Skip to main content

श्रीविठ्ठल : मला उमगलेला

लेखक शरद यांनी गुरुवार, 18/07/2013 07:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीविठ्ठल :मला समजलेला १९७८-७९ साल असावं. डॉ.रा.चिं.ढेरे यांचे "महाराष्ट्राचा देव्हारा" हे पुस्तक हातात पडलं. त्या आधी ५-६ वर्षे त्यांचे "लोकसंस्कृतीची क्षितिजे" हे पुस्तकही घेतले होते. शहरात वाढलो, शिक्षण झाले त्यामुळे लोकसंस्कृतीशी ओळख तोंडदेखलीच. पण मी या पुस्तकाने प्रभावित झालो. त्यांची विद्वत्ता हा काही माझ्या तोकड्या ज्ञानाच्या कक्षेतला भाग नव्हता पण त्यांची शैली, भाषाप्रभुत्व, माहिती गोळा करण्याकरिता घेतलेले श्रम, नित्कर्षाला येईपर्यंत केलेली मांडणी यांनी मी प्रभावित झालो. त्यामुळे "श्रीविठ्ठल:एक महासमन्वय" या लेखाने मी भारावलोच.

" हे असे चालायचेच!! "

लेखक निनाव यांनी गुरुवार, 18/07/2013 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे! गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे ! काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे ! तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते मग तोच म्हणाला , जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !! बोललो न मी काही न काही होते बोलायचे न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
काव्यरस

"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/07/2013 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले? मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...! https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?

मांजर, हत्ती, कुत्रा कि चिमणी?

लेखक निनाव यांनी बुधवार, 17/07/2013 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिले एक मांजर , दूध पिताना मिटलेले डोळे , सतर्क कान भोवताली सर्व लक्ष असताना पाहिले एक हत्ती तलावास क्रमण करताना भुंकले कुत्रे , ओरडले माकड मात्र स्वतः मग्न चालताना मग पाहिल्या चिमण्या लागताच चाहूल 'संकटाची' वाचविण्यास इतरांस निस्वार्थ सतर्क करताना गरज अश्याच चिमण्यांची आज समाजास आहे मी पा एक वृक्ष, मात्र बाकी आपल्या वर आहे!

कधीतरी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 17/07/2013 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
धुसफूस भावनांची विसरू कधीतरी जरी आठवून ढाळू अश्रू कधीतरी आणू कुठून सांगा शोधून एक मित्र जो ना म्हणेल कधीही 'भेटू कधीतरी' मग मोट अनुभवांची बांधू कधीतरी संधी पुढे आम्हीही साधू कधीतरी जैसे तुम्ही करावे, तैसेच भरावेही होईल हे तुम्हाला, लागू कधीतरी आम्हासही कधी, पुसतील लोक सारे आम्हीही मग अलिप्त, राहू कधीतरी कक्षा जरी स्वतःच्या जाणू सदा तरी आकाश बंधनांचे भेदू कधीतरी आहोत तेच आपण, जाणू कधीतरी 'तो' मी कधीतरी, 'तो' तू कधीतरी मागू आम्हास आम्ही काहीच ना अपूर्व कुण्या चेह-यास हासू मागू कधीतरी

कृष्ण तो आतला ...

लेखक आतिवास यांनी बुधवार, 17/07/2013 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचाच त्याने धावा हा घेतला गूढ डोहाच्या तळात उभा अंगार पेटला. युद्धे घमासानी हळू प्राण हा बेतला श्वासामागे श्वास कसा, न कळे रेटला. निसटून गेले, त्याचे भय ना मातीला उणे काही नाही भेद जागत्या वातीला. प्रपंच देहाचा उन्मळे रातीला पावसाची लय अशी अखंड साथीला. अदूर सुदूर घन कधीचा मातला झोपाळला आहे परी कृष्ण तो आतला. **
काव्यरस

मदत हवी आहे

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 17/07/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो. आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख! कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते).

शब्द शब्द

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 17/07/2013 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द शब्द शब्दातच सारे शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा वडवानळ जळ शब्द पसारे एक एकट्या एकांताचे कूस छत्र घर शब्द सहारे मुक्या जाणिवा गभुळ जखमा आतुर माया शब्द शहारे नभ संचित आकाश पवन घन शब्दच वेडे ऋतु झरणारे खोल ओंजळी लाव्हा अंकित खुपणारे सल शब्द बोचरे शब्द उतारा सकल प्रार्थना आत्म संहिता शब्द खरे .....................अज्ञात
काव्यरस

वारी आणि मी...

लेखक नानबा यांनी बुधवार, 17/07/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात जन्माला येऊन आषाढीची वारी माहित नसणारा माणूस विरळाच. त्यातही मराठी माणसाला, विशेषत: माझ्यासारख्या सोलापूरकडे आजोळ असणा-या माणसाला वारीबद्दल आकर्षण नसणं म्हणजे सच्च्या क्रिकेटप्रेमीला सचिनची खेळी लाईव्ह पाहण्याबद्दल आकर्षण नसण्याइतकंच अशक्य. लहानपणी दोन तीनदा गावी वारी पाहिली, तेव्हापासूनच तिचा एक भाग होण्याची इच्छा मनात घर करून होती. ४ वर्षांपूर्वी या इच्छेला मूर्त स्वरूप मिळालं.

राजस्थानी मिरची वडा

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 17/07/2013 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ५-६ भावनगरी मिरच्या (तुम्ही कुठल्याही कमी तिखट असलेल्या मोठ्या मिरच्या घेऊ शकता,) २-३ बटाटे उकडून, किसून घेणे दीड-दोन वाट्या बेसन २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या १/४ टीस्पून हिंग १ टेस्पून लाल तिखट १ टेस्पून बडीशेप पावडर १ टेस्पून जीरेपूड १ टेस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता) बारीक चिरलेली कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: