Skip to main content

सूप अलॊनीयो ग्रातीने (फ्रेंच आनियन सुप ग्रातीने)

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 27/02/2013 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः कांदे - ७-८ मध्यम आकाराचे लसुण - ३ पाकळ्या बेसिल - १ छोटा चमचा तेजपान - २ काळि मिरी पावडर - १ चमचा फ्रेंच बगेट - १ रेड/व्हाईट वाईन - ४ चमचे चिकन स्टॉक - ४ कप ऑलिव्ह ऑईल - १ चमचा बटर - १ चमचा चीज - १ वाटी (२-३ वेगवेगळे चीज. मी या रेसिपी साठी ३ वेगवेगळ्या प्रकाराचे nonsalty स्विस व डच चीज वापरले आहे) मिठ चवीनुसार Ovenproof २ बाऊल / मग कृती: १. कांदे लांब कापुन घ्यावेत. लसुण बारीक चिरुन घ्यावा. २. कढईत ऑलिव्ह ऑईल व बटर गरम करावे. त्यात तेजपत्ता व लसुण टाकुन १ मिनिट परतावे. ३.

पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek)

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 26/02/2013 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला, माहुली. उंची सुमारे २८१५ फूट. माझ्या एका मित्राने २०१० साली हा किल्ला सुचवला, तिथे जायची योजना आखली, आणि आम्ही तीन मित्र तिथे ट्रेक ला गेलोही. पण काठिण्य पातळीचा चुकलेला अंदाज, पाण्याची कमतरता, शिवाय तापलेला सूर्य, अशा कारणांनी अर्ध्यातून परत आलो. पण तेंव्हापासून `माहुली' आमच्या अजेंड्यावर होता. २३ फेब्रुवारी २०१३ ची योजना फिक्स झाली. बघता बघता आठ जण जमलो आणि माहुली ला निघालो. 1 ठाण्यापासून ६१ किलोमीटर वर, शहापूर नजीक माहुली किल्ला आहे.

कविंचे काव्य...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 26/02/2013 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अपल्यातून जर कवि गेले,तर अपला काय असेल सूर? आणी कवितून काव्य गेले,तर कसा असेल त्याचा नूर?
काव्यरस

एक भारुड

लेखक अनिवासि यांनी मंगळवार, 26/02/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच सन्त एकनाथाचे 'भवानीमाते रोडगा वाहीन तुला' हे भारुड वाचनात आले. हे खुप जुने आहे ह्याची कल्पना आहे. प्रथम वाचनानतर विनोद म्हणुन खुप हसलो पण नन्तर एक सन्त असे का लिहितील असा प्रश्न पडला. एक्-दोन जाणत्या लोकाना विचारले असता ' हे प्रतीक आहे' असे सान्गीतले पण कशाचे प्रतीक हे मात्र सान्गु शकले नाहीत. शेवटी मिपा वर विचारा असा सल्ला मिळाला. ह्यावर पुर्वी चर्चा झाली असेल तर क्षमस्व- link - द्या, नाहीतर जाणत्यानी मदत करावी. मुळ कवीता मला एका व्यनीतुन आली व ती इथे डकवीण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही- जसा अजुन अनुस्वार पण जमत नाही. प्रतिसादाची वाट पहात आहे

बाजरीची खिचडी

लेखक त्रिवेणी यांनी मंगळवार, 26/02/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-(2 जणांसाठी) बाजरी- 1 ½ वाटी तूर डाल- ¾ वाटी(1/2 तास आधी भिजवून घ्यावी) तांदूळ- 5-6 टेबलस्पून शेंगदाणे व खोबर्‍याचे काप- आपल्या आवडीप्रमाणे हळद – ½ चमचा लाल तिखट- आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला किवा गोडा मसाला- 2 टेबलस्पून कांदे-2 मीठ- चवीनुसार कृती- बाजरी 1 तास भिजत घालावी. नंतर एका कपड्यावर घरातच वाळत घालावी. बर्‍यापैकी वाळल्यावर मिक्सरच्या छोट्या भांड्यात अगदी कमी वेळ फिरवावी.

रेशिमगाठी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/02/2013 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
ती व्याकुळ होउन गाते भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची अन् मनस्मरणीवर जपते विस्मरली नावे विरलेल्या शपथांची ती केविलवाणे हसते भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली दंव जसे फिकटते, विरते सुकतात आसवे तशीच थबकुन गाली ती अलिप्त होउन लिहिते कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी वाचून मनाशी म्हणते 'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?' भिरभिरत एकटी फिरते भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी फिरफिरुन रोज सावरते घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी मुखवटे कितीक घडविते लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी हट्टाने बांधत बसते तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी

वीर सावरकर

लेखक Dhananjay Borgaonkar यांनी मंगळवार, 26/02/2013 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत. सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते.

एक शांत क्षण

लेखक ई-पूर्वाई यांनी मंगळवार, 26/02/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
या साऱ्या कोलाहालाचा फक्त ‘समय’ एकटाच ‘गवाह’ आहे, ’Technology’ च्या महापुरात बुडाला जनप्रवाह आहे. ‘T.V’ च्या त्या अखंड भट्टीत संस्कारांची वानवा आहे, अन ‘internet’ च्या मायाजालाचा मोह हर मानवा आहे. घरच्यांपेक्षा ‘Facebook – friends’ शी बोलणाऱ्यांची वाहवा आहे, आणि सदैव ‘messengers’ वर ‘chat’ करणारा आजचा जमाना नवा आहे. या साऱ्या जंजाळात हरवला माणुसकी चा गारवा आहे, अन ५००+ ‘FB friends’ असले तरी एकटेपणा जीवा आहे. या प्रचंड कल्लोळातून एक तरी शांत क्षण हवा आहे, आपसांतल्या उदासीनतेवर तीच एक ‘दवा’ आहे.

मतदान पध्दत

लेखक NiluMP यांनी मंगळवार, 26/02/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
देशाचे प्रतिनिधित्व राजकारनी करतात हे मान्य पण मतदान करून नेता निवडून देणे ही पध्दत चुक की बरोबर. माझया मते चुक आहे कारण १ मतदान पध्दतीमुळे व्होटबॅंक ही समस्या निर्माण झाली २ व्होटबॅंकमुळे शहरे बकाल झाली आणि अनैतिक धंदे वाढले ३ अनअधिकृत बांधकामे वाढून भ्रष्टाचार वाढला ४ राजकीय घराणेशाही जोर धरू लागली ५ कायदा आणि सुव्यवस्था हतबल झाली तसेच, टिव्हीवरील रिअल्टी शो आणि मतदान यातील फरक टिव्हीवरील रिअल्टी शोमध्ये आपण प्रथम परर्फामन्स पाहतो आणि मग मतदान करतो आणि मतदान प्रक्रियेत आपण प्रथम मतदान करतो जेथे परर्फामन्सची काहीच गॅंरंटी नसते तुम्हाला काय वाटते?

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 26/02/2013 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....