चवीप्रमाणे मिठ टाकुन ५-१० मिनिटे झाकण ठेवुन शिजवावे. मिठ टाकताना लक्षात ठेवावे, कि marination मधेही मिठ टाकले होते. ५. हे होले पुर्ण कोरडे होई पर्यंत परतावे. सर्वात शेवटी लिंबुचा रस टाकुन निट हलवावे व गॅस बंद करावा. ६. हे होले गरम असतानाच फस्त करावेत. ;) q2

वाचन 13588 प्रतिक्रिया 0