Skip to main content

हिंदु नावाचा धर्मच नाही....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 17/03/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु नावाचा धर्मच नाही अशा बातमीनं कालपासून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देवस्थान आपल्या उत्त्पन्नातील काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरत असतील तर त्यास आयकरातून सुट मिळू शकत नाही, असे लवादाने मत मांडले आहे. लवाद पुढे असेही म्हणते की, '' हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पुजतात. इतकेच नव्हे तर, ही जीवनशैली अंगिकारणार्‍यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही. तसेच शिवशंकर, हनुमान किंवा दुर्गामाता मंदिराच्या देखभालीवरील खर्च हा धार्मिक खर्च मानता येणार नाही, असेही म्हटले आहे. 'भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही. ते विश्वव्यापी आहेत. ज्या हिंदू धर्माशी या देवदेवतांचे नाव जोडले जाते, तसा कुठला धर्मच अस्तित्वात नाही' (मटा) १] माझा पहिला प्रश्न असा आहे की भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध हा हिंदु धर्माशीच संबंधित आहेत तेव्हा ते विश्वव्यापी आहेत, असे मत लवादाने मांडण्याचे कारण काय असावे. २] एकाच देवाची पुजा करणार्‍यांचा तो एकच धर्म असतो तेव्हा नव्या लवादाच्या विचारात हिंदुंचा एक धर्म नाही का ? ३] हिंदु ही एक जीवनपद्धती आहे, त्याला धर्म म्हणने चूकीचेच आहे का ? विनंती : हिंदूच्या विरोधात आता सारखे लिहिल्या जाते, बोलल्या जाते, हिंदु सहिष्णू आहेत वगैरे मुद्दे चर्चेत टाळता आलेत तर टाळावे, लवाद असे का म्हणते यावरील माहितीपूर्ण आणि काही तर्कपूर्ण प्रतिसादांचे स्वागत आहे.

वाचने 34187
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

धर्म याचा अर्थ 'आचरणाची निश्चित तत्त्वे' असा असेल किंवा धर्म या शब्दातून 'धार्मिक विधी केल्याने प्राप्त झालेले पुण्य' या अर्थाने असेल किंवा अन्य जे काही असेल त्यात हिंदुंच्या बाबतीत 'देवपूजा' सांगितली असावी पण कोणत्या एका देवाबद्दल याची काही शक्यता वाटत नाही. -दिलीप बिरुटे

पॉपकॉर्न, चकणा, रॉयल स्टॅग, आरामखुर्ची, टीपॉय अशी आमची जय्यत तयारी झाली आहे. सुरू करा..

In reply to by खटासि खट

धर्मशास्त्राचा इतिहास हे डॉ.पांडुरंग काणे यांचे पुस्तक माझ्या संग्रही आहे त्यात असं म्हटल्याचं आठवतं की प्राचीन काळी देवांच्या पूजेबाबत सूर्य,वरुण,अग्नी या देवतांचे उल्लेख येतात मात्र शीव,लक्ष्मी आणि इतर देवता नंतर आल्या अवतार तर आपणास माहितीच आहे, पण नेमकी देवपूजा याच देवांची करावी असे काही दिसत नाही. असो, थोडं पुस्तक-बिस्तक चाळून पाहीन आणि हाती काही लागले तर खरडेनच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वैदिक काळात नैसर्गिक शक्तींची पूजा केली जायची. त्यांना देवतास्वरूप पौराणिक काळात मिळालं असावं..

In reply to by खटासि खट

ओकसर रागावले. नेमाडेंना ३३ वर्षं लागली, त्याआधी काथ्याकुटून ब्रिटीश गेले, मॅक्समुल्लर गेला. लवादापुढं आणि सर्वोच्च न्यायालयापुढं काही कमी काथ्या कुटला असेल का ? आपल्याला दोन चार दिवसात कसं कळणार या उत्सुकतेनं खुर्ची टाकून बसतो म्हणलं. शंभर दीडशे वर्षांमागे कुठल्या धार्मिक ग्रंथात हिंदू शब्द आला असल तर कुणी देईल एव्हढंच बघायचं होतं. रागवू नका मंडळी. चालू द्या चर्चा.

In reply to by खटासि खट

हिंदू धर्म असा शब्दप्रयोग पेशवेकालीन कागदपत्रांत सापडतो. बहुतेक राघोबा आणि जानोजी भोसले यांमधील एका पत्रात तसा उल्लेख आहे.

In reply to by बॅटमॅन

हिंदू धर्म असा शब्दप्रयोग पेशवेकालीन कागदपत्रांत सापडतो. बहुतेक राघोबा आणि जानोजी भोसले यांमधील एका पत्रात तसा उल्लेख आहे. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे"..ही आणि तत्सम वाक्ये मग कपोलकल्पीतच म्हणायची का

In reply to by विजुभाऊ

पेशवेकालीन कागदांत उल्लेख आहे याचा अर्थ शिवकालीन कागदांत नाही असा कुठे होतो? मला पेशवेकालीन उदा. आठवले म्हणून ते दिले इतकेच.

वरील प्रश्नांची उत्तरे काही मला माहित नाहीत पण माझेही काही प्रश्न आहेत. लवादाने "तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही" असे म्हटले आहे. कुठलीही एखादी विचारसरणी/ जीवनपद्धती/ किंवा तत्सम काही हे धर्म आहे किंवा नाही हे ठरवण्याचे काही तंत्र वगैरे आहे का? ठराविक धर्मग्रंथ, ठराविक देव, ठराविक प्रेषित, ठराविक उपासनापद्धती, ठराविक खुणा, संकेत, खानपान-पद्धती आणि ठराविक विचारसरणी वगैरे असलेल्या प्रकारालाच धर्म म्हणता येऊ शकेल काय? किंवा तसेच असले पाहिजे असे म्हणणे कितपत बरोबर आहे? आणि तसे असेल तरीही ते तंत्र कोणी ठरवले आणि तेच बरोबर हेसुद्धा कोणी ठरवले?

हिंदू धर्म आहे की नाही, हे ठरवण्याआधी धर्माची व्याख्या करणे गरजेचे आहे. काही मानके ठरवून घेणे क्रमप्राप्त आहे. मग त्या मानकांनुसार आपण उहापोह करू शकतो. पण सद्य परीस्थीतीमधे अशी मानके उपलब्ध आहेत का?

