Skip to main content

वेद आणि विज्ञान

लेखक श्रीनिवास टिळक यांनी सोमवार, 09/09/2013 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी वेद आणि विज्ञान या विषयावर चर्चा झाली होती. त्या संदर्भात मी प्रो. डोंगरे आणि डॉक्टर नेने यांनी महर्षी कणाद यांचे पदार्थविज्ञान आणि अम्शुबोधिनी शास्त्र यांवर लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला होता. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर नेने यांनी नुकतेच पुणे आकाशवाणीवर भाषण दिले त्याचा दुवा देत आहे. https://mail.google.com/mail/u/0/?ui=2&ik=a3dfa7f36d&view=att&th=141029…

गुळ पापडी.

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 09/09/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
गुळ पापडी - साहित्य :- एक वाटी कणिक ,तीन चमचे साजूक तूप ,अर्धी वाटी चिरलेला गुळ . इतर साहित्य -वेलचीपूड ,भाजलेला खोबरं कीस,ड्रायफ्रूट चे तुकडे घालू शकतात .

गुडबाय मि. चिप्स

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/09/2013 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल. छोट्या आकारातली शे - सव्वाशे पाने वाचायला असा कितीसा वेळ लागणार. एका बैठकीतच संपवले. इतका मंत्रमुग्ध झालो की लगोलग दुसर्यांदा वाचले आणि मग जाणवले की कथानायकाचे नावच संपुर्ण पुस्तकात नाही. गुडबाय मि.

गणेशशिल्पे

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 09/09/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशचतुर्थीच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भटकंतीच्या निमित्ताने लेणी, मंदिरे फिरता फिरता आढळलेल्या गणेशमूर्ती आज येथे देत आहे. ह्या मूर्ती निवडतांना मुद्दामच प्राचीन काळातील निवडलेल्या आहेत. साधारण ८व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंतच्या ह्या मूर्ती. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार ते यादव या राजवटींमधील ह्या मूर्ती. त्या काळी गणेशदेवतेला मुख्य देवतांत स्थान नव्हते म्हणूनच ह्या काळात गणेशमूर्ती मुख्य गर्भगृहांत कधीही नव्हत्या. त्या कोरलेल्या असायच्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांतील गणेशपट्टीवर किंवा सप्तमातृकांपटांमध्ये. १.

दुनियादारीच्या निमित्ताने…

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 09/09/2013 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्‍याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्‍याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते. मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली.

मिपावर्धापनदिनाच्या शुभेच्छा...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/09/2013 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा.. तसेच नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..! आपला नम्र, (मिपा संस्थापक) तात्या. ---- कृपया आम्हाला येथे भेटा - शिळोप्याची ओसरी - https://www.facebook.com/groups/kbdbliberal/

भारताची अर्थव्यवस्था: च्यायला, नक्की झालंय तरी काय?

लेखक चाणक्य यांनी रविवार, 08/09/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने आपण रोज ढासळणारा रूपया, निर्देशांकात होणारी घट, कमकुवत होत चाललेली भारतीय अर्थव्यवस्था याबद्द्लच्या बातम्या ऐकतो, पाहतो, वाचतो आहोत. त्यातच पंतप्रधानांनी येणारा काळ आपल्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण असेल असे स्पष्टपणे राज्यसभेत सांगितले. अगदी काल परवा पर्यंत 'भारत उद्याची महासत्ता आहे' , 'भारताचे भविष्य कसे उज्वल आहे', 'भारत गुंतवणूकीसाठी कसा योग्य देश आहे' हे जो तो सांगत होता. (अर्थात, देशांतर्गत घडामोडींवर नजर ठेवून असणा-यांना यातला फोलपणा लक्षात आला होता म्हणा) पण मग अचानक आपली अर्थव्यवस्था ईतकी आजारी कशी पडली? बरं याची कारणंही रोज वेगवेगळी ऐकायला येतायत.

पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (५)

लेखक शिवोऽहम् यांनी रविवार, 08/09/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४) ************************************************************************************************ गुलाल करताना समाधान मिळाले पण सिनेमा रिलीज व्हायला २००९ साल उजाडावे लागले. या ना त्या कारणाने. मधल्या काळात पोटापाण्याची व्यवस्था करायलाच हवी ना! अनुराग कश्यपच्या बहुचर्चित 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये थापाचा रोल केला. तो कस्टम्स इन्स्पेक्टर ज्याने पैसे खाऊन RDX ने भरलेले ट्रक्स पास करुन दिले. पुढे त्याच RDX ने मुंबईच्या नरड्यावर पाय दिला. पण हा रोल शेवटच्या एडिटिंगमध्ये कट झाला.

'दुनियादारी'ची बीजे...

लेखक अजिंक्य विश्वास यांनी रविवार, 08/09/2013 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच यशस्वी झालेल्या 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दैनिक ’दिव्य मराठी’ मध्ये ’रसिक’ पुरवणीत आलेले सम्राट शिरवळकर यांचे २ अप्रतिम लेख आले होते. त्यापैकी १ लेख ('सुशिं'ची झपाटलेली दुनिया!) मी आधीच पोस्ट केला आहे. आता राहिलेला १ लेख स्वत: लेखकाची परवानगी घेऊन पोस्ट करत आहे.