Skip to main content

स्टराइल किड्स

लेखक १००मित्र यांनी रविवार, 26/05/2013 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो. वाटेत , पुणं सुटल्यावर लगेच तासाभरात शिरवळला गाडी चाऊ-म्याऊ ला थांबली. लग्गेच पोरं आणी त्यांच्या आया सरसावल्या [खरं म्हणजे आयाच] :- चला रे कुणाला शुवा-शिया करायच्या असतील तर उरकून घ्या.... काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या) तर पोरांना बळंच उभं करून .. श....श.... करत होत्या. मला वाटायला लागलं - पोरांना सोडून इतर सगळ्यांना होईल कि काय ! असो. तर शुवा-खाणी झाल्यावर सगळे गाडीत बसू लागले, तर तेवढ्यात सोहमला नेमकी नं.२ ला लागली [नतद्रष्ट मेलं] "आई.., शी लागली" "अरे बावळटा जा की मग" - यश सोहमला जोरात लागलेली , तरीही तेवढ्यात त्याची आई धावत पळत आलीच. "मूर्खा...सॅनिटायझर घेवून जा" सोहमही इतका आद्न्याधारक की जीव [?] मुठीत धरून त्यानी ती सॅनिटायझर नामक पवित्र जलाची पुचुक-पुचुक करणारी बाटली आधी घेतली आणी मगच गडी शी करायला गेला. ################ नंतर पुन्हा बसमध्ये बसल्यावर कळलं , की पोरांना उलट्या होवू नयेत म्हणून प्रत्येक मुलाला कुठली तरी गोळी (प्रत्येकीएक ह्या प्रमाणात) आगाऊच देवू केली होती म्हणे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10281
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

बरं मग?

काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या)
आवडलं. पण लेख सुरू होता होताच संपला की वो! आणखी वाचायला आवडलं असतं.

In reply to by पैसा

काय लिहायचं ज्योती[ताई] अज्जून ? अहो, मधे चंद्रपूरला ट्रिपने गेलो होतो , तर एका पालकाने, कार्टनभरून औषधं घेतलेली,त्याच्या भल्या-मोठ्ठ्य्या .... ३ जणांच्या कुटुंबाकरिता. समझनेवालेको......इशारे की भी जरूरत नही है

ह्यानिमित्ताने एक जुनी आठवण जगी झाली ... आम्ही १०वीत असताना पुण्याला ट्रिप गेली होती , तेव्हा गुरु नावाचा एक पोरगा शिरवळला ओकला होता अन त्याघटने वर आम्ही कविता रचली होती "ने मजसी ने , परत सातार्‍याला , ड्रायव्हरा प्राण तळमळला ...मळमळला ...शिरवळला " =))

In reply to by प्रसाद गोडबोले

ने मजसी ने , परत सातार्‍याला , ड्रायव्हरा प्राण तळमळला ...मळमळला ...शिरवळला "
अरारारारा =)) =)) =)) =)) विडंबना हात सळसळला, सळसळला, गिरीजा ;)

In reply to by प्रसाद गोडबोले


काय लिहायचे म्हणून काही लिहायचे का काय ?
एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो.
आणि मग एकदम...
"आई.., शी लागली"
सोहमला जोरात लागलेली , तरीही तेवढ्यात त्याची आई धावत पळत आलीच. ?? सहल शाळेची होती, का सोसायटीची ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहल शाळेची होती, का सोसायटीची ?
कुणाची का असेना ? शिरवळला शी लागली हा मुद्दा आहे इथे =)) अवांतर : शी लागणे ह्या वाक्यप्रचाराचा उदग्म कोणत्या भाशेतुन झालाय हे कोडे अजुन उलगडले नाही ... शी ह्या श्ब्दाची व्युत्पत्ती काय ? ( अशाच एका दुसर्‍याच शब्दाची व्युत्पत्ती कालच सापडली आहे ...)

In reply to by प्रसाद गोडबोले

शी लागणे ह्या वाक्यप्रचाराचा उदग्म कोणत्या भाशेतुन झालाय हे कोडे अजुन उलगडले नाही ... शी ह्या श्ब्दाची व्युत्पत्ती काय ? शी !! य्याक !! कुठलीही व्युत्पत्ती काय शोधताय? शी लागली या ऐवजी शी आली हे जास्त चपखल बसते. ( अशाच एका दुसर्‍याच शब्दाची व्युत्पत्ती कालच सापडली आहे ...) बाकी दुसरा शब्द कोणता?