इष्टप्राप्त्यर्थ व अनिष्टनिवारणार्थ अलौकिक शक्तीची साधना किंवा आराधना म्हणजे धर्म होय.या आराधनेचे कर्मकांड कदाचित सर्व धर्माचे वेगवेगळे असु शकतील. भूतकालीन अस्तंगत मानवी समाज संस्कृतीच्या अनेक पातळ्यांवर जगत होते व त्यांच्यामध्येही निरनिराळ्या पातळीवरच्या धर्मसंस्था होत्या, असे इतिहासपूर्वकालीन संस्कृतीच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. धर्माचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात,संस्थारूप व वैयक्तिक यामधे यज्ञ वा पूजा म्हणजे कर्मकांड, देवताविषयक व्यवस्थेचे तंत्र, देवविद्या, तसेच सण्,उत्सव,पुरोहित संस्था या गोष्टी संस्थारूप धर्मात मुख्यतः अंतर्भूत होतात.तर वैयक्तिक धर्म हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातील धर्म असतो.देवतेची कृपा संपादन करता येणे वा अवकृपा होणे, यासंबंधी विचार यात फारसा नसतोच, देवविद्या ही यात गौण असते, आचरणाचे स्वरूप कर्मकांड हे नसते. त्यमुळे जर संस्थारूप धार्मिक केंद्रामधुन(मग ते केंद्र कोणत्याही धर्माचे का असेना) पेसा जमा होत असेल तर ते त्या धार्मिक केंद्राचे उत्पन्न च मानावे लागेल.

आमचे दोन पैसे: सर्वसाधारणपणे धर्म प्रकारात एकच एक "देव" असतो जसं की ख्रिस्त. बाकीचे उप किंवा कमी मान्यतेचे देव बिव. त्यांचा एक धर्मग्रंथ ज्यात काय करा अन काय नका करु वगैरे गायडन्स असतो. हिंदुंमधे तसं काहीच नाही. प्रत्येकाचा वेगळा देव. धर्मग्रंथ नाही. - गीता, वेद वगैरे हे धर्मग्रंथ नाहीत.- एकच एक देव तर अजिबात नाही. देवांचंच आपापसात पटत नाही म्हणतात. म्हणुन तांत्रिकदृष्ट्या म्हंटलं तर लवादाचं म्हणणं ग्राह्य आहे. पण मी असं वाचलंय की परदेशी लोकं भारताकडे यायला सुरुवात झाल्यानंतर (प्राचीन भारत - सिंधु नदीचा भाग + आताचं अफगाणिस्तान ते पार खाली म्यानमारपर्यंत) सिंधु नदीच्या नावाचा अपभ्रंश करुन त्या नदीकाठी राहणारे हे हिंदु असं झालं. जाणकारांनी सांगावं ही विनंती.

लवादाचा निर्णय वाचला. त्याअनुषंगाने काही उत्तरे देण्याचा प्रयत्नः
१] माझा पहिला प्रश्न असा आहे की भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध हा हिंदु धर्माशीच संबंधित आहेत तेव्हा ते विश्वव्यापी आहेत, असे मत लवादाने मांडण्याचे कारण काय असावे.
आयकर लवाद हा एक न्यायिक मंच आहे. त्यामुळे वरिष्ठ न्यायिक मंचांचे निर्णय त्यावर बंधनकारक असतात. "हिंदू हा धर्म नाही" हे मत नागपूर लवादाचं स्वत:चं नसून मद्रास उच्च न्यायालयाचं आहे (टी टी कुप्पुस्वामी चेट्टियार वि. तमिळनाडू - १९८७). मूळ बातमीत
'जिथे सर्व लोकच एकच कायदा आणि एका नियमाचे पालन करतात. विशिष्ट देवालाच भजतात. त्यांनाच समाज किंवा धर्म म्हणता येऊ शकते. एकसंध समाजाची ही व्याख्या केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चनांना लागू होते'
असा उल्लेख आहे, तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या कमिशनर वि. लक्ष्मींद्र तीर्थ स्वामियार (१९५४) या निर्णयावरून घेतलेला आहे. तात्पर्य काय, आयकर लवादाने कुठलाही नवीन शोध लावलेला नाही. (आता मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असं का म्हणतं हा प्रश्न उरतो. पण हिंदू पर्सनल लॉचा माझा अभ्यास नसल्याने त्याचं उत्तर मला ठाऊक नाही.) अजून एक गोष्ट म्हणजे आयकर लवादाचे निर्णय फक्त आयकर कायद्यापुरते बंधनकारक असतात. त्यामुळे आयकर कायद्यासाठी हिंदू धर्म नसला तरी इतर कायद्यांवर त्याचा परिणाम व्हायचं काही कारण नाही. हिंदू धर्म नाही हा "लॉ ऑफ लँड" नक्कीच नाही. [अवांतरः लवादाने हा निर्णय कलम ८०-जी च्याअंतर्गत देण्यात येणार्या आयकर सवलतींवर दिला आहे. त्यात "धर्म" (religion) असा शब्दप्रयोग नसून "धार्मिक समूह" (religious community) असा शब्दप्रयोग आहे. लवादाच्या निर्णयाचा आदर करूनसुद्धा "हिंदू हा धार्मिक समूहसुद्धा नाही" असं म्हणणं नक्कीच चूक आहे. त्यामुळे लवादाचा हा निर्णय चुकला आहे असं मला वाटतं.]

माझ्या स्मरणात असे आहे- ( चूकभूल द्यावी घ्यावी)- मागे एकदा शिवसेनेचे पुढारी मनोहर जोशी यांनी निवडणुकीच्या आधी केलेल्या प्रचार भाषणात हिंदुत्वाचा पाठपुरावा केला व हे भाषण निवडणूक पंचाने घालून दिलेल्या आचार संहितेच्या दृष्टीने अवैध असल्याने त्याची निवड रद्द व्हावी अशा अर्थाचा खटला कोणीतरी कोर्टात दाखल केला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेले होते . न्यायालयाने ह्यावर दिलेल्या निर्णयात हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनपद्धति आहे असा निर्णय देऊन जोशी यांची निवडणूक वैध ठरवली होती. आपल्यापैकी वकील मंडळी या निकालाबाबत अधिक शहानिशा करू शकतील असे वाटते.

हिंदु, हा धर्म नाही तर सरकारी अर्ज भरताना त्यातील धर्म या रकान्यात 'हिंदु' असे का भरतात ? आणि सरकारही ते मान्य का करते ? त्या ठिकाणी धर्म या रकान्यात 'माहित नाही' किंवा 'अननोन' असे लिहावे का ? याच न्यायाने 'हिंदु अविभक्त कुटुंब' हा कायदा रद्द करावा का ?

