Skip to main content

दिल्ली निवडणूक नंबर २

लेखक देशपांडे विनायक यांनी शनिवार, 14/12/2013 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
श्री केजरीवाल यांचे पत्र इथे ही निवडणूक व्हावी असे मला वाटते कारण लोकशाहीत स्पष्ट बहुमत असण्यास महत्व मिळेल श्री केजरीवाल यांनी लिहिलेले पत्र किती परिणामकारक ठरते ते समजेल राजकारण सरळ बाळबोध असावे का याचे उत्तर मिळेल [ काही वर्षापूर्वी इंदिरा गांधीनी ''सरकार बनानेके लिये समर्थन दिया था सरकार चलानेके लिये नही ''] असले पक्ष इतरत्र निघू शकतील असले पक्ष राज्यकारभार चालवू शकतील का याचे उत्तर मिळण्याची संधी मिळेल

मुंबई कट्टा

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 14/12/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे. ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे.

चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन

लेखक सचीन यांनी शनिवार, 14/12/2013 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातून जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आहेत.लालूंनी भ्रष्टाचार केला असेल तर न्याय व्यवस्था त्यांचा योग्य न्याय करेलच. बर्याच जणांना असे वाटते कि लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच लालुना बाहेर काढले असावे?काय असेल ते असो मात्र लालूंचे एका गोष्टी साठी नेहमीच कौतुक वाटत राहील ती म्हणजे अडवानींची रथयात्रा रोखण्याची हिम्मत.

वॉरेन अँडरसन, देवयानी खोब्रागडे यांची निर्दोषता, अटक,विवीध चूका

लेखक माहितगार यांनी शनिवार, 14/12/2013 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
देवयानी खोब्रागडे या सध्या आमेरीकेत कार्यरत भारतीय राननैतीक अधिकारी स्त्री बद्दल आमेरीकेतील अटकेबद्दल मिपावर आधीचा दुवा संबंध नसलेल्या जाती विषयक विषयावर अक्षरशः विनाकारण गेल्यामुळे वेगळा दुवा काढत आहे. १) आमेरीकेत येणार्‍या भारतीय राजनैतीक अधिकार्‍यांना तेथील राजनयीक इम्यूनिटीच्या स्थानिक मर्यांदा बद्दल सुयोग्य पुर्वमार्गदर्शन करण्याची तेथील अनुभवी भारतीय वकिलातीतील अधिकार्‍यांची जबाबदारी होती ती पार पाडण्यात एकुण कुठल्यातरी स्तरावर कमतरता निश्चीत आहे. २) देवयानी खोब्रागडे या दोन लहानग्या मुलांची कौटूंबिक जबाबदारी असलेल्या एक स्त्री राजनैक अधिकारी आहेत.राजनैक अधिकार्‍यांना दिर्घकाळ घराबाहे

प्रौढखणी

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 14/12/2013 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
विखुरले आरसे शब्दांचे प्रतिबिंब न्हाइले आठवणी कातळ विरले झरले पाणी ओंजळीत अडखळले कोणी मय कथा जाहल्या जन्माच्या अनुशेष शेष मन अनवाणी पाऊल न वा चाहूलहि ना अवशेष शोध हा मूकपणी विलयली सकल लाघव वाणी हृदयी अवखळ सागर करणी उरली अवघड अक्षर लेणी ही व्यथा कहाणी प्रौढखणी ………………… अज्ञात
काव्यरस

मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत....

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 14/12/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी? त्याला साधा सोपा अभ्यास काय ? तांत्रिक (आणि त्या मागील मांत्रिक )विश्लेषण बाजूला ठेऊन जर सुरवात करायची असे असेल तर एक सोपी पद्धत खालील प्रमाणे :- कंपनी : बँक ऑफ इंडिया वर्ष : २०१३ महिना ------- उच्च पातळी (हाय) ............ नीचतम पातळी (लो) जानेवारी ------- ३९३ ............ ३३२.४०(अ) फेब्रुवारी ------- ३५८.५० ............ ३१२.१० मार्च ------- ३३०.७० ............ २८१.९० एप्रिल ------- ३४५.८० ............

आज ग. दि. मा यांचा स्मृती दिन

लेखक psajid यांनी शनिवार, 14/12/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ग. दि. मा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये शेटफळे या गावी झाला. अभंग, भावगीत, बालगीत, लावणी, आरत्या, भूपाळी, अंगाई, समूहगीते, राष्ट्रगीते इत्यादी बरोबरच 'दो आंखे बारह हाथ', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' यासारखे दर्जेदार चित्रपट लिहणारे अद्वितीय शब्दप्रभू ! 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'कानडा राजा पंढरीचा' या सारखे अभंग, 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' या सारखी बालगीते, 'जाळीमंधी पिकली करवंध', 'बुगडी माझी सांडली गं' यासारख्या लावण्या लिहणाऱ्या गदिमांनी 'जग हे बंदिशाळा' सारखे कटू सत्य जगापुढे मांडले.

जात कुठून आली ह्या गोष्टीत

लेखक विदेशी वचाळ यांनी शनिवार, 14/12/2013 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ मध्ये देवयानी खोब्रगाडे यांच्याबद्दल बातमी वाचली. थोडेसे खटाकले. नाचक्की झाली वैइगेरे लिहून आले होते. पण काही गोष्टी जाणीव पूर्वक किंवा अजाणतेपणी वगळल्या होत्या. प्रतिक्रिया बघताना लक्षात आले की त्या येथे येऊन केवळ २० दिवस झले आहेत. एवढ्यात वीसा गैर व्यवहार आणी मानवी तस्करी करणे शक्या तरी आहे का? तासेही मानवी तस्करी हा शब्द भलताच जोरदार आहे. तस्करी म्हणजे, माझ्या मते, बिना वीसा चे लोका देशात घुसवणे. पण सदराहू कामवली (जिला त्या कमी पगार देत होत्या हा त्यांच्यावर आरोप आहे. माहिती नाही की २० दिवसात हा आरोप कसा लागू शकतो. पगार पण ३० दिवसानंतर मिळतो.

फसवणूक

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 13/12/2013 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका डॉक्टरांशी गप्पा मारत होतो ,डॉक्टर तसे जवळचे मित्रच आहेत ,पण बोलता बोलता त्यांनी जे संगितले ते अतिशय धक्कादायक होते ... आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्‍या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे . पण या उपचारात जे पुरुषाचे बीज वापरले जाते , ते नक्की त्याच जोडप्यातील पुरुषाचे असते का? तर याचे उत्तर धक्कादायक आहे. हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे . मूल कशासाठी हवे असते ? तर आपला जेनेटिक वारसा /डीएनए / वंश पुढे चालू राहावा यासाठी.

ढाण्या वाघ सुटला

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 13/12/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आया रे आया रे आया आरे आया रे आया रे आया बॉडीगार्ड... दुख भरे दिन बीते रे भईया, अब सुख आयो रे.. sher ki dahaad ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का इस देश मे यारो.. लोकहो, आनंदाने नाचा, गा. आज बब्बर शेर बाहेर येणार.
कृष्ण भगवान को भी जेल कि दीवारें कभी रोक नही पायी. एकेक करते सभी ताले टुटते गये.. भईया, उसी कृष्ण यादव का ललवा भी उसी नक्शेकदम पे चलके बाहर आया है. जेठ राम थे साथ में.