In reply to by परिकथेतील राजकुमार

तसं नाही राजकुमारा, अरे, ह्या शाळेत, पालक-शिक्षक , मुलं असं नेहमी एकत्र जात असतो. नुकतंच आनंदवनातही आम्ही जावून आलो. मी सुधा पालकच आहे.

वि आर गोइंग टु क्लिन अवरसेल्वज टु डेथ! अस एकदा टिव्हीवर एक महाशय म्हणले होते ते आठवल.

शाळेच्या सहलीसोबत पालक जाण्याची प्रथा प्रथमच ऐकली. लेखातली भावना समजली. अतिस्वच्छतेच्या नादाने पोरांची किमान प्रतिकारशक्तीही अशक्त करुन टाकली जात आहे की काय असं वाटतं. का कोण जाणे पण हे समजत असूनही माझ्या पोराबाबत मीही स्वच्छतेबाबत असाच काटेकोर राहतो. माझ्या लहानपणी गल्ली क्रिकेटात गटारात मारलेले ओले बॉल हाताने बाहेर काढून मातीत घासून "स्वच्छ" करण्याचे आणि पुन्हा बॉलिंग टाकण्याचे दिवस आठवत असतानाही.. शाळेच्या सहली हा तर अप्रतिम विषय आहे. माझी शाळा आठवडाभराची मोठ्ठी सहल दरवर्षी काढायची, आणि तीही जवळच्या उद्यानात नव्हे तर कोंकणातून निघून एकाच ट्रिपेत अजंठा वेरुळ, पुणे, सिंहगड, कोल्हापूर तत्सम ठिकाणे कव्हर करणारी. मुक्काम शाळांमधे किंवा कार्यालयांमधे. रात्री करमणुकीचा कार्यक्रम.. त्यातले ते मुलींचे डान्स.. "जिमी जिमी.. आ जा .. आजा.." वाह.. वाह.. "प्रासंगिक करार"च्या बसमधून ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका, पुढच्या गाडीला मागे टाका.. "हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाहीत केस.. कापेग?" "पाच सहा सात आठ.. अमुक हायस्कूलची कॉलर ताठ" असे कायच्या काय ओरडत दिवसदिवस प्रवास.. ती खरी मुशाफिरी. असो.. विषय स्वच्छतेचा आणि आम्ही भरकटलो... :)

In reply to by गवि

माझ्या लहानपणी गल्ली क्रिकेटात गटारात मारलेले ओले बॉल हाताने बाहेर काढून मातीत घासून "स्वच्छ" करण्याचे आणि पुन्हा बॉलिंग टाकण्याचे दिवस आठवत असतानाही.. अगदी अगदी.. त्या गोट्या तर मेल्या माती अन घाणीतच खेळल्या जायच्या.. अन मग तेच हात घेऊन घरी यायचे, हातपाय धुवायचो की नाही आता आठवत नाही, धुतलेच तरी साबण लावायचो की नाही हे तर मुळीच आठवत नाही, आणि लावलाच तरी किती चोळायचो देवासच ठाऊक, नाहीतर आजची पोरे, "ए बंण्टी तेरा साबून स्लो है क्या' करत चोळून चोळून स्वच्छ होतात..

In reply to by साळसकर

अंड्या, एक गंमत सांगू का , अश्शीच ...? माझे आजोबा "नाना" हे पान म्हणजे विडा , कुटून खायचे, दातांमुळे ! तर अनेक वेळा आम्हाला [अगदी ५-६ वर्षांचा मी असेन तेव्हा] मोह व्हायचा. तर... कित्येक वेळा , त्यांनी त्यांच्या तोंडातलं सुद्धा भरवलंय, आता बोला !

In reply to by गणपा

+१ याबरोबर गविंकडं सगळ्याला आपलंसं करुन घेण्याची कला नि पवित्र करुन घेण्याची दृष्टी आहे. त्यामुळं सारं कसं चान चान होऊन जातं. ;)

In reply to by गवि

शिरा पडो मेल्या तुझ्या तोंडात.. बरं झालं शिरा लिहीलं ते!!! कारण मुळ मजकूरात शी/शू आले आहे. चुकूनही त्याचा उल्लेख नको.