जगातील दोन प्रमुख धर्म देव ही संकल्पना मानत नाहीत, गॉड म्हणजे सुप्रीम पॉवर, परमशक्ती इतक्यापुरताच त्यांचा गॉडशी संबंध आहे. क्रिस्टियानिटीमध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या ट्रिनिटीला महत्त्व आहे. या गॉडला मराठीत आपण सर्वसाधारणपणे देव म्हणतो. हिंदी मध्ये बहुधा भगवान्,ईश्वर हे शब्द वापरले जातात अथवा देवता हा शब्द. देव,देवी हे शब्द क्वचितच वापरतात.इस्लाम आणि क्रिस्टियानिटीमध्ये प्रेषिताला मानतात,त्याची वचने हाच धर्म अशी त्यांची धारणा आहे.ही एक गोष्ट हिंदु म्हटल्या जाणार्‍या समुदायाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. बौद्धांमध्ये देव किंवा त्यांची मूर्तिपूजा नाही. जैनांच्या एका गटामध्येही देवळात तीर्थंकर असतात, देव म्हणून कोणी नसते. शिखांचेही गुरू असतात. हिंदूंना मूर्तिपूजेची सक्ती नाही पण मूर्तिपूजा हेही हिंदूंची वेगळी ओळख सिद्ध करण्याचे एक साधन साधारणपणे बनू शकेल.बाकी हिंदू ही सिद्ध करण्याची गोष्ट नव्हे, ती मानण्याची गोष्ट आहे. कोणीही मनुष्य स्वतःला हिंदू मानून तसे आवश्यक कायदेशीर सोपस्कारांनंतर कागदोपत्री नोंदवून घेऊ शकतो.हिंदु अविभक्त कुटंब, वारसा, दत्तक इत्यादि बाबींसाठी हे कायदेशीरत्व आवश्यक असते. देवळाच्या मालमत्तेची देखभाल, यज्ञ, होमहवन,प्रसाद,फुले, सजावट यावरील खर्च हा करसवलतपात्र धरण्याचे काही कारण दिसत नाही. ८० सी.सी. ची सवलत साधारणतः समाजोपयोगी कार्याला केलेल्या मदतीला मिळते. आणि हे समाजोपयोगी कार्य काय-कोणते ह्याची पुरेशी व्याख्या आयकरकायद्यामध्ये केलेली आहे अर्थात जाणकारांनी अधिक लिहावे अशी अपेक्षा.

In reply to by राही

अतिशय समर्पक आणि संतुलित प्रतिसाद!
देवळाच्या मालमत्तेची देखभाल, यज्ञ, होमहवन,प्रसाद,फुले, सजावट यावरील खर्च हा करसवलतपात्र धरण्याचे काही कारण दिसत नाही. ८० सी.सी. ची सवलत साधारणतः समाजोपयोगी कार्याला केलेल्या मदतीला मिळते.
+१०० - ('अ'धर्मी) सोकाजी

In reply to by सोत्रि

Signboard Thank You माझे सुद्धा हेच मत आहे.

न्यायालयात न्याय मिळतो हे अर्धसत्य आहे. न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणतात

म्हणजे शिवाजी महाराज्,आंबेडकर्,सावरकर, टिळक अशी दिग्गज मंडळी ही हिंदु नावाच्या जमावाचा एक भाग होती तर माझ्या तमाम हिंदु बंधु भगीनीनो अशी घोषणा काहीच कामाची नव्हती ,परदेशी आक्रमकांनी भारतात हल्ला करण्या अगोदर त्यांचे लोक सोडुन बाकीचे कसे काय ओळखले,का आपण फक्त महादेवाच्याच भक्तांवर हल्ला करायचा असे ठरवले. शिवाजी महाराजांच स्वराज्य हे कशाशी संबधीत आहे हिंदु धर्माशी की मुस्लिम धर्माशी.हिंदु हा एक धर्म नाही तर आंबेडकर का म्हणुन हिंदु धर्माचा त्याग करुन बॉद्ध धर्मात गेले. ह्या आताच्या आयकर अधिकार्यांची जात, धर्म कोणता.ह्यांनी नोकरी साठी अर्ज करतांना धर्माच्या रकाण्यात काय लिहील. ह्यांची लायकी आहे काय हिंदु हा धर्म नाही असे म्हणन्याची.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

धृ =धारण करणे, आधार देणे, ह्या धातूपासून तो बनला आहे. धारयती इति धर्मः अशी धर्माची व्याख्या आहे. वर्ण धर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, नैमित्तिक धर्म आणि गुणधर्म अशा पाच धर्मांचा उल्लेख आहे. या सर्वांमधेच आचार विचाराचे पालन करणे, नियमन हे येते. देवपूजा, पुनर्जन्म, इ.इ. हे सर्व मानना-यांची एक 'जीवनपद्धती' आणि अशी ही जीवनपद्धती कोणी मानत होते तर कोणी नाही. >>>ह्यांची लायकी आहे काय हिंदु हा धर्म नाही असे म्हणन्याची. आपल्याकडे हिंदु धर्माबद्दल बरीच माहिती असावी, त्यांना नसेल कळला हिंदु धर्माचा अर्थ. पण, आम्हाला नक्की समजावून सांगा धर्म कधी अस्तित्त्वात आले, हिंदू कोणाला म्हटले जाते, आणि हिंदूच का म्हटले पाहिजे त्याचे तपशिलवार संदर्भ दिले तर वाचायला आवडतील. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे. धारयती इति धर्मः म्हणजेच जीवनशैली. शांतिपर्वात वरील सर्व धर्मांचे भीष्मांनी तपशीलवार वर्णन केले आहे. पर्शियन भाषेत 'स' हा शब्द नसल्यामुळे 'स' च्या जागी 'ह' म्हटले गेले. उदा. सप्तसिंधू ही हप्तहिंदू झाली तर असूर हे अहूर झाले. सिंधू नदीपलीकडील प्रदेशात राहणार्‍या नागरीकांना हिंदू हे नाव मिळाले. अर्थात 'हिंदू' हे धर्माचे नाव पूर्वीचे अगदी तुरळक उल्लेख वगळता ( ते उल्लेखही साधारण इस्लामी राजवटीमधले आहेत) तसे अगदी अलीकडील म्हणजे ब्रिटिशकाळात प्रचारात आले. आणि त्यातही भारताच्या उत्तरेकडील भागाला हिंदुस्थान म्हणत कारण तो भाग तुलनेने सिंधू नदीला जास्त जवळचा तर दक्षिणेला दख्खनच म्हटले जाई. पेशवेकाळातल्या उत्तरेकडच्या स्वार्‍यांना हिंदुस्थानवर स्वारी असे म्हटलेले कित्येक उल्लेख आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिंदुस्थान हे प्राचीन नाव आहे न की हिंदुस्तान,हिमालया पासुन सुरु होउन हिंद महासागरांपर्यत देवांनी निर्मिलेला प्रदेश म्हणजे हिंदुस्थान. हिमालयात् समारभ्य यावत् इन्दु सरोवरम्। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते॥ हिंदु शब्द धर्माऐवजी राष्ट्रीयत्व म्हणुन मानला जायचा,भारतात तेव्हा दुसर्या धर्माचा उदय झाला नसल्याने तेव्हा सर्व रहीवाश्याना हिंदु म्हटल जायच,कालातंराने परदेशी प्रवाश्यानी ह्याला धर्माशी जोडायला सुरवात केल्याने हिंदु धर्म हा प्रचलीत झाला असावा

In reply to by श्री गावसेना प्रमुख

>>> हिमालया पासुन सुरु होउन हिंद महासागरांपर्यत देवांनी निर्मिलेला प्रदेश म्हणजे हिंदुस्थान. देवांनी निर्मिलेल्या कोणत्या ग्रंथात असे सांगितले आहे. (गम्मत नाही,गंभीरपणे विचारतो आहे) हिंदू असा उल्लेख कोणत्या धार्मिक ग्रंथात (वेद,पुराणे) येतो काय ? >>>हिंदु शब्द धर्माऐवजी राष्ट्रीयत्व म्हणुन मानला जायचा, राष्ट्रीयत्त्व वगैरे कल्पना अगदी अलिकडच्या असाव्यात असे वाटते. >>> भारतात तेव्हा दुसर्या धर्माचा उदय झाला नसल्याने तेव्हा सर्व रहीवाश्याना हिंदु म्हटल जायच,कालातंराने परदेशी प्रवाश्यानी ह्याला धर्माशी जोडायला सुरवात केल्याने हिंदु धर्म हा प्रचलीत झाला असावा हम्म. दुसर्‍या धर्माचा उदय भारतात झाला की परदेशात झाला, वेगवेगळे धर्म कधी अस्तित्त्वात आले याची माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. असो, पण बरीच माहिती मिळाली. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यामुळे ते काहीवेळा काहीबाही कोर्टासमोर सादर करतात. हिंदु हा धर्म आहे कि जीवनपध्दती आहे हा तुमचा मुख्यप्रश्न आहे धर्म आणि जीवनपध्दती म्हणजे एकच कि वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत हे स्पष्ट झाले पाहिजे. जीवनपध्दती म्हणजे दररोज जगण्यासाठी केलेली उठाठेव असे मला तरी वाटते. पण समाजजीवन पध्दत आणि धर्म ह्यांची सांगड घालता येवु शकते.खरतर धर्मनिरपेक्ष समाज हे अलिकडच्या काळातला शब्द आहे. त्याचा वापर बाबासाहेबांनी प्रथम केला आहे/असावा.पुर्वी समाजजीवन हे एकाच समुहाचे किंवा एकप्रकारच्याच जीवनपध्दती असणार्‍या लोकांचे असे.त्यामुळे हिमालयाच्या कुशीतील किंवा सिंधुनदीच्या खोर्‍यातील अथवा हिंदमहासागराशेजारील प्रदेशातील राहणार्‍या लोकाच्या समाजजीवनपध्दतीला हिंदु असे संबोधत असावेत.त्यातुन पुढे त्याच्या देवता,कर्मकांडे विकसित झाली असावित.

In reply to by वेताळ

लवादातील लोकाना सरकारची तिजोरी भरायची असते. त्यामुळे ते काहीवेळा काहीबाही कोर्टासमोर सादर करतात.
लवाद हे कोर्टच असतं हो. आणि या खटल्यात "आमचे देऊळ कुठल्याही धर्माचे नाही" हा युक्तीवाद देवस्थानाने सादर केला होता, सरकारने नाही!
...He contended that the temple is open to everybody without caste and creed. Anybody who have faith or not in Shiva, Hanuman, Durga may come or even the person who does not have faith in these deities, can also come. The temple does not belong to a particular religion. The expenditure so incurred are not of religious nature. Even the objects of the assessee are not the religious nature. Putting the idols is not a religious activity.

In reply to by आदूबाळ

Putting the idols is not a religious activity.
देवळाचा कारभार पहाणाऱ्या विश्वस्तांतर्फे हा युक्तिवाद येण्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी ठासून केलेलं सुप्रसिद्ध विधान आठवलं. "I did not have sex with that woman, Monica Lewinski."

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गावसेना प्रमुख का? बरं बरं... धागा जरा सिरीयस आहे म्हणून फक्त एकढेच 1 - ('अ'धर्मी) सोकाजी

खर तर काथ्या कुटायचा मला अजिबात अधिकार नाही. पण अगदी मुळावर आलय म्हणुन उगा शेंडे सोडवते. कुटत नाही आहे. तर माझ म्हणन हे की जेंव्हा "धर्म" ही संकल्पनाच मुळी अस्तित्वात नव्हती तेंव्हा पासुन सनातन धर्म हा अस्तित्वात आहे. आता त्याच्या बरोबर तुलना करायला बाकिचा कोणताच आधार नसल्याने हा अतुलनिय म्हणावा लागेल. मग नंतर स्वतःच्या मोठेपणाचे ढोल बडवणारे प्रेषित आले,( जो "माझ्या" शिवाय दुसरा कुणी महान नाही अस म्हणतो , मी एकटाच पुजनिय म्हणतो, असा गर्विष्ठ माणुस म्हणजे प्रेषित अस माझ तरी दारावर धर्म विकायला आलेल्या लोकांमुळे मत झालय. हे खोडायचा विनाकारण प्रय्त्न करु नये. कारण मला सांगायला येणारे विक्रेते तस म्हणौनच विकायचा प्रयत्न करतात) अन मग धर्म म्हणजे काहीतरी असा विचार करण्याची पद्धत आली. आता या सर्वातुन मुक्त असलेला आपला सनातन धर्म मग यांच्या कॅटेगिरीत बसवायचा म्हणुन धर्म अस संबोधायला हरकत नसावी. तसाही कुणीही याव अन बडवुन जाव अशी वेळ आली आहे सनातनवर. हे कलियुग आणि किती शतक आहे ब्वा?

In reply to by स्पंदना

अ.अ. सनातन धर्म म्हणन्यापेक्षा 'वैदिक धर्म' म्हटलं असतं तर लवादापुढे जाता आलं असतं काय ? ऋग्वेदात वेगवेगळ्या देवतांना उद्देशून ऋचा रचलेल्या आहेत म्हणतात तेव्हा अनेक देवता वैदिक धर्मात आहेत आणि वेद परमेश्वरानेच निर्माण केलेले असल्यामुळे आमच्या धर्माला वैदिक धर्म म्हणावे आणि आम्ही त्या देवांची उपासना करतो तेव्हा आमच्या धर्माचं नाव वैदिक धर्म आहे, पुढे सिंधूचा प्रदेश आणि तेथील रहिवासी म्हणजेच हिंदू आहे असे म्हणता आले असते, असे म्हटले असते तरी देवांचे धार्मिक काम म्हणून आयकरातून सूट मिळाली नसतीच. पण, आमचा वैदिक धर्म आहे, असे तरी म्हणता आले असते ? -दिलीप बिरुटे

