Skip to main content

पुन्हा अनोळखी होऊ .....!!

लेखक psajid यांनी गुरुवार, 05/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन…. पुन्हा अनोळखी होऊ ठेवताना अर्धीच कविता त्रास तुला, यातना मलाही, थिटेच होते हात आपुले चल, त्यांनाही कलम करू ...... सखे गं पुन्हा अनोळखी होऊ - साजीद पठाण
लेखनविषय:

वाचने 916
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया