Skip to main content

पिझ्झा

लेखक म्हैस यांनी रविवार, 08/12/2013 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टीच्या दिवशी तेच तेच खायचा कंटाळा आला असेल तर एकदम मस्त आणि फक्त ३०-३५ मिनिटात होणारा हा pan पिझ्झा. साहित्य : पिझ्झा बेस (बेकरीत २५ रुपयाला ३ पिझ्झा बेस मिळतात ) २ पिझ्झा साठी ३ चीज कुब्स (जास्त चीज हवे असेल तर जास्त चीज कुब्स आणावेत) पिझ्झा सॉस (कुठल्याही मॉल मध्ये किवा किराणा मालाच्या दुकानात सुधा मिळतो. ) लाल तिखट मीठ पातळ उभा चिरलेला कांदा , टोमाटो , ढोबळी मिरची थोडसं तूप किवा बटर ओरिगानो , चिली flex (हवेच असं काही नाही. नसले तरी चालतात. ) प्रथम चीज चे covers काढून फ्रीज मध्ये ठेवावेत . कारण पिझ्झा गरम असतानाच चीज घालायचं असता.

टी एन शेषन , केजरीवाल अन भारत ....

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 08/12/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चार विधानसभांचे निवडणूक परिणाम प्राप्त झालेले आहेत. व त्यात भाजप ची सरकारे चारही राज्यात येणार हे दिसते आहे. भाजपाला असलेला पाठिंबा वाढला आहे का ? याचे उत्तर हे निकाल देउ शकणार नाहीत त्यासाठी मतदानाची आकडेवारी अभ्यासावी लागेल. आम आदमी चा दिल्लीतील उदय हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पूर्वी एक नोकरशहा ने असा इतिहास घडवलेला आहे. त्यांचे नाव श्री टी एन शेषन . पण शेषन साहेब काही निवडून येउ शकलेले नाहीत. केजरीवाल ना जे यश मिळालेले आहे त्याची दिलखुलास दाद देताना अण्णा हजारे यांची जीभ लटपटते आहे तर केजरीवाल यांची फजिती होणार आहे असे काही लिखित माध्यमाचे संपादक म्हणू लागले आहेत.

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस चौथा-पाचवा/भाग १

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 08/12/2013 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
================== भाग १, भाग २, भाग ३, ================== आज सहलीचा चौथा आणि पुखेत मधला शेवटचा दिवस. ह्या दोन दिवसात ईथल्या समुद्रानी वेड लावलं होत. पुन्हा कधीतरी फक्त पुखेतवारी करायची आणि जीवाचं पुखेत करायचं हा निश्चय करुन बँकॉक कडे प्रयाण केलं. आता पुढले दोन दिवस पट्टाया मधे वास्तव्य होतं. यथाअवकाश बँकॉक एअरपोर्ट वर उतरुन व दोन तासाचा प्रवास करुन ईबीस पट्टाया मधे चेकईन केलं. १.

डे ट्रेड.....सो एक्सायटिंग

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 08/12/2013 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
किती हि तोटा झाला तरी सगळ्या ट्रेडर्सचा जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा डे ट्रेड करावा की नाही ? हा प्रश्न तितकासा महत्वाचा नाही त्यांना ज्यांना करायचाच असतो त्यांना. पण मग कसा करावा हा डे ट्रेड. चला, शोधून काढू. प्रथम कोणत्या शेअर मध्ये डे ट्रेड करावा त्याचे दोन नियम आहेत. १) ज्याचा व्हॉल्यूम अवरेज ५००००० आहे असा कोणताही शेअर. त्याच बरोबर २) ज्याची वर खाली करण्याची शक्ती (व्होलाटेलीटी )किंवा स्प्रेड (हाय - वजा - लो ) भरपूर आहे. उदा. एस बी आय...

मिसळपाववर नवे दालन.

