Skip to main content

सावध रहा ! सावध रहा !

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 05/04/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आपल्या सर्वांसमोर एक मोठे संकट येत आहे. या संकटाचा आपल्याला सर्वांना मिळून मुकाबला करायचा आहे. आपले माननीय सूचना-प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या तीव्र आकलन शक्ती सामर्थ्यांने त्यांना जे जाणवले ते त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी अतिशय कनवाळू होऊन सांगितले आहे. आता त्यांनी जे सांगितले आहे त्यामधे कोणतीही खोट न काढता आपण आपले संरक्षण केले पाहिजे. आजपासून तयारीला लागा. स्वतःची काळजी घ्या ! आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ! परिसरातील नागरीकांना सावध करा. कुठेही काही संशयास्पद हालचाल दिसली तर तत्काळ योग्य त्या ठिकाणी कळवा.

अ‍ॅन्ड्रॉईडः अडखळती पहिली पाऊले

लेखक लंबूटांग यांनी शुक्रवार, 05/04/2013 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल ने विकत घेतल्यानंतरही अ‍ॅन्ड्रॉईडचे मुख्य ध्येय तेच होते - एक असा प्लॅटफॉर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल. त्यामागे अजून एक उद्देश हाही होता की अशी खुली बाजारपेठ उपलब्ध करून देऊन सेलफोन कंपन्यांची हुकुमशाही मोडीत काढणे. तो पर्यंत अमेरिकेत सेलफोन सेवादाते त्यांना हवे तसे फोन हँड्सेट निर्मात्यांकडून बनवून घेत होते. ह्याला कारण म्हणजे अमेरिकीतील कंत्राट पद्धत. तुम्ही तुमच्या सेवादात्याबरोबर २ वर्षे बांधिलकीच्या कंत्राटावर सही करायची आणि त्या बदल्यात तो सेवादाता तुम्हाला फुकट अथवा नगण्य किमतीत हँड्सेट देणार.

कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 05/04/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ स्मूथ मॅंन्गो टॅन्गोपार्श्वभूमी: उन्हाळ्याच्या चाहूलीबरोबरच आंब्याची चाहूलही लागली आहे. बाजारात आंब्यांची आवक हळूहळू सुरू झाली असली तरीही घरोघरी आंब्याचा मोहक दरवळ पसरायला म्हणावी तशी सुरूवात अजून झालेली नाहीयेय. ह्या वर्षीचा उन्हाळा, आंबे स्पेशल कॉकटेल्सनी, 'ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव' असा दणाणून सोडायचा विचार आहे. त्यातले हे पहिले कॉकटेल, स्मूथ मॅन्गो टॅन्गो. खर्‍याखुर्‍या आंब्याचे नसले तरीही, आंब्याचे आइसक्रीम आणि आंब्याच्या रस यांचा वोडकाला दिलेला ट्वीस्ट म्हणजे आजचे हे कॉकटेल.

राहुल गांधी : दुसरा राजीव गांधी !

लेखक तर्री यांनी शुक्रवार, 05/04/2013 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल राहुल गांधी यांनी सी.आय आय च्या सभेमध्ये भाषण केले. केवळ भाषण म्हणून मूल्यमापन करायचे तर ते एक प्रांजळ प्रकटन होते. त्यामध्ये नव्या कल्पना , नवी प्रतिभा यांचा सुरेख संगम होता. चप्पल नेमकी कुठे लागते आहे ? हे त्यांना आता समजते आहे. समस्या समाधानाची पहिली पायरी म्हणजे समस्या नेमकी समजणे , आणि ते त्यांना जमले आहे असे वाटते. समस्या समाधानाची दुसरी पायरी म्हणजे उपाय योजना करणे. येथे मात्र राहुल गांधीचा अननुभव स्पष्ट दिसून येतो आहे. राहुल गांधींचा एकूण सूर हा "खूप झाले राजकारण - आता कामाला लागा " असा होता.

तू, मी अन…..!!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 05/04/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
तू, मी अन…..!!! तप्त निखारे आणि वाऱ्याची झुळूक , रेतीमध्ये लिहिलेली धूळ त्यावर समुद्राची लाट .... …… तू, मी अन वारा .......सगळेच दिशाहीन ...!! पेटलेली शेकोटी फुललेली आग , उजेड देणारा दिवा जाळणारी मात्र वात…. ….. तू, मी आणि धरणी .....उरात फक्त धगधगणारा ओलावा… !! समुद्राला साथ ओळखीच्या किनाऱ्याची , चंद्राला त्याच्या टिपूर चांदण्यांची …. …… तू, मी आणि वाळ्वंट .....साथीला फक्त मृगजळ ....!! सुर्य फक्त प्रकाशात दिसणारा , चंद्र अंधारातही लोभसवाणा ….. ….. तू, मी आणि स्वप्न .......

वेदना

लेखक रेशा यांनी शुक्रवार, 05/04/2013 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई वेदना मुकेपणाची, सलत आत राही निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई ... रेशा
काव्यरस

छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना

लेखक एस यांनी गुरुवार, 04/04/2013 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणाविषयी थोडेसे...
प्रस्तावना चित्रकला ही जगातील आदिम कला समजली जाते. अगदी जैव-सामाजिकशास्त्रीय पद्धतीने विचार केला तर किमान सस्तन प्राण्यांच्या विकासात अनुकरणाला खूप महत्त्व असल्याचे दिसून येईल. अनुकरणाची सवय आणि अंगभूत शारीरिक वैशिष्ट्ये यांची सांगड घालून मानवाने प्रगतीचे विविध टप्पे गाठले आहेत. हाताच्या अंगठ्याचे इतर बोटांपासून वेगळे असणे हे वैशिष्ट्य आपल्याला खूपच वेगळी क्षमता प्राप्त करून देते. यातूनच दृश्य प्रसंग, वस्तू, प्राणी इ.

पी आय ए- पी के ३२६ अपहरण

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 04/04/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च १९८१ मध्ये पाकिस्तानात कार्यरत असणारी एक दहशतवादी संघटना अल झुल्पिकारने पाकिस्तान विमान कंपनीचे विमान अपहरण केले. या दहशतवादी गटाचा नेता होता पाकिस्तानचे माजी अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांचा मुलगा मुर्तजा भुत्तो . हे अपहरण नाट्य तब्बल १३ दिवस चालले होते त्यावेळी हे सर्वात जास्त काळ चाललेले अपहरण नाट्य होते. पी आय ए चे विमान उड्डाण क्र. पी.के. ३२६ नियमित देशांतर्गत वाहतुकीसाठी दिनांक २ मार्च, १९८१ रोजी कराचीहून पेशावरच्या दिशेने झेपावले. या विमानात एकुण १३५ प्रवासी आणि ९ कर्मचारी मिळून १४४ जण होते.

भानोळी

लेखक साबुदाणा खिचडी यांनी गुरुवार, 04/04/2013 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
a बारीक चिरलेला कोबी - २ वाट्या डाळीचं पीठ (बेसन) - २ वाट्या नारळाचे दूध - १ वाटी मिरची+कोथिंबीर+आलं+लसूण वाटण २ चमचे २ अंडी फेसून (भानोळी हलकी होण्यासाठी) सोडा चिमूटभर तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार गरम मसाला - १ चमचा हळद - १ चमचा धणे-जीरे पूड - १ चमचा मीठ व साखर चवीनुसार तेल - ४ चमचे भानोळी केकसारखी दिसते. कोबीप्रमाणेच फ्लॉवर किंवा करंदीची किंवा कोळंबीचीदेखील भानोळी बनवतात.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १३ : परतीची कहाणी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 04/04/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...