मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिझ्झा

म्हैस · · पाककृती
सुट्टीच्या दिवशी तेच तेच खायचा कंटाळा आला असेल तर एकदम मस्त आणि फक्त ३०-३५ मिनिटात होणारा हा pan पिझ्झा. साहित्य : पिझ्झा बेस (बेकरीत २५ रुपयाला ३ पिझ्झा बेस मिळतात ) २ पिझ्झा साठी ३ चीज कुब्स (जास्त चीज हवे असेल तर जास्त चीज कुब्स आणावेत) पिझ्झा सॉस (कुठल्याही मॉल मध्ये किवा किराणा मालाच्या दुकानात सुधा मिळतो. ) लाल तिखट मीठ पातळ उभा चिरलेला कांदा , टोमाटो , ढोबळी मिरची थोडसं तूप किवा बटर ओरिगानो , चिली flex (हवेच असं काही नाही. नसले तरी चालतात. ) प्रथम चीज चे covers काढून फ्रीज मध्ये ठेवावेत . कारण पिझ्झा गरम असतानाच चीज घालायचं असता. नंतर कवर काढत बसलं तर तिकडे पिझ्झा गार होवून जातो . कृती : १. एका पसरत ताटात पिझ्झा बेस घ्यावा. वरचा भाग चमच्याने खरवडून काढावा. त्यावर ३-४ चमचे पिझ्झा सॉस पसरवून घ्यावा. २. आता ह्याच्यावर उभा , पातळ चिरलेला कांदा, टोमाटो , ढोबळी मिरची पसरवून टाकावी . वरून लाल तिखट आणि मीठ हवा असेल तेवढा भुरभुरवा p2 ३. आता बाजूचा चुरा पुन्हा त्याच्यावर पसरवा. आणि हाताने थोडा दाब द्यावा. p3 ४. तवा गरम करून त्यावर तूप किवा बटर पसरवावे . त्यावर हा पिझ्झा घालावा. मंद आचेवर ४-५ मिनिटे भाजून द्यावा. आच मंदच ठेवावी नाहीतर त्याचा जळल मेलं लक्षण होतं . p4 ५. उलथन्याने उलथून दुसर्या बाजूने ३ मिनिटे भाजावा. p5 ६. आता ताटामध्ये उतरवून पटकन चीज किसून घालावे. आणि हाताने थोडा दाब द्यावा म्हणजे चीज पिझ्झ्यावर बरोबर बसेल. p6 झाला पिझ्झा. आता ह्याचे ४ किवा ६ भाग करावेत आणि खावेत.

वाचन 13797 प्रतिक्रिया 0