Skip to main content

खरचं गरज आहे का?

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 26/09/2022 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला पेरणा एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या. मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस.

वर्ल्ड टूरिसम डे - निमित्त प्रदर्शन - माझा फोटो

लेखक MipaPremiYogesh यांनी सोमवार, 26/09/2022 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
हे सांगायला आनंद होत आहे कि शेखर कपूर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार्‍या प्रदर्शनात माझा "वारी" फोटो प्रदर्शित होणार आहे . जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनात माहितीपट, व्लॉग, छायाचित्रे असतील. परभन्ना फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे. स्थळ - नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे वेळ - सकाळी 10 ते दुपारी 2 तारीख - 27 सप्टेंबर 2022 मी साधारण ११ वाजल्यापासून तिकडे उपस्थित असणार आहे.

खरचं गरज आहे का?

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 26/09/2022 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!!

आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व

लेखक राहुल यांनी सोमवार, 26/09/2022 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते. विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे.

कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 25/09/2022 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे. पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते. येथील प्रत्येक गॅलरी ही वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली आहे.

सेक्स फॉर रेकॉर्डस

लेखक राहुल यांनी रविवार, 25/09/2022 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते. ◼फॅलोपिअन ट्यूब- फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली.

तमिळनाडूचा इतिहास भाग- ९

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी रविवार, 25/09/2022 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
. चित्र:- कुडियारसू . गांधी आणि पेरियार यांच्यात काय फरक होता? शेवटी दोघांनाही तर अस्पृश्यांची मुक्तीच करायची होती. अरुंधती रॉय आणि इतर अनेक लेखकांनी गांधी-आंबेडकर जोडीवर असेच प्रश्न मांडले. पाहीले तर कुठलाही वैज्ञानिक विचार किंवा 'दोन अधिक दोन चार' असे विचार माननार्या माणसाला गांधींमध्ये दोष दिसू शकतो.

हाडाचा सापळा (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 24/09/2022 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
हाडाचा सापळा (गूढकथा) काही घटना एकदम अनपेक्षितपणे घडतात. पण खरोखर त्या अनपेक्षित असतात का? की त्या विधिलिखित असतात. आगोदरच त्या निश्चित झालेल्या असतात. तुम्ही केवळ त्या घटनांचे एक वाहक असता. किंवा मग नाममात्र साक्षीदार असता. कदाचित तसेही असू शकेल.      मी हे असे का म्हणतोय, त्यालाही कारण आहे. एक तार्किक स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण समजून घेण्याईतपत मी समंजस नसेलही, पण त्या स्पष्टीकरणाच्या जाणिवा मात्र मला तीव्रपणे जाणवायच्या. त्या माझ्या अगदी अंगावर यायच्या. हे जे काही सगळे घडले, ते माझ्याच सोबत का घडले, याचे भले माझ्याजवळ उत्तर नाही. पण ते माझ्यासोबत घडले होते.

वेडा वेडा पाऊस..

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 24/09/2022 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वेडा वेडा पाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस? काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस.. छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला, होतं असं चुकून, कळावं ना पावसाला? वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला. म्हणून भिजले, नको ना रे भलता अर्थ लावूस! भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना? बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना? घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना? म्हणून थांबले, नको की रे भलता अर्थ लावूस! बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं? कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं? घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं! म्हणून बिलगले, नको हो भलता अर्थ लावूस! तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस.. वेडा
काव्यरस