Skip to main content

प्रेम

लेखक दिपक वायळ यांनी बुधवार, 24/04/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझे केले तु damage बदलुन टाकली तु माझि वेडी वाकडी image कधीच नव्हती कुणासाठी आता आहे तुझ्यासाठी craze आयुष्याच्या माझा चालु आहे हा sensitive phase कुठे हि पाहता मला दिसते फ्क्त तुझि image बोलायला तुझ्याशी आणतो उसनं courage तुझ प्रेम म्हण्जे एक alcholic be average सुंदर रंगित पक्श्याचे मखमली plumage valentineday ला देशील म्ह्टल सुंदरसं package नाहि मिळले कहि तेव्हा ह्रुदयास लावले bandage तुझ्याशीवाय होणार नाहि प्रिये कुणाशीहि engage माझ्यासाठी ठेवशील ना तु तुझ्या ह्रुदयाचे passage नाहि माझा मोठा बंगला आहे छोटा cottage प्रेमासाठी करशील का तु त्याच्याम्धे manage चटकन होकार दे आणि भरुन टाकु आ

अलबम

लेखक दिपक वायळ यांनी बुधवार, 24/04/2013 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या अलबम मध्ये आठणीचे फोटो असतात आणखि एक कॉपि काढायला नेगेटिव मात्र शिलक नसतात

भेटलाच कधी.....

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 24/04/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
भेटलाच कधी प्रल्हाद तर विचारा त्याला......। "भक्ती" म्हणजे काय असते ? देवाचे स्वरुप हे चरचरात असते कितीही संकटे आली त्याला विसरयचे नसते ॥ भेटलाच कधी ज्ञानेश्वर तर विचारा त्याला......। "ज्ञान" म्हणजे काय असते ? सोळव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली रेड्यामुखी वेद वदवून निर्जीव भिंत चालवली ॥ भेटलाच कधी धृवबाळ तर विचारा त्याला......। "वैराग्य" म्हणजे काय असते ? सोडुन रजवैभव त्याने नामस्मरण केले भेट दिली नारायणाने अढ्ळ पद प्राप्त झाले ॥ भेटलाच कधी शिवाजी तर विचारा त्याला....। "सामर्थ्य" म्हणजे काय असते ? प्रजेच्या दुखःची जाणीव अंतरी झाली यवनांशी युध्द करून स्वराज्याची स्थापना केली ॥ भेटलीच कधी अन

कोलाज.. तिच्या काही आठवणींचं....

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 24/04/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
खूप छान होती ती, गोड होती... "जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची.." - तिच्या आठवणी गोळा करण्याच्या नादात एकदा वहिदाजींना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेली ही आठवण.. आंब्याचं लोणचं, भाजणीचं थालिपीठ, ब्राह्मणी पध्दतीचा लग्नी मसालेभात, वांग्याचं भरीत हे तिचे अत्यंत आवडते खाद्यपदार्थ... कधी मूड आला तर रात्रीच्या सुमारास ती बराच वेळ मरीनड्राईव्हच्या समुद्रावर हवा खात बसायची. तिला स्वतच्या असीम सौंदर्याचा जराही गर्व किंवा अभिमान नव्हता.

शोध

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 24/04/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
इतकं कशाला झाकोळायला हवं माझ्या नसण्याने? मला शोध ना.. इथं, तिथं, फुललेल्या रानफुलात, कोमेजल्या निर्माल्यात. दवानं भिजलेल्या रानात, अंगार ओकणार्‍या वाळवंटात. पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात, कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही. निळ्या मुक्त आकाशात, अन् करड्या फांदीवरल्या हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त चार काड्यांच्या घरट्यातही. जन्म मृत्यूच्या उत्सवात, आणि निराकार निर्गुणात. वार्‍याच्या सळसळीत, हवेच्या झुळुकीत, जीवघेण्या वादळात, नि:शब्द, नीरव शांततेत, न सरत्या कोलाहलात. हास्याच्या लकेरीत, पापणीआडच्या पाण्यात. पहा नीट एकदा, कदाचित सापडेनही तुझ्या मनाच्या एखाद्या, खोलश्या कप्प्यात.

सह-कर्मचार्यांना फेस-बुकात स्थान द्यावे कि नाही ?

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 24/04/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर मिपा वर लिहिण्याचा सध्या ब्रेक घेतलाय , पण सह-कर्मचार्यांना फेस-बुकात स्थान द्यावे कि नाही ह्या प्रश्नाने सध्या फेस आल्याने मिपा-कर मित्र मंडळीचे मार्ग दर्शन घेण्यासाठी हा का-कु काढतोय नुकत्याच केलेल्या अमेरिका वारीत माझ्या टीम मधील काही जुनियर मंडळींनी बरीच मदत केली , स्वत:कडे कार नसल्याची जाणीव हि होवू दिली नाही , त्याच्या मदतीने आणि बाकी अन्य कारणाने वारी यशस्वी झाली. पण आता परत आल्या नंतर सर्व जु. मंडळी फेस बुकात (माझा प्रामाणेच पडीक) मित्र-विनंत्या (फ्रेंड रेक्वेष्ट) पाठवल्याला सुरुवात केली तेंव्हा डोक चालेनास झाल.

काश्मिरी फिरनी (फिरुन)

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 24/04/2013 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मिरी फिरनी वुईथ लिटल ट्विस्ट :) . साहित्यः १ लिटर दूध १/४ वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून २-३ तास भिजवणे १/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १०-१२ भिजवलेले बदाम, सालं काढून १ टीस्पून वेलचीपूड पिस्त्याचे काप व केशर सजावटीसाठी खायचा चांदीचा वर्ख (ऐच्छिक) रोझ एसेन्स किंवा रोझ वॉटर (गुलाबजल) असल्यास जरूर घाला, माझ्याकडे नव्हते म्हणून नाही घातले

कंपनी चांगली कोणती?

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 24/04/2013 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्र/मैत्रिणींनो, कंपनी म्हणजे आपण जिथे/ज्यासाठी काम करतो ती हा अर्थ अभिप्रेत आहे इथे. असो. ***************************************************************************** साधारण ३०/४० वर्षांपुर्वी नोकरी लागणे आणि ती "परमनंट" असणे हा एक अतिशय महत्वाचा विषय होता. नोकर्‍या कमी होत्या आणि "आयटी" नावाची गोष्ट नव्हती. मुलाला कायम नोकरी असली की त्याला हजार उत्तमोत्तम मुलींची स्थळे येत. गेल्या दहा-पंधरा वर्षात काळ थोडा बदलला. आयटीमधील मुलाला अशी स्थळे येत राहिली. अजुनही परिस्थिती काहीशी तशीच आहे. हे सांगायचं कारण म्हणजे एखाद्याचा यशस्वीपणा मोजायचा म्हंटला की परीमाणे काळानुसार बदलत गेली.

मामाचं गाव (इसावअज्जा)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 23/04/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
"राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते..

वाचनातून नजरेत आणि मनात उतरलेला "रारंग ढांग"

लेखक कोमल यांनी मंगळवार, 23/04/2013 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतचं रारंग ढांग वाचनात आलं. आणि प्रभाकर पेंढारकरांची कथा मनाला भिडली, नुसती भिडलीच नाही तर खूप दिवस मनात घर करून होती. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे, याच्या भोवती फिरणारी हि कथा मानवी भावभावना, निसर्गाचा स्वच्छंदीपणा , आणि आर्मी असे अनेक पैलू उलगड नेते आणि शेवटपर्यंत वाचकाला गुंतवून ठेवते. मुंबईला असणारी अति आरामशीर नोकरी सोडून विश्वनाथ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात हिमालयात रस्ते बांधणारे आर्मी इंजिनीअरींग कडे वळतो. हिमालयात रस्ते बांधणे हे अत्यंत जिकरीच काम. येथील लहरी निसर्गाचं वर्णन, त्याने मांडलेला उच्छाद इथून कथेला सुरुवात होते.