Skip to main content

संमोहरमल

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 07/04/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी .....................अज्ञात
काव्यरस

॥ पगाराचा दिवस॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 07/04/2013 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल अगदी बर होत हातात पगार मिळत होता किती मिळाला पगार तिथल्या तिथ कळत होता पगाराचा दिवस तो सर्वांनाच प्यारा होता हातात पगार घेण्याचा आनंदच न्यारा होता पगाराच्या दिवशी दांडीबहाद्दर पण यायचे पगाराच्या रांगेमध्ये पुढे ऊभे रहायचे बायको पण विचारायची झाला का हो पगार? आणला आहे घरी की खेळलात सर्व जुगार मुलांना खाऊ आणायची हौस तुमची फिटली स्वतःसाठी मात्र आणली असेल बाटली आता मात्र तसे नाही ईसीएसने पगार जातो आपापल्या बँकेत खात्यावरती जमा होतो कधी जातो कधी घेतो ते पण कळत नाही हातात पगार घेण्याचे समाधान मिळत नाही

छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार

लेखक एस यांनी रविवार, 07/04/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे लेख - कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
कॅमेर्‍यांच्या रचनेतील चौकटीचे महत्त्व
आधुनिक कॅमेरे आणि त्यांचे खापरखापरखापरपूर्वज यांच्यात आज जमीनअस्मानाचा फरक दिसून येत असला तरी आजही छायाचित्रणाचे आणि पर्यायाने कॅमेर्‍यामागचे तत्त्व तेच राहिले आहे. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, कॅमेरा ऑब्स्क्युरा (Camera Obscura) हा सर्व कॅमेर्‍यांचा पूर्वज मानला जातो.

नवा जिल्बिवाला

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 07/04/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.

समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत

:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या?
काव्यरस

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/04/2013 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबई , अनिधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी इत्यादी अश्रु ढाळतात - त्यांना पाहून मला काय वाटते मगर प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी मगर हा अश्रु ही ढाळीत होता. मुंबईचे मृगजळ मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.

दोन माता

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 06/04/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
माती आणि माता दोघिहि समान, माती अंकरुनी देई वन,धान्या , माता अंकरुनी देई पुत्र,कन्या, माती देई दऱ्या ,डोंगरा आकार, माता देई पुत्र,कन्या संस्कार , माती आणि माता यास समान द्या मान , दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.
काव्यरस

संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 06/04/2013 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
'पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल. ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे.

पक्ष विचारधारा - साम्य आणि भेद

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 06/04/2013 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
अन्या दातार यांनी एका धाग्यावर (http://www.misalpav.com/comment/reply/24386/475028) "भाजप विचारसरणी व काँग्रेस विचारधारा यात नेमका काय फरक आहे?" हा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून हा धागा केला आहे. प्रतिसाद खूप मोठा असल्याने धागा करणे योग्य वाटले. हा धागा किंवा हा विषय योग्य न वाटल्यास प्रशासकांनी धागा नष्ट करावा. _______________________________________________________________________________ हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. याचे उत्तर खूपच अवघड आहे.

ब्रोकोली टोमाटो सूप

लेखक सोनलि यांनी शुक्रवार, 05/04/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :३-४ ब्रोकोली चे दाठी सकट मध्यम तुकडे , १ लहान किवा मोठा असेल तर अर्धा टोमाटो , १ लहान चमचा आले लसुन पेष्ट , एक तमाल पत्र ,अर्धा लहान चमचा मिरी पावडर , एक मोठा चमचा कांदा पेष्ट किवा लहान कांदा बारीक चिरून , मीठ , एक मोठा चमचा साजूक तूप, एक चमचा जिरे चिमुट भर हिंग.

काही उपाय ?

लेखक पूनम शर्मा यांनी शुक्रवार, 05/04/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर ही माहिती मि.पा. वर टाकणे कितपत योग्य आहे माहित नाही, पण म्हटल पाहूया प्रयत्न करून. माझ्या घरी काम करणारी बाई आहे. दोन वर्षापुर्वी काही कारणास्तव आपले दागिने तिने गहाण ठेवले, इथे सांगण्यासारखी गोष्ट अशी की दागिने तिने बँकेत गहाण ठेवले जेणेकरून १% व्याज लागेल. हे बँक खाते तिच्या पतीच्या मित्राच्या नावावर होते. (त्या बँकेत ह्यांचे खाते नव्हते ). ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली, ही वेळोवेळी व्याज सुद्धा भरत होती. दरम्यान तिच्या पतीचे त्या मित्राबरोबर भांडण झाले.