विक्रांत वरील आयुष्य
एका विमान वाहू नौकेवरील आयुष्य कसे असते त्यावरील हा चक्शुर्वैसत्यम अनुभव
विक्रांत हि १९६१ च्या डिसेम्बर मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. तेंव्हापासून ती समुद्रात उभी असल्यामुळे गंज लागणे हा भाग नित्याचा असतो. त्यामुळे काहीही केले नाही तरी त्याचा गंज लागलेला भाग साफ करणे आणि त्याला पुन्हा रंग लावणे हा नित्य देखरेखीच भाग होता. त्यावर साधारण पणे ८००-८५० नौसैनिक आणि ७० ते ८० अधिकारी कामावर हजर असत आणि जेंव्हा समुद्रावर जात असू तेंव्हा त्या ५० अधिकारी आणि २०० सैनिक गोव्याच्या नौदल तळावरून येत असत यात वैमानिक अभियंते आणि तंत्रज्ञ असत. हे सर्व लोक विमानाची पूर्ण दुरुस्ती जहाजावरच करू शकत असत.
मिसळपाव

'सूरज का सातवाँ घोडा' ही धर्मवीर भारती यांची कादंबरी. संकल्पना अशी की, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. सहा घोडे चाकोरीबद्ध मार्गाने धावतात. पण सातवा घोडा सर्वात लहान आहे आणि त्यामुळे इतरांच्या गतीने धावू शकत नाही. कदाचित लहान असल्याने अवखळपणे आखलेला मार्ग सोडून धावायची त्याला मुभा आहे. त्यामुळे रथाच्या धावण्याची गती-मार्ग-ध्येय त्याच्यावर अवलंबून आहे. आपापली आयुष्य जगताना कदाचित आपणही असेच सूर्याच्या रथाचे घोडे असू. पण तो सातवा घोडा बनण्याची इच्छा आणि धमक किती जणांत असते?