'आमचे शिव मंदिर हे सर्व समाजासाठी खुले असते. ते कुठल्याही एका धर्माशी संबंधित नाही. शिवाय मूर्त्यांची प्रतिष्ठापना करणे हे काही धार्मिक कार्य होत नाही,' असा युक्तिवाद देवस्थान समितीने लवादापुढे केला. लवादाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आयुक्तांचा निर्णय फेटाळून लावला.
असे या बातमीत म्हटले आहे. म्हणजे धार्मिक कार्यांबद्दलचा देवस्थान कमिटीचा युक्तिवाद कोर्टाच्या जुन्या काही निकालांचा आधार घेत लवादाने मानला आहे असे दिसते.
'जिथे सर्व लोकच एकच कायदा आणि एका नियमाचे पालन करतात. विशिष्ट देवालाच भजतात. त्यांनाच समाज किंवा धर्म म्हणता येऊ शकते. एकसंध समाजाची ही व्याख्या केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चनांना लागू होते,' असेही लवादाने पुढे स्पष्ट केले आहे.
असेही पुढे म्हटले आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने जैन आणि बौद्ध हे ही धर्म नव्हेत. जुन्या उल्लेखांप्रमाणे ते पंथ आहेत. या आधाराने जे ख्रिश्चन्/मुस्लिम नाहीत ते सगळे हिंदू समजावेत का? का निधर्मी समजावेत? पाहू गेल्यास कम्युनिस्ट हेही निधर्मी. पण सगळे हिंदू काही कम्युनिस्ट नाहीत! :D जन्म दाखल्यात जात नोंदली नाही तरी हिंदू हा धर्म नोंदवावा लागतो. फक्त आयकरासाठी हिंदू हा धर्म नाही आणि इतर वारसा हक्क, लग्नाबद्दलचे कायदे इ इ साठी हिंदू हा धर्म आहे असे म्हटले गेले तर ती विचित्र गोष्ट आहे. तसेही हिंदू हे सहिष्णु असल्यामुळे (हा शब्द वापरावा लागला. सॉरी बिरुटे सर! :D)कोणी धर्म म्हणतो, कोणी जीवनपद्धती म्हणतो, कोणी अडगळ म्हणतो. तर असोच!

एकाच विचारधारेतून निरनिराळे राजकीय पक्ष उदयाला येतात. तसेच एकाच तत्वज्ञानातून निरनिराळे पंथ उदयाला आले तर त्या एकाच तत्वज्ञानाच्या छत्रीखाली त्यांना बसवायचं की वेगवेगळं? मला असं वाटतं की कुणीही उन्हात न जाता सगळेच सावलीत सामावून जात असतील तर हरकत काय आहे?राजकीय पक्षांनाही युतीचं ऑप्शन असतंच की.. पण तरी त्यांना 'आघाडी' म्हणतातच ना? का ते राजकीय पक्षच नाहीत म्हणायचं? 'हिंदू धर्म' अशी संकल्पना या प्रकारची आहे असं मला वाटतं.. अनेक पंथ एकत्र आलेला हा धर्म आहे. पण सगळे एका छायेत गुण्यागोविंदाने नांदत आहेत (कारणे सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक काय वाटेल ती असोत..) मग त्याला धर्म म्हणायला हरकत काय आहे? (या एकंदर हिंदुत्वाच्या चर्चेबद्दल सुशीलकुमार शिंदेना विचारावं काय? त्यांचा बराच अभ्यास आहे यावर.. :p माफ करा या पानचटपणाबद्दल..)

त्याचे उत्तर परत मूळ हिंदुत्वाच्या उहापोहात जाते, ज्यात "हिंदू" हे भारताच्या सांस्कृतिक आचार-विचारांशी नाळ असणार्‍यांना म्हणलेले आहे. त्याच अर्थाने मध्यंतरी येथे दिल्या गेलेल्या एका चर्चेतील दुव्यात भालचंद्र नेमाड्यांनी म्हणलेले दिसते. विकीवरील माहीतीप्रमाणे: In 1995, Chief Justice P. B. Gajendragadkar was quoted in an Indian Supreme Court ruling: When we think of the Hindu religion, unlike other religions in the world, the Hindu religion does not claim any one prophet; it does not worship any one god; it does not subscribe to any one dogma; it does not believe in any one philosophic concept; it does not follow any one set of religious rites or performances; in fact, it does not appear to satisfy the narrow traditional features of any religion or creed. It may broadly be described as a way of life and nothing more. असे दिसते आहे की थोडक्यात, गेल्या वर्षी सरकारने कायदा बदलून रिलीजिअस संस्थांना करसवलतीतून बाजूस केले. या बातमीनुसार त्याच्या विरोधात सर्वधर्मिय आले होते. पण त्याही आधी, मला वाटते ९०च्या दशकात रामकृष्ण मिशन आणि वर विकीचा दिलेला संदर्भ असलेल्या प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेने स्वतःस हिंदू म्हणण्यापासून नाकारले. वरकरणी कारण काही असले तरी नेहमीप्रमाणे, शेवटी कारण असते ते "सबसे बडा रुपय्या!" :-)

सुप्रिम कोर्टाने जे म्हणले आणि जे काही आयकर खाते/लवाद म्हणत आहे त्याचा विचार करताना मला एक प्रश्न पडला... मी शंकराची पुजा करतो. पण आता जर मी हिंदू धर्मियच नसेन तर मग मी कोण ठरतो? सेक्यूलर का स्युडोसेक्यूलर? ;)

In reply to by विकास

मी मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाही. पण "धारयति इति धर्मः" ही सायणाचार्याने केलेली व्याख्या विचारात घेतली तर हिंदू हा माझा धर्म आहे. तसं नसेल तर मी निधर्मी की अधर्मी की कम्युनिस्ट? "य॒ज्ञेन॑ य॒ज्ञम॑यजन्त दे॒वास्तानि॒ धर्मा॑णि प्रथ॒मान्या॑सन्।" हे पुरुषसूक्तात म्हटले आहे. इथे तर ते अनेक धर्मांबद्दल बोलत आहेत. हे धर्म कोणते? भगवद्गीतेत म्हटलेले "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" आणि "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" यातील धर्म कोणता?

In reply to by पैसा

भगवद्गीतेत म्हटलेले "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" आणि "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" यातील धर्म कोणता?
तो शब्द इथे कर्तव्य (किंवा तत्सम काही) या अर्थाने वापरला जात असावा. जाणकार प्रकाश टाकतीलच.

सर तुम्ही मोहोळावर दगड मारला आहे ;) आम्ही फक्त वाचनमात्र राहून ज्ञानप्राप्ती करावी म्हणतो.

