Skip to main content

२०२२ मधील उत्तर ते दक्षिण - लेह लडाख ते कन्याकुमारी - प्रवास अनुभव

लेखक व्लॉगर पाटील यांनी मंगळवार, 03/01/2023 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
२०२२ हे एक रोडट्रीप special dream वर्षे होत , कारण एकाच वर्षात भारतातील २ अशी ठिकाणे , जे प्रत्येक पर्यटन प्रेमी च्या लिस्ट मदे टॉप ला असतात . पहिलं म्हणजे लडाख - भारताचं उत्तरेकडील टोक आणि दुसरा कन्याकुमारी - भारताचं दक्षिण टोक . लेह लडाख - भरपूर लोक बोलले फर्स्ट time मध्ये पुणे लडाख पुणे सोप्प नाय , अर्ध्यातूनच याल, गाड्या ट्रेन ला लोड करून दिल्ली पासून जा , पण नाही या वेळी पक्कं ठरवलेलं पुणे ते पुणे करायचंच. जवळपास १५ दिवसांचा प्रवास , जातानाचा प्रवास : मुंबई - सुरत highway - वडोदरा - मोडासा - जयपूर - हरियाणा - अंबाला - पठाणकोट - श्रीनगर मार्गे लेह.

समर्थ रामदास: श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 03/01/2023 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय रघुवीर समर्थ (श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात, देशभरात श्री दासबोधाचे निरुपणाचे कार्यक्र्म सुरू आहे. जानेवारी 2023 महिन्यात दिल्ली केंद्राला पाच रविवारी हा कार्यक्र्म सादर कारण्याचा मान मिळाला. पहिल्या रविवारी मला श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण करण्याचे दायित्व मिळाले. दिल्ली केंद्राचे दायित्व निर्वाह करणार्‍या डॉक्टर मंगला कवठेकर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली. हा कार्यक्र्म 1 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 4 ते 5 ऑन लाइन झाला. पुढील कार्यक्रम ही रविवारी याच वेळी होतील). श्री समर्थ व्यवस्थापन या विषयाचे आद्य गुरु होते.

मेळघाटच्या जंगलात.....

लेखक चक्कर_बंडा यांनी सोमवार, 02/01/2023 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत गड-किल्ल्यांच्या वाटा तुडवताना सह्याद्रीची बरीच भटकंती केली होती. सह्याद्रीतील जंगलांचा प्रकारच वेगळा. सरळसोट अजस्त्र कातळकडे असलेले डोंगर, डोंगरांच्या बुंध्यात गच्च हिरवी, डोंगरउतारावर खुरट्या गवताळ झुडुपांची, माथ्यावर काट्याकुट्यांची ही जंगले. अन्न साखळीतील वरच्या वर्गात असणाऱ्या वन्य प्राण्यांचा वावर जवळपास नाही म्हणावा की काय इतका तोकडा......त्यात किती ही दुर्गम भागात गेलो तरी दिसणारी पंचतारांकित रिसॉर्टसची अजस्त्र बांधकामे. गाड्यांची, माणसांची गर्दी.... अशा सर्व परिस्थितीत मग वाघाचं जंगल पहायचं म्हणजे विदर्भ गाठण्याशिवाय पर्याय नाही.

बँक आफ दरोडा !

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 02/01/2023 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
चोरांनी बॅंकेत बसूनच चर्चा केली अन् नंतर २० रुपयांचे लाखभर चिल्लर; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - https://maharashtratimes.com/maharashtra/raigad/a-robbery-took-place-at… दोन चोर बँकेत शिरले, एक्झाॅस्ट फॅन काढून वरचा. मग सोफ्यावर बसून तासभर केली चर्चा. समजू नका त्यांना एवढे थिल्लर दोन लाखाची चोरली चिल्लर बोईसर चे तारापूर रोड डोईजड झाले चोरावर मोर पोलिसांनी पाहिले ते CCTV फूटेज, धरले दोघा चोरांना,बाहेर आले लूटेज.

मंटी बिंटी आणि घंटी

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 01/01/2023 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मंटी बिंटी आणि घंटी ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- मला प्राणी आवडत नाहीत अन हिने मांजर पाळलं . म्हणजे माझं काय झालं असेल ?...ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांनाच माझं दुःख कळू शकेल . पापी पेटका सवाल साला ! हुं ! पेट ! एवढी मोठी बाई ! जी नवऱ्याला नाचवू शकते, ट्रेन करू शकते,गोंडा घोळायला लावू शकते, ती उगा एखाद्या प्राण्याच्या मागे का लागावी? तेही मी असताना ! तिला प्राण्यांची फार आवड आहे , फार कळवळा आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. खरं कारण वेगळंच होतं. तर हिने मांजर पाळलं .

नववर्ष नवहर्ष

लेखक बाजीगर यांनी रविवार, 01/01/2023 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्ष नवहर्ष नवदर्श मनी नवा भास नव आस नवा श्वास मनी नव शब्द नव लुब्ध नवप्रारब्ध मनी नव वक्त नव शक्त नव मुक्त मनी नव दिसणं नव असणं नवा जश्न मनी नव पर्व नव सर्व नवा सूर्य मनी नव सव्य नव भव्य नव काव्य मनी नवा देश नव आवेश नव वेश मनी नव वारे नव तारे नव सारे मनी नव वर्ष नव स्पर्श नवआदर्श मनी

नको ना रे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2022 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको

राजगड -फोटोवारी

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 31/12/2022 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी डिसेंबरची फुरसत आहे, पण मुलांचे आणि आमचे टाईमटेबल जुळेना, सकाळी हा क्लास, संध्याकाळी तो क्लास असे काय काय. शेवटी आज जाउ, उद्या जाउ करता करता एक दिवस आम्ही म्हातारा-म्हातारी दोघेच जायचे ठरवले आणि सकाळी १०.१५ ला निघालो. बरोबर पोळी भाजीचा डबा आणि भरपुर पाणी असल्याने चिंता नव्हती. गाडी सरळ कात्रज कडे वळवली आणि खेड शिवापुर टोल पार करुन चेलाडी फाट्याला वळलो. बनेश्वर पार करुन साखर,मार्गासनी,केळद,विंझर, मढे घाट असे जुन्या ओळखीचे बोर्ड बघत बघत गुंजवण्यात ११.३० ला पोचलो.

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : :भाग ४: धर्मशाळा ते पालमपूर प्रवास व पर्यटन स्थळे

लेखक गोरगावलेकर यांनी शुक्रवार, 30/12/2022 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ येथे वाचा आजही लवकरच जाग आली. काही जण लवकरच सूर्योदय पॉइंटला निघून गेले होते. आम्ही मात्र गच्चीत गरमागरम चहाचे घोट घेत सभोवतालच्या पर्वतरांगाचे विलोभनीय दृश्य नजरेत आणि कॅमेऱ्यात सामावून घेत बसलो.

सुंदर बीकानेर

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 30/12/2022 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
लालगढ राजवाडा सुंदर, आलिशान राजवाडे, मंदिरं, अन्य ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्य असलेल्या राजस्थानात देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. राजस्थान म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं थरचं वाळवंट आणि त्यात संचार करणारे उंट.