Skip to main content

"शत्रुघ्न"च्या निमित्ताने

लेखक शरद यांनी शनिवार, 23/02/2013 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. मृत्युंजय यांचा "शत्रुघ्न" हा लेख वाचकांना आवडला व त्यावर प्रतिसादही भरपूर आले. रामायणातील एका अप्रसिद्ध म्हणावे अशा व्यक्तिचित्रावर लेख मीही प्रथमच बघत होतो. लेख मलाही आवडला पण वाचतांना जाणवले कीं वाल्मिकी रामायण व हा लेख यांतील तपशिलात फरक आहेत. मग रामायण काढून हे सर्ग परत वाचले. पण हे तपशीलातील फरक किरकोळ आहेत व एकूण लेखावरील त्यांच्या प्रतिपादनात त्यांनी फरक पडत नाही. शिवाय जर श्री. वल्ली यांच्यासारखी अधिकारी,अभ्यासू व्यक्ती ( हे तर संदर्भ म्हणून थेट वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकच देतात, मानले !) जर काही बोलत नसेल तर ते दुरुस्त करण्यातही काही हशील नव्हता.

अनपेक्षित - भाग १

लेखक निमिष ध. यांनी शनिवार, 23/02/2013 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
(ही एक पूर्णतः काल्पनिक कथा आहे. कोणतेही साधर्म्य हा एक निव्वळ योगायोग मानावा) सकाळची सवय उठल्या उठल्या फेसबुक उघडले. फोनवरच असल्यामुळे अंथरुणातून उठण्याचीही गरज नाही. तसेही सकाळी हवामान पाहणे आणि बातम्या वाचून झाल्यावर फेसबुक उघडलेच जाते पण आज सकाळी सकाळी नोटिफिकेशन मध्ये एक नवीन फ्रेंड्स रिक्वेस्ट होती. पहिले तर कोणीतरी अनोळखी कन्या होती. आताशा अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे बंदच केले आहे. तरीही कॉलेज मध्ये गेल्यावर कॉम्प वर परत फेसबुक उघडले. कन्या दिसायला तर एकदम सुंदर होती. जास्ती काही कळले नाही - प्रायव्हसी सेटिंग एकदम जोरदार होत्या.

पेशवाई"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 22/02/2013 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
पेशवाई" एक आठवण खूप म्हणजे खुप दिवस झाले. पुण्यात सदाशिव पेठ पोस्ट ऑफिस जवळ एक छोटे खानी उपहार गृह होते. उपहार गृहाचे नाव "पेशवाई" त्या हॉटेल ची खासियत म्हणजे "मटार उसळ" अप्रतिम चवदार उसळ असायची त्या हॉटेल मध्ये अर्थात बाकीचे पण मराठी पदार्थ असायचे पण त्या काळी प्रत्येकाची मोनोपॉली ठरलेली असायची वडा म्हटला की प्रभाचा..मिसळ.

इडियाप्पम (स्ट्रींग हॉपर्स) आणी गाजर रस्सम

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 22/02/2013 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य गाजर रस्समः १/२ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून २०-२५ मिनिटे भिजवलेली १ टोमॅटो बारीक चिरून घेतलेला १ मोठं गाजर किंवा २ छोटी गाजरं किसून दीड टेस्पून रस्सम मसाला ( तुम्ही रेडीमेड आणू शकता किंवा मी घरी बनवलेल्या रस्सम मसाल्याची पाकृ खाली दिली आहे) १-१/२ टीस्पून चिंचेचा कोळ १/२ टीस्पून हळद १/४ टीस्पून साखर (ऐच्छिक) १/४ टीस्पून हींग १ टीस्पून मोहरी ५-६ कढीपत्ता मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 22/02/2013 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने-1 काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने-2 आणखी काही नामवंत रसायने... कामवाली उर्फ मोलकरीण हे एक अत्यंत नामांकित ठसकेबाज व जहाल रसायन आहे. ‘कामाची वाट लावते ती कामवाली’ अशी काहीशी या रसायनाची व्याख्या करता येईल. हे रसायन ‘असून अडचण नसून खोळंबा’ यापेक्षा जरा वरच्या श्रेणीत म्हणजे ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ या प्रकारात मोडते.

शंका निरसन.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 22/02/2013 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, तू HIV पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?" भर रस्त्यात चालताना लेकीने आईला विचारले. अनपेक्षीत ठिकाणी, अनपेक्षीत प्रश्न विचारलेला असला तरी लेकीच्या चेहेर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि त्याचच नाही म्हटलं तरी आलेलं हसू दाबत आई म्हणाली "निगेटिव्ह." तिचा जीव काहीसा भांड्यात पडला. मग पुढचा प्रश्न "HIV पॉझिटिव्ह म्हणजे काय?" "HIV.. Human immunodeficiency virus हा एक प्रकारचा व्हायरस आहे.

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 22/02/2013 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ, 'रचनात्मक टिका कशी स्विकारावी' (How to accept constructive criticism) आणि 'रचनात्मक टिका कशी करावी' (How to do constructive criticism) या बद्दल आंतरजालावर इंग्रजी भाषेत बरच मार्गदर्शन उपलब्ध दिसत, पण कठोरतेचा टच कसा द्यावा या बद्दल फारशी माहिती वाचण्यास मिळाली नाही.

अध:पतन

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 22/02/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रकांत, माझ्याशी लग्न करशील ? नाही मधू.. आपला फक्त हनीमून होऊ शकतो. असले जोक्स एकमेकांना सांगणे ही हाईट असलेल्या काळातल्या झंपूतात्यांच्या हातात ती आमंत्रणपत्रिका पडताच ते तीनताड उडाले. हल्ली उडण्यात नवलाई अशी राहीलीच नव्हती. परवा रणछोडदास वाण्याच्या अमेरिकेतल्या मुलीने लग्न न करताच तसंच कुणाबरोबर रहायला सुरूवात केल्याची बातमी कानी पडली तेव्हां पण ते असेच उडालेले. रणछोडदास मात्र अरे बाबा त्येला लीव्ह इन रिलेशनशिप म्हणतेत, इटस लीगल असं कसंनुसं हसत सांगत होता. याच सज्जन गृहस्थानं याच पोरीचा देशी मित्र खालच्या जातीचा होता म्हणून त्याला गायब केल्याचं बोललं जात होतं.

प्रतिसादांची कविता !!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 22/02/2013 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसादांची कविता !! ‘आवडलेली ‘ कविता फार आवडली ! शेवटची ओळ जास्त भावली ! कल्पना आहे मस्त ! वाचतांना ४ जिलेब्या केल्या फस्त ! ..............." धन्यवाद !!!!" ‘ खूप आवडलेली ‘ Best ! super like !