In reply to by गवि

प्यारे१ मात्र भाग्यवान हॉ ! डायरेक शिरा (तीच ती रवा, साखर वगैर वापरून केलेली पाकृ) तोंडात ! +P. बाकी ते दुसरे शिरा घरावर पडण्याचं प्रकर्ण लय डेंजर बर्का +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आता धागाच असा आहे की काहीही गेलं तोंडात तरी तोंड कसनुसं व्हायचं. एखादा बोबडकांदा असता तर अवघड झालं असतं. असो. ;) धाग्याला धरुन एक पाणचट पी जे. एका मुलीला दोन प्रश्न विचारले > काय गं मुली नाव काय तुझं? नि चाललीस कुठं एवढ्या लगबगीनं? तिनं एकच उत्तर दिलं. . . . . . शीला.

एक होतं प्रासंगिक कराराच्या गाडीसाठी हे म्हणजे ड्रायव्हरला उचकवाय्चे काम "गाडी कशी चालते....चोरावर मोर.....चालविता गाडी सक्पाळ ड्रायव्हर थोर".... त्या ड्रायव्हरचे नाव अजुनही आठवतेय. सकपाळ डायवर म्हुन.

अशाच एका नवमहापालिकेचे किस्से सध्या ऐकत आहे. या मातेच्या सुपुत्राला ती दररोज बिसलरीच्या पाण्याने आंघोळ घालते. पुत्राचं वय आताशी आठ महिने. :-|

In reply to by इनिगोय

चुकीचं वाटत नाही. कॉर्पोरेशन मध्ये न आलेल्या तसंच पाणी न मिळणार्‍या भागांमध्ये ग्रामपंचायतींच्या पाण्याचा अथवा बोअर च्या पाण्याचा पुरवठा होतो. टँकरने आलेलं पाणी हे जनरली जास्त क्षारयुक्त असतं. लहान मुलाची त्वचा नाजूक असल्यानं त्याला ह्या क्षारयुक्त पाण्याची अ‍ॅलर्जी होऊ शकते. अ‍ॅलर्जीचा धोका टाळण्यासाठी हे असले प्रकार करणं भाग आहे. इन फॅक्ट लहान बालकांसाठी ते जास्त आवश्यक आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर वगैरे वर विश्वास असलेला प्यारे.

In reply to by प्यारे१

लहान बाळाला जपावं हे ठीकच. मात्र अति सांभाळण्याने त्याची प्रतिकारशक्ती वाढणार नाही, उलट ते अधिकच कमकुवत होत जाईल. मुलाला नैसर्गिक स्वरुपातलं पाणी, हवा, माती यांच्यापासून संपूर्णपणे दूर ठेवण्याने त्याचं शरीर वातावरणातल्या जीवाणूंचा सामना करायला शिकणार नाही. आणि हा सल्ला बालरोगतज्ज्ञांकडून ऐकलेला आहे. दुसरं म्हणजे, मी उदाहरण दिलं त्या बाईंकडे तुम्ही म्हणता तसं बोअरचं किंवा टँकरचं पाणी येत नाही. (हे मी आधी नोंदवलं नव्हतं..) त्या बिसलरीचा वापर करतात तो केवळ हायजिनच्या अतिरेकी अट्टहासातून. तसंही दररोज वीस लिटर बिसलरी केवळ आंघोळीसाठी.. लहान बाळ म्हणजे त्याच्या इतर स्वच्छतेच्या गरजांसाठी दहा वीस लिटर आणखी.. त्याचं अन्न शिजवण्यासाठी वेगळं. घरच्यांना "शुचिर्भूत" करण्यासाठी आणखी तर्‍हेतर्‍हेचे उपाय.. कितपत प्रॅक्टिकल वाटतं?

In reply to by इनिगोय

हे सगळं खरंच आहे, पण XXX धुतल्यावर हात पाण्यानं [क्षारयुक्त असलं तरीही] न धूता sanitizer नी धुणे म्हणजे काय म्हणायचं! आणी ते हाताला लागेस्तोवर XXX दाबून ठेवायची ! उलटी होवू नये म्हणून घेतल्येल्या गोळ्या- म्हणजे शरीराने व्यवस्था लावल्येल्या मार्गापेक्षा ती "होवूच नये" म्हणून औषधरूपी रसायनं शरीरात सोडायची - हे प्रीवेन्शन ? ह्याचे प्रत्यक्ष स्वरूपात तर परिणाम आहेतच, शिवाय आपण तब्येतीच्या बाबतीत कमालीचे अती आग्रही होवून बसतो, जणू काही निसर्गात काही व्यवस्था नावाची चीजच नाही.

In reply to by इनिगोय

एका अमेरिकास्थित महापालिकेने तिच्या मुलासाठी बिसलेरीचे पाणी उकळून गार करुन ठेवायला सांगितले होते. आणि हे तिला तिच्या डॉक्टरने सांगितले होते म्हणे!