लवादापुढचा खटला अमुक एका गोष्टीवरील खर्च धार्मिक खर्च आहे का या प्रश्नासंबंधी होता. त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे दिले आहे. परंतु त्याची कारणमीमांसा करताना अकारण हिंदू नावाचा धर्मच नाही असा निर्णय केला. हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही ही खरी गोष्ट असली तरी त्याचा अर्थ शंकराच्या पूजाअर्चेवरील खर्च धार्मिक नाही असा काढण्याचे कारण नव्हते. [Tribunal has apparently exceeded its brief]. हिंदू धर्माचा इथे काही संबंध नव्हता. उच्च न्यायालयात आव्हान देणे गरजेचे आहे.

In reply to by नितिन थत्ते

अमूक एक खर्च धार्मिक आहे का आणि तो करसवलत पात्र आहे का त्याबाबत लवादाने हिंदू हा धर्म नाही आणि अमूक देवतांवरचा खर्च हा धार्मिक नाही ही जशी लवादाची चूक दिसते त्या प्रमाणे मंदिराच्या विश्वस्तांनी जे तारे तोडले त्याबद्दलही बोलले पाहिजे. एकतर मंदिरं ही वैश्विक नाहीत त्यामुळे मंदिरं ही कोणा एका धर्माची नाही हे म्हणने चूकच झाले कारण मंदिरं ही वैश्विक असती सर्व धर्माचे लोक एकाच ठिकाणी प्रार्थना आणि इतर सर्व उपासना करण्यासाठी येतात तेव्हा असं म्हणता आलं असतं दुसरी गोष्ट विश्वस्तांना इतकी संपत्ती मिळते तर त्यांनी 'धार्मिक खर्च' करसवलत पात्र आहे का या दाव्याला जायची तशी गरज नव्हती. उलट त्या विश्वस्तांना 'सामाजिक उपक्रमासाठी' अशी संपत्ती वापरुन तिचा विनियोग उत्तमपणे करुन करसवलत मिळवता आली असती. हिंदू नावाचा धर्म नाही ती आचरणपद्धतीच आहे हे लवादाचे मत/निर्णय मान्य करण्याशीवाय सध्या तरी कोणता पर्याय दिसत नाही. उच्च न्यायालयात तरी हिंदू कायद्या अंतर्गत हिंदूची व्याख्या काय आहे आणि भविष्यात असा प्रसंग आला तर न्यायालय अमूक अमूक आचरणपद्धतीला हिंदू तरी म्हणेल काय असा एक प्रश्न पडला आहे, असो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंदीराच्या विश्वस्तांच्या या मुद्याशी मी देखील असहमत आहे. पण मी माझ्या इतर प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे रामकृष्ण मिशन आणि प्रजापिता ब्रम्हकुमारी यांनी देखील असेच टॅक्समुळे असे केले होते. त्याचा संदर्भ कदाचीत आत्ताच्या प्रकरणापेक्षा वेगळा असेल... आत्ता २०११ साली जो नियम लागू केला त्याप्रमाणे धर्मादाय संस्थांनी, तुम्ही म्हणता तशी 'सामाजिक उपक्रमासाठी' अशी संपत्ती वापरली तरी करसवलत मिळणार नाही आहे. आणि तो वादाचा मुद्दा आहे. खालील बातमी पहा... Religious trusts protest abolition of tax exemption

पूर्वी हिंदू नावाच धर्म होता की नाही माहित नाही. पण आज नक्कीच आहे. आणि कर वसूल करायचा असेल तर नक्कीच आहे! सगळ्या 'धार्मिक' स्थळांकडून पिळून पिळून कर वसूल करावा. :)

In reply to by कवितानागेश

सगळ्या 'धार्मिक' स्थळांकडून पिळून पिळून कर वसूल करावा.
सहमत. (अर्थात तपशीलात सगळे असते... devil is in detail. :) ) पण हे जे काही केले आहे त्यात कुठल्याही धर्माच्या/जातीच्या नावाने असलेली विनानफातत्वावरील मदत करणारी संस्थेने देखील करसवलत गमावली आहे. परीणामी कुठल्याही धर्माच्या नावाने चालणार्‍या शिक्षणसंस्था (नुसत्याच मदरसा नाहीत), इस्पितळे आणि इतर मदतकार्य करणार्‍या संस्थांना देखील त्यांच्या उत्पन्नाच्या ३०% कर म्हणून भरावे लागणार आहे. मदरसांचा अपवाद वगळल्यास, शिक्षणसंस्था आणि इस्पितळे ही धर्माच्या नावाने काढलेली असली तरी ती सर्वधर्मियांना खुली असतात हा महत्वाचा मुद्दा आहे. अशा सेवांवर परीणाम होऊ शकतो. शिवाय जे कोणी व्यक्तीगत करात करसवलत (चॅरीटेबल संस्थांना देणगी दिल्यामु़ळे टॅक्स डिडक्शन) मिळण्यासाठी करतात ते देखील अशा देणग्या थांबवणार... वर जे काही या संस्था मदतकार्य करत आहेत ते करण्यास सरकार उपयोगाचे असू शकत नाही. सेक्यूलर संस्था असल्या तरी त्या देखील सर्वत्र पुरेशा असू शकणार नाहीत हे वास्तव आहेच. त्यामुळे हा कायदा बदलणे महत्वाचे आहे. त्यातील पळवाटा बंद करणे महत्वाचे आहे, जेणे करून कुठल्याही धर्मस्थळाला त्याचा गैरउपयोग करता येणार नाही. पण सेवाभावी संस्थांना मात्र करसवलत मिळेल.

In reply to by विकास

त्यामुळे हा कायदा बदलणे महत्वाचे आहे. त्यातील पळवाटा बंद करणे महत्वाचे आहे, जेणे करून कुठल्याही धर्मस्थळाला त्याचा गैरउपयोग करता येणार नाही.> सहमत. तसेही ऐहिक गोष्टींमध्ये आणि कायद्यामध्ये देव-धर्म आणू नये. दोन्ही गोष्टी करप्ट होतात! :) सेवाभावी संस्थांना थोडीफार सवलत द्यायला हरकत नाही. फक्त एखादी संस्था 'सेवाभावी' आहे की नाही हे ठरवताना पुन्हा घोळ होउ शकतात.

मला जे म्हणायचे होते ते बहुतेक सर्वांनी आधीच म्हटल्यामुळे पास! जस्ट २ पैसे. संबंधित माहिती पुरवल्याबद्दल आदूबाळ, विकास अन नितीन थत्ते यांचे आभार. बाकी लै जुनी तक्रार इथेही आहेच. अन्य धर्मांच्या चष्म्यातून हिंदू धर्माकडे पाहिले का जावे? हे म्हंजे मिसळ आजिबात गोड नाही किंवा तमिळनाडूत मराठी बोलतच नाहीत असे म्हण्ण्यापैकी आहे.

