९० डिग्री साऊथ - ११
९० डिग्री साऊथ - १०
१५ मार्चला चेरी-गॅराड आणि डिमीट्री हट पॉईंटला येऊन पोहोचले. परतीच्या प्रवासात डिमीट्रीने आपलं डोकं जडावल्याची आणि उजव्या हातात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. हट पॉईंटला पोहोचल्यावर त्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली होती. चेरी-गॅराडला मात्रं तो पुन्हा दक्षिणेकडे येणं टाळण्यासाठी सबब शोधतो आहे अशी पक्की खात्री वाटत होती !
स्कॉटच्या तुकडीची अवस्था आता गंभीर झाली होती. हिमवादळाचा जोर वाढतच होता. तापमान -४५ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं.
मिसळपाव
