Skip to main content

ती...

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 19/08/2013 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऐकले जाहीर येथे, झुंड माणुसकी तुडवणारे वाचले जाहीर येथे, रत्न कन्या नाकारणारे ll १ ll जोडपे कैक नादान, येथे पालकत्वी रंगणारे तो असेल कि ती?, व्यर्थ शंका काढणारे ll २ ll माजले क्रूर बाजारी, गैर कर्मे रुजवणारे विवेक विसरून पालक, वाट आंधळी जोखणारे ll ३ ll अवैध पैसा अमाप, गर्भश्रीमंत मिरवणारे कष्टी भगवंत येथे, पाहून गर्भ चिरणारे ll ४ ll लिखित काही और तरीही, वंशदिवा शोधणारे हातचे टाकून पायी, कळ्या नाजूक तुडविणारे ll ५ ll विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll नका टाकू स्त्री उद्याची, घसे कोरडे बोलणारे हात कानावरी त्यांचे, ठार बहिरे ऐक

श्रद्धा

लेखक अर्धवटराव यांनी सोमवार, 19/08/2013 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आज आम्हि एका कुलीन स्त्रीची फर्याद घेऊन मिपा दरबारी हजर झालो आहोत. या बयेचं नाव आहे श्रद्धा. हिच्या बद्दल आम्हाला अपार सहानुभुती, आदर, प्रेम आणि आपुलकी आहे (... नाहि, 'ति' श्रद्धा वेगळी आहे हो... एव्हाना ति लग्न वगैरे करुन सुखाने नांदत असेल.) हिचं गार्‍हाणं असं आहे कि येऊन जाऊन लोकं हिला उगाच टपली मारुन जातात. विचारवंत (अस्सल, आणि खरे अस्सल) हिला "त्या" गल्ली बोळातली असल्यासारखं तुच्छ समजतात, तर अविचारवंत (अस्सल आणि निव्वळ अस्सल) हिच्या नावाने काय वाटेल ते खपवतात.

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०९ : तिसरी महाआपत्ती आणि वांशिक विलगन (२२,००० ते १९,००० वर्षांपूर्वीपर्यंत)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 19/08/2013 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

गंधांच्या स्मृती स्मृतींचे गंध.

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 19/08/2013 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचे व. पु. नी केलेले "जिंदादिल' रसग्रहण ऐकत पडलो होतो. "आहे स्मृतींचा गंध येथे....... असा शेर ऐकता ऐकता डोळा लागला. जाग आल्यावर स्मृतींचा गंध ,गंधांच्या स्मृती असे उलट सुलट काहीतरी आठवू लागले.आणि अचानक अनेक गंधांच्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी पहिला स्मृती गंध आला तो मधुमालतीचा. अगदी लहानपणीच या फुलाशी परिचय झाला. खेडच्या लक्ष्मी नारायण मंदिरा भोवती बागडण्यात सारे लहानपण गेले. घराकडून देवळाकडे जाण्याच्या वाटेवर मार्च एप्रिल महिन्यात मधुमालती बहरलेली असायची. राम नवमीचे दिवस आले कि दिवस रात्र देवळातच असायचो. जाता येता मधुमालतीचा सुवास यायचा.

अबोल प्रीत बोलली...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 18/08/2013 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिहीत रात्र रंगली कमल पुष्पे फुलली... अबोल प्रीत बोलली हळूच गाली हसली... नभी धुंद चांदणे फुलाफुलांत हिंडले... प्रीत आपुली पहिली अबोल प्रीत बोलली ... नवे रंग उमटले अश्रु पुसून गेले... उगवली पहाट थांबली चंद्रकोर... विसावली सागरी झोपली गाढ कुशीत... विसरली निळ्या आभाळास अबोल प्रीत बोलली... अबोल प्रीत बोलली...

फितुरी ( त्या सावळ्या तनुचे वर आधारीत )

लेखक स्वाती३५११ यांनी रविवार, 18/08/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळ्या मनीचे मज लागले पिसे ग न कळे मनास आता कोठे शोधू त्यास ग येते ऐकण्यास जेंव्हा गोड म्याव-म्याव चोही कडे बघे मी, पकडण्यास घेते धाव ग हलते शेपटी ही लडीवाळ करते चाळा दुध पिउन तट्ट ती, माझ्यावर फिस्करी ग खुपते मनास माझ्या ती मटण खाई शेजारी डोळ्यात दिसते मग तिच्या, मलाच फितुरी ग

चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 18/08/2013 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
१. देवादिकांच्या पौराणिक कथा, हा जगभरातील कलवंतांना शतकानुशतके आव्हान देणारा लोकप्रिय विषय. भारतात लेणी व मदिरांमधील भित्तिचित्रांखेरीज हस्तलिखित पोथ्यांमधील चित्रांची समृद्ध परंपरा होती. उदाहरणार्थ खालील चित्रे बघा: s रावण-वध: (जलरंग) उदयपूर, इ.स. १६४८ d कुंभकर्ण वध : उदयपूर, इ.स.

न्याय

लेखक स्वाती३५११ यांनी रविवार, 18/08/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
काहिंच्या अस्तीत्वाच्या विळख्यात गुदमरायला होते सहवासाच्या वणव्यात होरपळायला होते काही जणांना पेटत्या आगपेट्या बनायला आवडत भाजलेल्या व्रणावर खोटे मलम ही बनायला आवडत उपदेशाचे कोरडे पाऊस ही बरसतात पावसात कोरडे रहायचे की ओले हे ही तेच ठरवतात. न्याय अन्यायाच्या परिभाषा बदलल्या आहेत अन्याय करणार्‍यांची लोकप्रियता वाढतच आहे आरोपीच्या पिंजर्‍यात न्याय उभा आहे अन्यायाच्या काळ्या कोटासमोर उलट तपासणी होत आहे. टाहो फोडुन सांगत आहे मी आहे हो खरा पण कोणास ठाऊक देवतरी देईल का त्याला थारा?

क्षण

लेखक स्वाती३५११ यांनी रविवार, 18/08/2013 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण क्षण हातातुन निसटुन जातात काही क्षण क्षणिक तर काही रुतून बसतात. सुखाची झुळुक तर दुखाची वादळ झुळुक क्षणिक तर वादळ रेंगाळतात. क्षण हातातून निसटुन जातात मागे पाहताच क्षण ओळख विसरतात काही मात्र मानगुटीवरची भूत बनतात. क्षण हातातून निसटुन जातात काही दिवाळी असतात काही होळी असतात काही सुखाची मोळी बांधतात. क्षण हातातून निसटुन जातात....