प्रतिसादांची कविता !!
‘आवडलेली ‘
कविता फार आवडली !
शेवटची ओळ जास्त भावली !
कल्पना आहे मस्त !
वाचतांना ४ जिलेब्या केल्या फस्त !
..............." धन्यवाद !!!!"
‘ खूप आवडलेली ‘
Best ! super like !
मस्त जमलंय hike !
नवीन concept मांडलेली कविता !
तुम्ही फार छान लिहिता !
............."Thank you !!!!!"
‘ अर्धीच आवडलेली ‘
अश्रूंना धबधब्याची ची उपमा द्यायला हवी होती ,
पण डोळ्यांना head light ची उपमा साजेशी होती !
चांदण्यांना खेळण्यातल्या गोट्या म्हणालात ते आवडलं ,
पण चौथ्या कडव्यातलं तिसरं वाक्य खटकलं !
..............." सूचनांचा विचार करू !!"
'न आवडलेली '
बरी आहे आधीपेक्षा !
विडंबन वाचा यापेक्षा !
ठीकठाकच आहे !
सुधारणेला वाव आहे !
............." नक्की सुधारणा करू !!!!"
" दिवस वाईट गेल्यावर .....वाचलेली …… "
खोलीला छप्परच नाहीये ना ? मग कवडसा कुठला ? !
सूर्यमालेमध्ये फक्त पृथ्वी नाहीये ...बाकीही ग्रह आहेत !
विमानात बसलेल्या कवीला तिसऱ्या कडव्यात झुकझुक गाडीचा आवाज आलाय !
टंक लेखन चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होतोय !
आपले तर no comments !!
...................." sorry sorry चुकालीये कविता !!!!"
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
:-)
subject नसलेला प्रतिसाद
In reply to (No subject) by अज्ञातकुल
"आपल्या कवितेला यांनी दिला म्हणून यांच्याही कवितेला द्यावा " असं म्हणून दिलेला प्रतिसाद !! ::-)
मग आता कसा द्यावा म्हण्ताय...
In reply to subject नसलेला प्रतिसाद by फिझा
मग आता कसा द्यावा म्हण्ताय... ;)
तरी पण वाचुन मजा आली.. :) खरच... ;)
अपेक्षांचे व्यर्थ ओझे,
अपेक्षांचे व्यर्थ ओझे,
वाहिले कुणी अवजड साजे,
प्रति साद त्यासी म्हणू नका
काव्य त्यात अणू नका...
+१
In reply to अपेक्षांचे व्यर्थ ओझे, by अत्रुप्त आत्मा
हाह्हा
प्र्यत्न रोचक आहे. इथे जे
प्र्यत्न रोचक आहे. इथे जे मॅन्युअली केलेय ते कंप्यूटर प्रोग्रॅम्स वापरून केलेले आहे. इनपुट डेटा म्हणून ट्विटर फीड्स घेऊन, त्यातले विशिष्ट वृत्ताच्या फॉरमॅटमध्ये बसणारे ट्वीट्स तेवढेच निवडून छान वृत्तबद्ध कविता तयार केली जाते-तीसुद्धा यमकबद्ध.
https://www.pentametron.com/
पण चौथ्या कडव्यातलं तिसरं
पण चौथ्या कडव्यातलं तिसरं वाक्य खटकलं ! ;)
खालुन सहावी ओळ आवडली, असा
खालुन सहावी ओळ आवडली, असा प्रचि स्पेशल प्रतिसाद देउन टाकला.
कल्पना आहे मस्त !
कल्पना आहे मस्त !
धन्यवाद. आता कुठल्याही
धन्यवाद. आता कुठल्याही कवितेखाली ही कविता कॉपी पेस्ट करता येईल.
नवीन म्हणून आवडले
मस्त. चांगला आणि अगदी नवीन एक्स्परिमेंट वाटतोय. ग्रेट.
त्यामुळेच आवडले एकदम.
एक मोठ्ठी जांभई
एक मोठ्ठी जांभई :(
ओव्हरलोड
पिझाबाई तुमच्या कविता ओव्हरलोड होतायत .
पिझाबाई तुमच्या कविता
In reply to ओव्हरलोड by लौंगी मिरची
पिझाबाई तुमच्या कविता ओव्हरलोड होतायत .
हे जलेबीबाई सारख वाट्त्य... ;)
... पुढची कविता मीटरमध्ये
... पुढची कविता मीटरमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा.
भा.पो. !
भा.पो. !