हिंदू हा धर्म आहे की नाही यावर आम्ही काही बोलणार नाही. आमचे मते " धर्म" म्हणजे attribute .या अर्थाने या जगात अस्तित्वासाठी झगडणे व अखेर त्यात पराभूत होणे. हा एकमेव सनातन धर्म आहे. जातस्य ध्रुवो मॄत्यू .बाकी धर्म हे फक्त मानवी मनाच्या खेळाचे प्रताप आहेत.

In reply to by साऊ

साऊ, आपल्या धर्माची अशी सामाजिक चेष्टा होतांना पाहून मलाही तुमच्यासारखंच खूप वाईट वाटतं. पण, आपल्याला 'हिंदू हे धर्माचं नाव आहे का' हे सिद्ध करता येत नाही, हिंदू तरी का म्हणायचं हे स्पष्टपणे सांगता येत नाही. आपल्या धर्माची गोष्ट निघाली की आपण पाहा ना अमूक धर्मात तरी तसं कुठंय, अमूक धर्मावाल्यांना कोणी बोलत नाही. अमूक धर्मावाल्यांच्या संपत्तीचं काय, अमूक धर्मावाल्यांची एकगठ्ठा मतं मिळणार आहेत ना असं मूळ विषय सोडून निरर्थक बोलत असतो. असो. मलाही तुमच्यासारखं दु:ख वाटतंय म्हणून इथे प्रतिसादात मन मोकळं करतोय. -दिलीप बिरुटे

धार्मिक संस्थांना दिलेली देणगी ही करसवलतपात्र ठरू शकत नाही हे माहीत आहे. पण धार्मिक संस्थांनी चॅरिटेबल संस्थांना दिलेली देणगी हीही करसवलतपात्र नाही का? म्हणजे धार्मिक संस्थांचे उत्पन्न हे करसवलतपात्र ठरूच शकत नाही का? वर श्री.विकास यांच्या प्रतिसादात तसा रोख दिसला. कुणी खुलासा करेल काय?

In reply to by राही

धार्मिक संस्थांचे उत्पन्न हे सर्वांसाठी असलेल्या चॅरिटेबल संस्थांवर खर्च केले तरी ते करसवलतपात्र ठरू शकत नाही का? दाता संस्थेची ध्येये/उद्दिष्टे ग्राहक संस्थेलाही लागू असतात का? इथे स्पॉन्सरर किंवा पेट्रन अशी भूमिका घेता य्रेत नाही का? अमक्याच्या विद्यमाने चालवलेली किंवा प्रणीत अशी (शाळा, हॉस्पिटल वगैरे)एक संस्था असे जेव्हा आपण आम भाषेत म्हणतो तेव्हा त्याचा कायद्याला अभिप्रेत अर्थ काय असतो?

In reply to by राही

धार्मिक संस्थांचे उत्पन्न हे सर्वांसाठी असलेल्या चॅरिटेबल संस्थांवर खर्च केले तरी ते करसवलतपात्र ठरू शकत नाही का?
Definitions of non-profit organizations which will enjoy income and wealth tax exemptions exclude trusts or institutions established for a particular caste or religious community excludes religious trusts and will have to pay tax at flat rate of 30 %. या वाक्यामुळे असे वाटते की जर चॅरीटेबल संस्था ह्या विशिष्ठ धर्माशी संलग्न वाटल्या तर त्यांना आणि त्यांना देणगी देणार्‍यांना करसवलत मिळणार नाही. मग उत्तर भारतातील हिंदू धर्मशाळा, कॉन्व्हेन्ट स्कूल्स, हॉस्पिटल्स वगैरे जे काही असते ते जरी धर्माच्या नावाने असले तरी त्यात इतर धर्मियांना प्रवेश असतोच आणि त्यांचे काम हे समाजसेवा करणारेच असते. धर्मस्थळास करसवलत देऊ नये कर आकारणी व्यक्तीगत करापेक्षा अथवा अगदी उद्योगांच्या करापेक्षा वेगळी / कमी असावी असे मला वाटते. पण नॉन प्रॉफिट अथवा चॅरीटेबल संस्थां म्हणून धर्मस्थळांना धरले जाऊ नये. या चर्चेतील केस मधे पळवाट शोधून कर चुकवण्याचा प्रकार केला गेला आहे. कधीकाळी ऐकलेले आठवले की अनेक उद्योगपती अधिकृतपणे तिरूपती बालाजीस धंद्यातला भागीदार दाखवतात. जे काही आठवते त्याप्रमाणे त्याचे कारण श्रद्धा नसून करभरणीत सवलत मिळते का असेच काही असते असे आहे.

श्रीधर स्वामी यांनी त्यांच्या आर्य संस्कृती (मुंबई, ढवळे प्रकाशन १९९१ पृ १२-१४) या पुस्तकात हिंदू या शब्दाच्या काही व्याख्या आणि उहापोह संस्कृत कोश आणि इतर ग्रंथ वापरून केला आहे. बऱ्याच अभ्यासकांच्या मते सिंधू नदीच्या तटावर राहणारे समूह ते हिंदू. परंतु हे रुपांतर पाणिनीच्या नियमानुसार सुद्धा करता येईल (3: 4. 57 सर्ह्यपिच्च). श्रीधर स्वामी नंतर हिंदुच्या सहा व्याख्या देतात: (1)शब्दकल्पद्रुम या कोशानुसार हिंदू म्हणजे कोणीही व्यक्ती जी सर्व काही (नैतिकदृष्ट्या) हीन असेल त्याचा तिटकारा आणि त्याग करते (हीनम् दुष्यतीति हिन्दुः); (२) अद्भुतकोशानुसार हिंदू (किंवा हिंदु) या पुल्लिंगी शब्दाने (व्यापक अर्थाने यात स्त्रिया पण येतात!) दैत्य आणि दुष्ट लोकांचा प्रतिकार करणाऱ्या रूपवान (!) अशा व्यक्तीचा बोध होतो (हिन्दुर्हिन्दूश्च पुम्सि द्वौ दुष्टानाम् च विघर्षणे रूपशालिनि दैत्यारौ); (३) रामकोशानुसार हिंदू वाईट, अनादरणीय, किंवा अविश्वासू नसतो. [उलट]अशी व्यक्ती विद्वान, धर्मपालक, आणि श्रुतीपरायण असते (हिन्दुर्दुष्टो न भवति नानार्यो न विदूषकः सद्धर्मपालको विद्वान् श्रौतधर्म परायणः); (४) कविकोशानुसार हिंदू म्हणजे नारायण किंवा इतर कोणत्याही देवतेचा भक्त (हिन्दुर्हि नारायणादिदेवता भक्तः); (५) पारिजातहरण नाटकाप्रमाणे हिंदू अशा व्यक्तीला म्हणता येईल जी (१) शरीर आणि मनातील सर्व दोष आणि पातक तप इत्यादी साधनांनी दूर करते आणि (२) तीक्ष्ण शस्त्रांनी शत्रूंचा नाश करते (हिनस्ति तपसा पापान् दैहिकान् दुष्टमानसान् हेतिभिः शत्रुवर्गम् च स हिन्दुरभिधीयते); (६) माधवदिग्विजय प्रमाणे कोणतीही हिंदू व्यक्ती सर्व मंत्रांचे मूळ ओम्कारामध्ये पाहते, पुनर्जन्मावर दृढ विश्वास ठेवते, गोपूजक असते, भारताला [भारत देशाला?] सर्वश्रेष्ठ गुरु मानते आणि सर्व प्रकारची हिंसा त्याज्य ठरवते (ॐ कार मूल मंत्राढ्यः पुनर्जन्म दृढाशयः गोभक्तो भारत गुरुः हिन्दुः हिंसानदूषकः). श्री कृ. रा. जोशी हे त्यांच्या हिंदू जीवन पद्धती (प्रज्ञालोक खं ४८ अं ३ October २००५) या लेखात म्हणतात कि कलियुगात यवनांच्या [शक आणि कुषाण] त्रासाला कंटाळून हिंदूंनी विंध्यपर्वताच्या दिशेकडे स्थलांतर केले (कालीकापुराण इ. स. ५/६वे शतक; कलिना बलिना नूनमधर्माकलिते कलौ यवनैर्घोरमाक्रांता हिन्दवो विन्ध्यमाविशन). वरील व्याख्यांचा नीट विचार केल्यावर असं म्हणता येईल कि हिंदू हा धर्म किंवा religion नसून [मानव] धर्मावर आधारित एक जीवन पद्धती अथवा प्रणाली आहे [आगम किंवा मत]. हिंदूप्रमाणेच या भारत देशात जैन, बौद्ध आणि शीख या आगमांचा अथवा मतांचा उगम आणि वाढ झाली आहे.

In reply to by श्रीनिवास टिळक

ह्या प्रतिसादा बद्दल विषेश आभार !! ( मला फक्त (हीनम् दुष्यतीति हिन्दुः); इतकेच माहीत होते आजपर्यंत !! )

In reply to by श्रीनिवास टिळक

श्रीधर स्वामींचे काही लेखन वाचलेले नाही पण आपल्या प्रतिसादातील दोन मुद्दे पटले. आणि माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार. १] सिंधू नदीच्या तटावर राहणारे समूह ते हिंदू. २] हिंदू हा धर्म किंवा religion नसून [मानव] धर्मावर आधारित एक जीवन पद्धती अथवा प्रणाली आहे -दिलीप बिरुटे

रस्त्यावर काही शाळकरी वाटणारी मुले शाळा-शाळा खेळत होती. खेळत असतांना एकमेकांच्या इयत्तांची वगैरे माहिती घेत होती. कुणी तिसरीचा कुणी सहावीचा तर कुणी अजून कोणत्या वर्गाचा. कुणी या शाळेचा तर कुणी त्या शाळेचा. कुणी मराठी माध्यमातला तर कुणी इंग्रजीचा. कुणाचा गणवेश निळा तर कुणाचा किरमिजी! कुणाची ब्याग जड तर कुणाची किंचित हलकी. कुणाचे ओळखपत्र आडवे तर कुणाचे उभे तर कुणाचे फोटोसहीत तर कुणाचे फोटोशिवाय! पण प्रत्येकजण काही न काही वर्ग शिकलेला होता हे नक्की! मग त्यातल्या काही मुलांनी शिकलेला असण्याचे काही निकष ठरविले. त्यानुसार शिकलेला असलेला म्हणजे:
  1. शाळेचा विद्यार्थी असावा
  2. अंगावर गणवेश असावा
  3. पाठीवर पुस्तकांची ब्याग असावी
  4. खिशात शाळेचे ओळखपत्र असावे.
असे ठरवून ती मुले मग घरी जाऊ लागली. जाताना त्यांना व्यक्ती भेटली ती एका विद्यापीठात प्राध्यापक होती. हे प्राध्यापक अनेक वेळा पी एच डी करून नवनवीन विषयांत संशोधन करीत होते. मुलांनी त्या प्राध्यापकास तुम्ही शिकलेले आहात का असे विचारले. प्राध्यापक महाशयांनी त्यांना असे का विचारात आहात असे हसून विचारले. मुलांनी त्यांना वरील निकष सांगून त्या निकषांत बसणारे लोकच शिकलेले असतात असे सांगितले. त्यानुसार ते प्राध्यापक:
  1. कोणत्याही शाळेचे विद्यार्थी नव्हते.
  2. त्यांच्या अंगावर गणवेश नव्हता
  3. त्यांची पाठीवर पुस्तकांचे ओझे नव्हते
  4. त्यांच्याजवळ शाळेचे ओळखपत्र नव्हते.
त्यावरून त्या मुलांनी हे महाशय शिकलेले नाहीत असा निष्कर्ष काढला.

In reply to by वामन देशमुख

आता एक करा जमत असेल तर, त्या लवादाला हे पत्र लिहुन कळवा. अन प्रा. डॉ. काय कायदेशीररित्या करता येतं का पहा याच्या विरोधात. काय सह्या बिह्या पाहिजे असतील तर आम्ही देउ.

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद! तथापि, "हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत." आणि "अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल." अशी माझी अभ्यासांती ठाम मते बनलेली आहेत.

In reply to by वामन देशमुख

>>>"अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल." गंमतीशीर मत :)

In reply to by वामन देशमुख

"अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल." म्हणजे? तो तसा झालेला नाहिय्ये ?

In reply to by वामन देशमुख

"हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत." आणि "अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल." -- अशी माझी अभ्यासांती ठाम मते बनलेली आहेत.
ही २०१३ पर्यंतच्या अभ्यासावरून बनलेली 'ठाम मते' आज २०२३ मधेही तितकीच ठाम आहेत किंवा कसे, हे जाणून घ्यायला आवडेल. थोडक्यात म्हणजे २०१४ पासूनच्या सत्ताबदलाचा परिणाम याविषयी कितपत झाला आहे असे तुम्हाला वाटते ?

In reply to by स्पंदना

>>> प्रा. डॉ. काय कायदेशीररित्या करता येतं का पहा याच्या विरोधात. कायदेशीर काही करता येतं किंवा नाही त्याबद्दल मला कोणताही इंट्रेष्ट नाही. विचारांचे आदान-प्रदान समजून घेणे, ज्ञानकण जमविणे, बोध घेणे, एवढाच माझा हेतू आहे. >>> काय सह्या बिह्या पाहिजे असतील तर आम्ही देउ. कोणी इंट्रेष्टेड माणूस काही कायदेशीर कार्यवाही करत असेल तर मी त्यांना शुभेच्छा देईन. सह्या बिह्या देणार नाही. -दिलीप बिरुटे (स्पष्ट)