लेखक ज्ञानव यांनी रविवार, 08/12/2013 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाककृती,भटकंती साहित्य वगैरे टिपिकल मराठी विषयांव्यतिरिक्त अर्थ विषयक घडामोडी आणि चर्चा ह्याकरिता मिपावर एक दालन उघडण्यात यावे जेणे करून अर्थ साक्षरता वाढीस लागेल असे मला वाटते. तसेच ह्यापूर्वी प्रसिद्ध झालेले अर्थविषयक धागे ह्या दालनात आणून रचून ठेवावेत असे वाटते. सर्व क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणाऱ्या मराठी माणसासाठी ते एकच क्षेत्र असे आहे जिथे तो "दादा" बनून वावरू शकतो तुम्हाला काय वाटते? (जर हा धागा इथून उडवला गेला नाही तर द्या तुमचे मत आणि उघडा नवे दालन )

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका - भाग २

लेखक विकास यांनी रविवार, 08/12/2013 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका हा श्रीगुरुजी यांचा धागा दोन पानाहून जास्त झालेला असल्याने निवडणुकांचे काही तासात लागणारे निकाल ट्रॅकींग करणे आणि त्यावर / त्यासंदर्भात चर्चा करणे अवघड जाऊ शकते. म्हणून हा धागा काढत आहे आणि त्या धाग्याऐवजी हा धागा वापरण्याची विनंती करत आहे. काही मुलभूत माहिती:

२०१३ अंदाज

डिसेंबर........

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 08/12/2013 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन डिसेंबरात आभाळ दाटून आलंय. ते तसे नेहमी एखाद्या दिवशी होतंच. "डिसेंबर" खरं तर मासानां मार्गोशीर्षोहमः म्हणावा असा. डिसेंबर म्हणजे नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली असते. सुट्टी संपवून शाळा कॉलेजे रुळावर येत असतात. गॅदरिंग चे वेध लागलेले असतात. दिवाळीच्या सुट्टीचा म्हणा की मस्त थंड हवेचा परीणाम म्हणा बहुतेक जण दुपारी सुद्धा उत्साही असतात. घरी कसाबसा एखादा कप चहा पिणारे मस्त पैकी आलं टाकून केलेल्या वाफाळत्या चहाचे दोन तीन राउंड सहज करतात. सकाळचे कॉलेज असणारांची तर एक वेगळीच मजा असते. भल्या पहाटे अंथरुणावरुन बाहेर पडायची इच्छा नसते.

श्री - भाग १

लेखक मीता यांनी रविवार, 08/12/2013 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
"श्री आपण नाही भेटू शकत आता कधीच" "पण का ? मला बोलायचं आहे खूप तुझ्याशी." "तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे . " "मीतू तुला एक सांगू ? " "सांग ना." "तू तशीच आहे माझ्यासाठी जशी भेटली होतीस पहिल्यांदा .काहीच नाही बदललं. सोडून गेलीस तेव्हा खूप राग आला तुझा. खुप तिरस्कार केला .पण तुझ्या वर प्रेम करणं नाही थांबवू शकलो." "आपण या विषयावर नको बोलूया आता ." "मीतू नीट राहशील ना ?

गीतगुंजन - २१ -> Locomotive Breath

लेखक प्रास यांनी रविवार, 08/12/2013 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
'इयन अ‍ॅन्डरसन' बद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल वाटायचं. आज वयाच्या सहासष्टीत असलेल्या इयनला मी पहिल्यांदा पाहिलं, ऐकलं ऐंशीच्या दशकात. १९७२ पासून भारतात नियमितपणे कार्यक्रम करणार्‍या 'जेथ्रो टल' या प्रोग्रेसिव्ह-हार्ड रॉक ग्रूपचा निमंत्रक आणि म्होरक्या गायक म्हणून इयन प्रसिद्ध आहे. मला पाश्चात्य संगीतामधलं ओ की ठो कळत नसताना, (अर्थात आताही मला काही फार कळतंय, अशातला भाग नाही पण तरीही) मला त्याच्या शैलीबद्दल अगदी अप्रूप वाटायचं. त्याची साधी गाणीही ऐकायला काहीशी वेगळीच वाटायची, ती त्याच्या त्या शैलीमुळेच.

ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक - श्री. विनय आपटे यांचे मुंबईत दु:खद निधन*~*~*~*

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 07/12/2013 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
रंगभूमीवरील, नाट्य-सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार- दिग्दर्शक- "विनयजी आपटे" यांचे अन्धेरी येथील अंबानी हॉस्पिटल'मध्ये दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले... खरोखर या हरहुन्नरी अभिनेत्याचे असे 'जाणे' चटका लावून गेले. *~*~*~*~*~*~* भावपूर्ण श्रद्धांजली...*~*~*~*~*~*~*