Skip to main content

'अद्वैत'

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 02/02/2014 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
'अद्वैत' खांद्यावर रूळते कुंतल बट नादान ओठावर हलके स्मीत : कळ्यांचे रान ! क्षण एक अडकतो मत्स्य जसा जाळ्यात नयनातुन उसळे इंद्रधनुष्यी बाण ! जणू संगमरवरी आरस्पानी कात वक्षात धपापे चंद्र नवा बेभान मनी बधीर भुंगा : भरकटतो विरक्त रात्रीस कवळते आसक्ती वैराण ! नागीण विराजे लवलवती देहात रक्तातुन तुटती तीव्र विजेचे ताण ! श्वासातुन उसळे राग असा बेफाम रात्रीला छळते दूर उषेचे गान बेशीस्त र्रुतुंच्या उजाड भिंतीवरती अस्वस्थ उगवती लवलवती हे प्राण । गात्रात विरघळे गात्र असे बेफाम देहात विजेचा लोळ उसवतो त्राण । अंधार युगांचा असा झळाळुन येतो, प्रीतीत निथळते अद्वैताचे दान। डॉ.

काळा घोडा फेस्टिवल कट्टा .... ८/२/२०१४

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 02/02/2014 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कसे आहात? रविवारचे जेवण कसे झाले? वामकुक्षी झाली असेलच किंवा वामकुक्षीच्या तयारीत असालच. कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की , आपला हेमांगी के ह्यांच्या बरोबरचा डोंबिवली कट्टा छान पार पडला.प्रथे प्रमाणे पुढील कट्ट्याची योजना पण लगेच तयार झाली. तर मंडळी, आपला पुढील कट्याची योजना / रुपरेखा देत आहे. वार : शनिवार दिनांक : ०८ फेब्रुवारी २०१४ वेळ : भेटण्याची वेळ सकाळी ९ वाजता.बरोब्बर ९:१५ मिनिटांनी भ्रमणास सुरुवात होईल. भेटण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी टर्मिनस पहायच्या गोष्टी , काळा घोडा फेस्टिवल आणि मग फोर्ट मधल्या सुंदर आणि भव्य इमारती. आणि हे सगळे दाखवाय

मिपा ची सवत!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 02/02/2014 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझ्यासारखे अनेक लोकं मिपाचे फार पूर्वीपासूनचे सभासद आहेत. मी मिपावर नाही म्हंटलं तरी बर्‍यापैकी लेखनही केलेलं आहे. पण पूर्वीपासून इथे लेखन करण्यातली एक अडचण म्हणजे तुमच्या लेखनात जर फोटो टाकायचे असतील तर ते डायरेक्टली इथे टाकता येत नाहीत. त्यासाठी मग प्रथम फ्लिकरवर जा, तिथे फोटो लोड करा, आणि मग इथे त्या फोटोंची लिंक द्या वगैरे सव्यापसव्य करावं लागतं.... पूर्वी हे सगळं केलंही. पण आता स्वतःच्या ब्लॉगवर किंवा फेसबुकावर सरळ डायरेक्टली आपल्या लॅप्टॉपवरून फोटो अपलोड करता येतात.

चांदणचकवा

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 01/02/2014 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
काट्यांत हरवली वाट संदिग्ध पावले माझी वळणावर एका अवचित अबोल होऊनी गेली.... वस्ती ही आता दूर वळ्ण्याचा नाही धीर एकाकी निर्जन रानी हे श्वास ही होती तीर.... जगण्याचे वादळ शमले मृत्युची ओढ न उरली निस्तब्ध शांत या रात्री ओझेच सावली होई.... भिरभिरतो रानी आता दिशाहीन जणू रावा जगण्याच्या आवर्ताला मरणाचा चांदणचकवा... पद्मश्री चित्रे (फुलवा)
काव्यरस

पुणे आंतरराष्र्टीय पतंग महोत्सव

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 01/02/2014 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या शनिवारि २५ तरखेला पेपरमधे पतंग महोत्सवाची जहिरात पाहीली.तसा त्याचा आधिपासूनच गाजावाजा चालला होताच,त्यात मिपावर अहमदाबादच्या महोत्सवाचे वर्णन आणि फोटो पाहिल्यावर तर महोत्सव मुलांसाठी तरी पहायला हवा असे वाटले.

सोयीस्कर गांधीवाद

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 01/02/2014 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Premise Four: Civilization is based on a clearly defined and widely accepted yet often unarticulated hierarchy. Violence done by those higher on the hierarchy to those lower is nearly always invisible, that is, unnoticed. When it is noticed, it is fully rationalized. Violence done by those lower on the hierarchy to those higher is unthinkable, and when it does occur is regarded with shock, horror, and the fetishization of the victims.
-Derrick Jensen (Endgame)

नाटक...

लेखक psajid यांनी शनिवार, 01/02/2014 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली

फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/01/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्‍यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.

मदगन्ध

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 31/01/2014 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओठावर प्रणयी ओल स्नेहमय शब्द जिव्हाळ्याचे ओषाड घनातिल जणू धरेवर अगतिक वळवाचे सढळ समागम तृप्त विसावा खेळ ऐहिकाचे मोहरलेले अंग अंग उधळी मदगंध मनाचे ……… अज्ञात
काव्यरस