वेरूळः भाग १ (जैन लेणी)
औरंगाबादला यायचा मुख्य उद्देशच वेरूळ आणि अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेण्यांना भेट द्यायचा हाच होता. पैकी अजिंठ्यावर लिहून झालेच, वाटेतल्या प्रवरासंगमच्या अद्भूत मंदिराबद्दल लिहिले गेले पण वेरूळवर लिहायला तसे काही सुचतच नसल्यामुळे इतके दिवस लिहायचे राहूनच गेले होते. एकंदरीत आमचा लेखनप्रवास आमच्या भटकंतीच्या अगदी उलटा सुलटा कसाही सुरु आहे.
तर मी, किसन, धन्या आणि दिनेश पुण्यावरून निघालो. औरंगाबादच्या नगरफाट्यावर बिरुटे सर आमची वाट बघत थांबलेले होतेच. आता त्यांच्यासवेच आमचा प्रवास सुरु झाला. वाटेत खुल्ताबादला औरंगजेबाची कबर पाहायला थांबलो.
मिसळपाव