Skip to main content

विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे

लेखक पैसा यांनी शनिवार, 07/09/2013 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
विंचुर्णीचे धडे गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे.

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 06/09/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं? आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क अ

नर्मदा खो-यातून ...(१)

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 06/09/2013 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेली अनेक वर्ष ‘आंदोलन’ मासिक (http://www.andolan-napm.in) नियमित वाचनात असल्याने “सरदार सरोवर” विषय अद्याप संपलेला नाही याची माहिती होती. गुजरात आणि महाराष्ट्रात माझ्या कामाच्या निमित्ताने धरणग्रस्त परिसरातल्या लोकांशी बोलायची संधी यापूर्वी अनेक वेळा मिळाली होती. मे २०१२ मध्ये ‘सरदार सरोवराला’ भेट दिली होती. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामात शासकीय अधिका-यांसोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली होती. त्याचवेळी ‘पुन्हा एकदा धरणग्रस्त परिसराला भेट दिली पाहिजे आणि यावेळी ती भेट आंदोलनाच्या जाणकार लोकांसमवेत केली पाहिजे’ असं ठरवलं होतं.

विजय आणि भूक (शतशब्दकथा)

लेखक एच्टूओ यांनी शुक्रवार, 06/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
(मि पा वर लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुन्याजाणत्या मि पा करांनी सांभाळून घेणे. चू भू दे णे ) या वर्षीच्या नागपंचमीला आमच्या "वनमित्र" संघटनेच्या आंदोलनात जवळपास ५० नागांना गारुड्यांच्या तावडीतून जंगलात सोडलं.पोलिसांचीही लगेच मदत मिळाली आणि तत्पर कारवाई करून १२ गारुड्यांना तुरूंगात टाकलं. आधीच मिडिआला फोन केल्यामुळे, "अध्यक्ष" या नात्याने मी आंदोलनचे यश प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजयी मुद्रेने मांडले. घरी आलो. आजीशी बोलतांना तिने विचारलं "नागांना रानात सोडलं,चांगलच केलं. पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?" " अगं आजी, कायदाच आहे तसा" "ते काही मला कळत नाही सोन्या !

अर्धांग

लेखक तिमा यांनी गुरुवार, 05/09/2013 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीने शोषलेले, प्रवासाने शिणलेले ते आमचे अर्धांग, न्याहाळत असतो मी, पैलतीरावरुन ! अधुन मधुन ओळख दाखवतं, सटीसहामाशी, कधी वाट्याला येतं चिपाड बनून! तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत शोधू लागतो मी काजळमाया आणि शुष्क ओठांतली उरली सुरली थरथर प्रयत्न करुन! मग जाणवतात यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे एक उरकून टाकण्याची भावना बहुतकरुन!

परदेश प्रवासाकरीता मार्गदर्शन

लेखक मनिम्याऊ यांनी गुरुवार, 05/09/2013 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपाव सदस्यांकडून एक मदत हवी आहे. माझ्या पतिदेवाना एका नवीन नोकरीची संधी चालून आली आहे. जॉब साईट केनिया किंवा ब्राझिल यांपैकी एक असेल. साधारण एक ते दीड वर्षासाठी पाठवणार आहेत. आमच्यापैकी कोणालाही परदेश प्रवासाचा अनुभव नाही. त्यातून एकदम नोकरीसाठी जाणे म्हटल्यावर अनेक प्रश्न मनात आलेत. त्यामुळे मग मिपाची मदत घेण्याचे ठरवले. पहिला प्रश्न असा की वरील निर्देशित देशांमधे दरमहा साधारण खर्च किती येतो (रुपयांमधे). (पगाराच्या मागणीसाठी जरूरी माहिती). तसेच प्रवासासाठी आवश्यक पूर्वतयारी काय करायला हवी?

उसवला शर्ट नवीन पुन्हा –

लेखक विदेश यांनी गुरुवार, 05/09/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल – उगवला चंद्र पुनवेचा ) “उसवला शर्ट नवीन पुन्हा, मज देई शिवुनिया-“ उखडला पति तिचा || "काही सुया अशा घुसल्या, सटकुनी अडकुनी तुटल्या, मम बघा रुधिर क्षती बोचल्या-" करुणरस तो गळु पडे, खवळता, पत्निचा || .
काव्यरस

कायद्यात काही 'जादूटोणा' नाही

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 05/09/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
एडव्होकेट निर्मलकुमार सूर्यवंशी, महोदय, आपला दि ५ सप्टेंबर २०१३ च्या लोकसत्तामधील 'कायद्यात काही "जादूटोणा" नाही' अशा समर्पक शीर्षकाचा लेख वाचला. गैरसमज दूर व्हावेत याबाबत आपले लेखन स्तुत्य आहे. काही विचारणा - १. ज्या व्यक्तींच्या अनंत कष्टांमुळे हा कायदा निदान १२ कलमाच्या रू़पात सध्या सादर केला आहे, त्यांच्या संस्थांला या कलमांच्या आधारे दोषी लोकांना शोधायच्या व शिक्षा करायच्या कामात मदतनीस म्हणून सहभागी करता आलेले आहे की नाही? २.

नवोदित कवींना आवाहन

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 05/09/2013 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी- कै. सौ. प्रभावती केसकर यांच्या जन्मशताब्दीची या २५ ऑक्टोबर ला पूर्तता होत आहे. या जुन्या काळातल्या लेखिका-कवयित्री. त्यांनी आपल्या काव्यगायनाने अनेक समारंभ व कवीसंमेलानातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कविता आशयपूर्ण तर होत्याच, शिवाय गेयही होत्या.

पुन्हा अनोळखी होऊ .....!!

लेखक psajid यांनी गुरुवार, 05/09/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….