Skip to main content

सत्तेसाठी कायपण

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 26/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडके यांची मनापासुन माफी मागुन... १७/५/२०१३ रोजी गणरायाचरणी मंत्र्याच साकडं ह्या गीतात थोडफार बद्दल करुन व शीर्षक बदलुन पुन्हा प्रकाशीत करीत आहे, तरी सर्व वाचक बंधु-भगिनींनी वाचुन प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.(चालः काठी न घोंगड घेऊद्या की र ) शाल आणि श्रीफळ घेऊद्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥धॄ॥ मी निवडुन आल्यावर । करेन जनतेचा उध्दार । बंगला बांधीन एक सुंदर । तो तुमच्याच पैशावर । फॉरच्युनर गाडी घेऊ द्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की...॥१॥ मग जाईन दिल्लीला । पी.एम्.ला भेटण्याला । मंत्री पद मागण्याला । दिल्या वचना जागण्याला । राजभवनावर शपथ घेऊ द्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की......॥२॥ मंत्री पद मिळाल्यावरी । करीन परदेशाची वारी । सर्व काँट्रॅक्ट माझ्याच घरी । मलाई एकटाच खाईन सारी । आदर्श घोटाळ्याची मला सवय होऊ दे...। सवय होऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥३॥ भ्रष्टाचाराचा तोडीन आळा । काळा पैसा करीन गोळा । गावागावांत माझ्याच शाळा । कंपन्यांना लाविन टाळा । खोका घरी येऊ द्या की र ...। मला बी मंत्री होऊ द्या की......॥४॥ कार्यालये जी सरकारी । ती खाजगी करीन सारी । योजना आणिन भारीभारी । कामगारंना बसविन घरी । कामगारांचे पैसे खाऊ द्या की र...। मला बी मंत्री होऊ द्या की......॥५॥
लेखनविषय:

वाचने 1257
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया