Skip to main content

जुने सिनेमे... नव्या काळात

लेखक स्मिता. यांनी मंगळवार, 19/02/2013 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
तसा चर्चाविषय शीर्षकातच उघड होतोय. सध्या येणार्‍या हिंदी (तसंच इंग्रजी आणि मराठी) चित्रपटांचा दर्जा बघता मी जुने चित्रपट बघण्याचा सपाटा लावला आहे. मला कधी सत्यदर्शी, सामाजिक चित्रपट आवडतात तर कधी मनाला फक्त विरंगुळा देणारे मनोरंजक चित्रपट बघावेसे वाटतात. कोणता चित्रपट बघायचा हे ठरवलेलं नसेल तर मी जुन्या काळी हिट्ट झालेले किंवा गाणी बघून उत्सुकता वाटलेले चित्रपट शोधून बघते. हेतू एकच की एकेकाळी चित्रपट बहुसंख्य लोकांना आवडला होता म्हणजे त्यात थोडं तरी मनोरंजन-मूल्य असेल नाहीतर किमान गाणी ऐकून तरी समाधान मिळेल.

कच्च्या केळ्याचे थालीपीठ व टिक्की

लेखक neeta यांनी मंगळवार, 19/02/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
कच्च्या केळ्याच्या दोन रेसीपी देत आहे. उपासाला ही चालतील आणि मुलांना डब्यात ही देता येतील. भाजी केली तर कोणी खात नाही पण ह्या रेसीपी केल्या तर सर्व जण खातात.

बघत राहिलो धूळ

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 19/02/2013 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
कवि गोपालदास 'नीरज' यांच्या एका अतिशय गाजलेल्या कवितेचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न.
काव्यरस

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 19/02/2013 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
न पुसला जाणारा कलंक! १९३९-१९४५ गॅसचेंबरकडे.............. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आजकाल पहाट शत्रू म्हणूनच उजाडते. असे वाटते की उगवणारर्‍या सूर्याने आमच्या विध्वंसासाठी आमच्या शत्रूशी हातमिळवणी केली आहे की काय ! - प्रायमो लेव्ही – "If this is a man" या पुस्तकात १९४६ मधे.

सुरुवात....

लेखक पक पक पक यांनी मंगळवार, 19/02/2013 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
सरळ चंद्रावर नेणारं बुंबाट अंधुक वातावरण, कानठ्ळ्ळ्या बसवणारा डिजेचा खण्खणाट , गुदमरवुन टाकणारी धुराडी अन चखण्याचा वास , आणि या सगळ्यांना सामावणारा असतो एक बार..... ..........असंच बनतं सगळं .... ......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक लार्ज पेग... !! आतमध्ये शिरताना झालेली चलबिचल . ऑर्डर देताना झालेला गोंधळ , आ वासुन ऑर्डरची वाट बघणारे तुझे डोळे , आणि पांढऱ्याशुभ्र कपड्यातल्या कॅप्ट्नची नजर चुकवताना ..... अशी झाली ती पहिली भेट ..... ...सोड्याची बाट्ली आणि तिथे ....

त्रागा धागा... वैताग.....

लेखक मन यांनी मंगळवार, 19/02/2013 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा मी का लिहितोय ? कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड. पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस.

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/02/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही मी जगत राहिले पुन्हा पुन्हा ऊन्मळले नाही आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही जयश्री अंबासकर
काव्यरस

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 19/02/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खरे तर नावातच ऑर्कुट असल्याने हे वेगळे सांगायला नकोच, तरी साधारण २००७ सालाची असावी. नक्की महिना आठवत नाही पण वातावरणनिर्मितीसाठी थंडीचा पकडून चला. मी २००६ साली कॉलेज पासआउट होऊन माझा पहिलाच जॉब करत होतो, ज्याला साधारण वर्ष झाले होते आणि आयुष्यात बर्‍यापैकी आर्थिक स्थिरता आल्याने सामाजिक गरजा भागवायला म्हणून ऑर्कुटवर पदार्पण केले होते. त्यामुळे तसा मी ऑर्कुटवर अगदी नवाकोराच होतो. आज मी काही मराठी ऑर्कुट समूहांवर सुपर्रस्टार वगैरे म्हणून ओळखला जातो, पण तेव्हा दोन कवडीचा सामान्य ऑर्कुटर्सही नव्हतो.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

लेखक प्रास यांनी मंगळवार, 19/02/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

"शिवराय"

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 19/02/2013 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले र