मोजमापं आणि त्रुटी - २
या लेखाचा दुसरा भाग मला चौदा मार्चला, म्हणजे पाय दिनाला प्रसिद्ध करायचा होता. इतर कामांत गुंतलेलो असल्यामुळे थोडा उशीर झाला. आता तुम्ही म्हणाल की या मोजमापांचा आणि 'पाय' चा काय संबंध? उत्तर सोपं आहे. गेल्या लेखात मी तीन आकृती दिल्या होत्या. त्यांच्यातल्या सरळ रेषेची लांबी आणि वक्राकाराची लांबी यांचं गुणोत्तर काढायला सांगितलं होतं. या गुणोत्तरातून पाय ची किंमतच अप्रत्यक्षपणे मोजली जात होती. कशी ते सांगतो.
पाय म्हणजे वर्तुळाचा परीघ भागिले व्यास. व्यास मोजणं सोपं आहे - कारण ती एक सरळ रेषा असते. वर्तुळाचा परीघ मोजणं मात्र सोपं नाही.
आई..बाबा
बाबा .........
काल आवरताना बाबांचे जुने रोलेक्स घड्याळ सापडले.
एकदम आठवल....म्हणायचे आमच्याशी बोलण्या साठी तुला कधी वेळ मिळणार देव जाणे ...
.............................
आई
शनिवार ची सकाळची शाळा..
डोळ्यावर झोपेची झापड
पटकन उरकलेली आंघोळ.
खाकी चड्डी व पांढरा शर्ट
पोळीचा लाडु..कडीचा डबा..
एकदम लहान पण आठवते..
व आता हयात नसलेली आई पण..
नौदलातील आयुष्य -१
मी १९८७ साली एम बी बी एस पास होऊन नौदलात कमिशन मिळवून मुंबईच्या नौदलाच्या रुग्णालयात इंटर्न शिप साठी कामावर रुजू झालो. तेथे २ वर्षे काम १ वर्ष इंटर्न शिप आणि १ वर्ष वैद्यकीय अधिकारी (सर्जन लेफ्टनंट) म्हणून काम करून जानेवारी १९९० मध्ये विक्रांत या विमानवाहू जहाजावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. विक्रांत तेंव्हा दुरुस्ती साठी कोरड्या गोदीत ( dry dock) होती. त्याचे पूर्ण दुरुस्तीकरण चालू होते.
हिंदु नावाचा धर्मच नाही....
हिंदु नावाचा धर्मच नाही अशा बातमीनं कालपासून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देवस्थान आपल्या उत्त्पन्नातील काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरत असतील तर त्यास आयकरातून सुट मिळू शकत नाही, असे लवादाने मत मांडले आहे. लवाद पुढे असेही म्हणते की, '' हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पुजतात. इतकेच नव्हे तर, ही जीवनशैली अंगिकारणार्यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते.
कोकणातील शिमगोत्सव
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !
कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.
कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे .
" रविवार आज रविवार -" (बालकविता)
रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !
मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !
दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !
नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !
दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !
रविवार हो रविवार
आमचा आवडता वार
घरात आणि मैदानात
दंगामस्ती चालणार !
.
पौष्टिक नाश्ता
साहित्य : १ मीडियम कच्चा पपीता , जिरे , हिरव्या मिर्च ५-६ , मीठ चवी अनुसार , शेंगदाणे चा कुट ४ (टेबल )चमचे, लिंबू,कोथिम्बिर सजावटी साठी
कृती : प्रथम पपीता ला बारीक चिरून घावा, ननतर कडाही मध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप केवा तेल सुधा चालेल घालून गरम करावे मग त्यात जिरे आणिक बारीक चिरले लि मिरची घालावी , आता यात चिरले ला पपीता घालून थोडे पाणी घालून पूर्ण शिजून घ्यावे अगदी बटाटे ची भाजी सारखी, नंतर मीठ घालून जर पाणी असेल तर ते जिरू द्या वे . भाजी मोक्डी झाल्यास त्यात शेंगदाणे चे कुट घालावे .आणिक मिडीम गस वर लाल सर होऊ द्यावे .
आई शप्पथ सांगतो...
प्रेमात धड-पडायचंय म्हणता म्हणता पडलो एकदाचा.. नव्हे, चांगला आपटलोच. हाडं खिळखिळी झाली.. पार चेंदा-मेंदा झाला..
बरं झालं म्हणा.. यातुनच शिकायला मिळतं.. पण अशी का वागली ती???
----------------------------------------------
तीचं लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. :(
तीनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..
मिसळपाव