In reply to by इनिगोय

"आमच्याकडे बिसलरीची पाणीपुरी मिळेल" हे वाचलं होतं. पण बिसलरीने आंघोळ हा प्रकार भारीये बुवा! त्यावरून आठवलं: पुण्यातल्या एका प्रसिद्ध दारू-दुकानदाराची सुकन्या आमच्या कॉलेजात होती. एका सुप्रभाती तिच्या घरी गेलो होतो. ही बया आंघोळीला गेली होती. तिच्या आईने चहापाणी वगैरे केलं. थोड्या वेळाने ती परतली आणि बियरचा प्रचंड, उग्र, आंबटढसाण दर्प आला. ही बाथरूममध्ये चोरून पिते की काय! तिला काही पुस्तकं वगैरे द्यायची होती ती दिली आणि निघालो. तासा-दोन तासांनी ती परत कॉलेजमध्ये भेटली. काही दर्प वगैरे नाही, उलट सुवास! तिला विचारल्यावर तिने खुलासा केला. एक्स्पायरी डेट संपलेली बियर (म्हणजे बहुदा जास्त फर्मेंट झालेली असावी) केसांकरता उत्तम कंडिशनर असते म्हणे! पण भयंकर वास मारते म्हणून ती बियरने केस धुवायची आणि मग शाम्पू लावायची. :)

In reply to by आदूबाळ

दिल्लीत आणि नोईडात सगळ्या मॉल मध्ये बिसलेरीचीच पाणीपुरी मिळते. ( (म्हणजे मी गेलो होतो त्या त्या)

बिसलेरीचे पाणी मुलाचा पार्श्व भाग धुण्यासाठी वापरणारी NRI ( अमेरिकेतून सुट्टीसाठी आलेली) आई मी स्वतः हिरानंदानी रुग्णालयात काम करीत असताना २००८ साली पाहिली आहे.

डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त पैसे खिशात आले की बिस्लरीने ** धुणे सुरू होते असे आमचे मत आहे. तसेही पूर्वी दुधाने आंघोळ वगैरे करणार्‍या सुंदर्‍या होत्या असे ऐकून आहोत. पण आजकाल टीव्हीवर जाहिराती पाहून पाहून यांच्या अकलेला किटाणूंचं किटण चढलेलं असतं. सो 'सॅनिटायझर'. आता त्यातले आयसोप्रॉपिल अल्कोहोल किती विषारी असते हे कोण सांगणार यांना? ते समजलं तर मग 'हर्बल' सॅनिटायझर्स.. निरुपयोगी वस्तू ५ पट किमतीला विकत घेणे म्हणजे स्वच्छता नव्हे, हे डोक्यातल्या अकलेपेक्षा खिशात पैसा जास्त, याचेच लक्षण, हे यांना कोण सांगणार? :(

In reply to by आनंदी गोपाळ

BMJ (ब्रिटीश मेडिकल जर्नल) मध्ये स्वच्छ पणे लिहिलेले होते कि हात धुण्यासाठी कोणताही साबण तितकाच उपयुक्त आहे त्यात जंतुनाशक असण्याची मुळीच गरज नाही. मूळ हात धुणे यात जंतू धुतले जाणे हा हेतू आहे जंतू मारणे हा नाही. तेंव्हा हा सगळा "जंतू" "किटाणू " लाइफ बॉय, डेटोल हा भडीमार केवळ थोतांड आहे. त्यात हेही म्हटले होते कि जर साबण नसेल तर भरपूर पाण्याने हात धुवा परिणाम तेवढाच मिळेल. लिंक मिळाली कि देतोच

In reply to by बहुगुणी

फक्त इथले ज्येष्ठ, जाणते सदस्य डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी केलेला उल्लेख खटकला, कदाचित आपण इथे नवीन असल्याने हे झालं असेल, पण (आपण एका बालकाचे पालक असल्याचा उल्लेख वर आलाय ते खरं असेल तर) डॉक्टरसाहेब आपल्यापेक्षा वयाने बरेच वडील असावेत असं वाटतं. असो, लेखातलं निरीक्षण वास्तविक असेल तर माझ्या माहितीत भरच पडली.

In reply to by रेवती

गैरसमज नसावा सौमित्र, माझा पहिलीपासून(लंगोटी यार) चा शाळेतील मित्र आहे. तेंव्हा त्याने मला अहो म्हटले तर ते कानाला चांगले वाटणार नाही. आणि तुम्ही म्हणता तेवढा मी ज्येष्ठ नाही.

In reply to by रेवती

रेवती, तुमची पोस्ट वाचायच्या आधी कळलं, की , सुबोध नी उत्तर दिलंय. पण तुम्ही हे सांगितल्याबद्दल- निक्षून - अनेक धन्यवाद.

In reply to by बहुगुणी

अगदी खरंय, बहुगुणी. चूक झालीच. डॉक्टरसाहेब, माझा एक डॉक्टर मित्र आहे, ह्याच नावाचा . चुकून बोलता, बोलता, सॉरी, लिहिता-लिहिता तोल कधी गेला कळलंच नाही. अर्थात हे माझ्या कृतीचं अजिबात जस्टिफिकेशन नाही. तरी पुन्हा एकदा, माफ करावे. बाय द वे, आपण डोक्टरसाहेब, मुलुंड पूर्व चे तर नाहीत ना ?

In reply to by आनंदी गोपाळ

>>डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त पैसे खिशात आले की बिस्लरीने ** धुणे सुरू होते असे आमचे मत आहे. -- मामु... बोलेतो... तु सच्चीमे डॉक्टर है रे. अर्धवटराव

आमाला बा एव्हडे हायजिनिक राहणे जमत नाय। आम्ही आपले आठवड्याच्या शेवटी घेतो ते सेनेटायझर पाणी टाकून पोटातुन… :)


शाळेच्या सहलीबरोबर पालक आम्हीबी पहिल्यांदाच ऐकून राह्यलो. बाकी, बीसलरीनं आंघोळ, बिसलीनं अमुक अमुक ध्वायच्या पद्धती, वगैरे हे सर्व माहितीपूर्ण आहे. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by मृत्युन्जय

अहो मीच अठराव्या वर्षी लष्कराच्या भाकर्या भाजायला घराच्या बाहेर पडलो त्यामुळे भटक्या आणि विमुक्त जमातीत राहून २३ वर्षांनी मुंबईत परत आलो. त्यामुळे असे बरेच शाळा कॉलेज मधील मित्र कुठे ना कुठे भेटतात.

उलट्या होऊ नयेत म्हणून गोळ्या घेण्यामधे खरंच काय वाईट आहे? माझं सगळं लहानपण असं काढलंय माझ्या बिचाऱ्या आईबाबांनी. सर्व बसप्रवास. प्रवासाचा एक दिवस असा आठवत नाही की मी बॊक बॊक करून कपडे खराब केले नाहीत, मुलीला उलटी होतेय बस थांबवा असा पुकारा माझ्यासाठी करावा लागला नाही. आधी ती पोटात ढवळण सुरू होते. दुनिया हास्यविनोद करत असते आणि आपले तोंड बिघडलेले. जाम चिडचिड. मग उबळ आल्यावर हातात असेल तर प्लॆस्टिकच्या पिशवीत ओकायचे आणि पुढच्या वेळेला बस थांबेतो ओकरे तोंड तसेच, ती पिशवी हातात असे बसून रहायचे. तो भीषण वास. सगळेजण आपल्याकडे बघणार. कुणी काही म्हणलं नाही तरी विनाकारण आपल्याला गिल्टी वाटणार... शी भीषण. जेव्हा पहिल्यांदा ती एवोमिन घ्यायला परवानगी मिळाली आणि शाळेच्या ट्रिपला मी ती घेतली. ती ट्रिप अविस्मरणीय होती माझ्यासाठी. पहिल्यांदाच न ढवळता, बसमधे मैत्रिणींबरोबर दंगामस्ती खिदळाखिदळी करत प्रवास केला होता. काय सुटका झाल्यासारखे झाले होते. :)

उलट्या होऊ नयेत म्हणून अशा वेळी गोळ्या घेण्यात काहीच चूक नाही. खरंतर वैद्यक शास्त्राचा मूळ हेतू हा सर्वसामान्य माणसाचे आयुष्य कष्ट रहित आणि सुकर करणे हेच आहे. मी कित्येकदा तरुण मुलीना पाळीच्या वेळेस अतिशय त्रास सोसताना पाहतो कारण उगाच औषधे घ्यायची नाहीत हा पालकांचा दुराग्रह असतो.थोडासा त्रास सहन करणे इतपत ठीक आहे पण अंथरुणाला खिळवून ठेवणे आणि गोळ्या न घेणे यात काय साध्य होते कोण जाणे ?