Skip to main content

अन्नधान्य स्वस्त आहे

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/05/2013 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

जी-२

लेखक दशानन यांनी सोमवार, 27/05/2013 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी सात - साडेसातला आवरून उठून बाहेर पडणे व थोड्या अंतरावर असलेल्या हायवे वर जाऊन जी-२ बस पकडणे व आडीगुडी नाहीतर बिटीएम ऑफिसला पोहचणे हे रोजचे रुटिंग. दिवसभर कामे करून संध्याकाळी परत जी-२ पकडणे व परत इलेक्ट्रॉनिक सिटी कडे परत... येथे प्रत्येक बसला दोन दरवाजे आहेत, एक पुढील स्त्रियांसाठी राखीव व दुसरा मधला मोठा दरवाजा, जसा एअरपोर्ट वरील बसमध्ये असतो तसा, स्वयंचलित व त्या दरवाज्या पुढील ड्रायव्हर पर्यंतच्या सर्व सीट स्त्रियांसाठी राखीव. सकाळ सकाळी बसला आमच्या स्टॉपवर गर्दी नसते, बस तशी रिकामीच, थोडीफार माझ्या सारखी लवकर बाहेर पडणारी काही जणं सोडली तर, बसमध्ये शुकशुकाटच असतो.

जीव

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 27/05/2013 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
जीव दुखतो..

फॅन्टसी

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 27/05/2013 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
Fantacy साहित्यः १. स्ट्रॉबेरीचे तुकडे - १ कप २. रेडिमेड व्हॅनीला आईसक्रिम - २ मोठे चमचे ३. किवीचे तुकडे - १/२ कप ४. साखर - १ ते २ चमचे ४. ऑरेंज जेली ५. बर्फाचे खडे - ३ ते ४ ६. सजावटिसाठि पुदिना पान, किवी/स्ट्रॉबेरी काप/फोडि यापैकि काहिहि कॄती: १. जेली पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार ऑरेंज जेली सेट/तयार करुन ठेवा २. किवीचे तुकडे, साखर आणि ३-४ बर्फाचे खडे मिक्सर मधे घेउन त्याची प्युरे/पल्प तयार करुन घ्या (पाणि न घालता) ३.

स्टराइल किड्स

लेखक १००मित्र यांनी रविवार, 26/05/2013 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो. वाटेत , पुणं सुटल्यावर लगेच तासाभरात शिरवळला गाडी चाऊ-म्याऊ ला थांबली. लग्गेच पोरं आणी त्यांच्या आया सरसावल्या [खरं म्हणजे आयाच] :- चला रे कुणाला शुवा-शिया करायच्या असतील तर उरकून घ्या.... काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या) तर पोरांना बळंच उभं करून .. श....श.... करत होत्या. मला वाटायला लागलं - पोरांना सोडून इतर सगळ्यांना होईल कि काय ! असो.

महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने

लेखक दशानन यांनी रविवार, 26/05/2013 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली एखादी कविता, एखादं काव्य किंवा एखादं कडवं आपल्याला एवढं आवडून जातं की आपल्या मनात, विचारात कित्येक दिवस ते थैमान घालत असतं.

कधी एकदा...

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 26/05/2013 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिना सरत चाललाय. उन्हाळा जाणवतोय परंतु मधूनच २-४ काळे ढग आकाशात दिसतात. पुढच्या ट्रेक ला लवकरच जायचंय असा दिलासा देऊन जातात. ऑफिसात काम करत असतानाही अचानक राजगडाचा चोर दरवाजा आठवतो, मनातले विचार कीबोर्डपर्यंत पोचतात आणि मग इमेल लिहिताना चुकून 'Dear Rajgad' असं लिहिल्यावर मी जीभ चावतो आणि बॅकस्पेस दाबतो. धीर धर ना राव! असं स्वत:लाच सांगतो. मग फावल्या वेळात फेसबुक वर जाण्याऐवजी ट्रेकवर्णनं वाचतो. ब्लॉग वाचतो. रतनगड, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, हरिश्चंद्रगड... अशा माझ्यासाठी डिझायर्ड डेस्टिनेशन्स चे फोटो गूगल वर बघून मी इथे असेन तेंव्हा काय करेन, मला काय वाटेल, मी कसा फोटो काढेन..

सत्तेसाठी कायपण

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 26/05/2013 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडके यांची मनापासुन माफी मागुन... १७/५/२०१३ रोजी गणरायाचरणी मंत्र्याच साकडं ह्या गीतात थोडफार बद्दल करुन व शीर्षक बदलुन पुन्हा प्रकाशीत करीत आहे, तरी सर्व वाचक बंधु-भगिनींनी वाचुन प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.(चालः काठी न घोंगड घेऊद्या की र ) शाल आणि श्रीफळ घेऊद्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥धॄ॥ मी निवडुन आल्यावर । करेन जनतेचा उध्दार । बंगला बांधीन एक सुंदर । तो तुमच्याच पैशावर । फॉरच्युनर गाडी घेऊ द्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥१॥ मग जाईन दिल्लीला । पी.एम्.ला भेटण्याला । मंत्री पद मागण्याला । दिल्या वचना जागण्याला । राजभवनावर शपथ घेऊ द्या की र...। मला बी मंत्र

अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज

लेखक साळसकर यांनी रविवार, 26/05/2013 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते.