Skip to main content

मँगो केक (ईन प्रेशर कुकर)

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 25/05/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
Cake 1 साहित्यः १. मैदा - १ कप २. बटर - १२० ग्रॅम ३. ४ हापुस आंब्याचा पल्प ४. व्हॅनीला ईसेन्स - १ चमचा ५. बेकिंग पावडर - १/२ चमचा ६. बेकिंग सोडा - १/२ चमचा ७. मुठभर काळ्या मनुका ८. साखर (आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त) कॄती: १. रिकाम्या कुकर मधे खाली तळाशी मीठ घाला व वरुन तरतं झाकण थेवुन मंद आचेवर प्रीहिट करत ठेवा.

एका इन्टर्प्रीटेशन चा बेस डेटा...

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 25/05/2014 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर हा डेटा बनवणं हे काही फार मोठे काम नव्हते. न्यू जोईनीज साठी एक इन्टर्नल प्रोजेक्ट असावा ज्यामुळे त्यांच्या अ‍ॅबीलीटीज एन्हान्स करता येतील या विचाराने हा प्रोजेक्ट घेतला होता. तो इन्टर्नल होताच पण त्याचबरोबर जमले तर कोणत्यातरी क्लायन्टच्या गळ्यात मारायला उपयोगी येणार होता. हे नेहमीचेच. न्यू जॉईनीज कडून विदाउट बिलींग प्रोजेक्ट करुन घ्यायचा आणि तो सेल करताना ऑप्टीमम रीसोर्सिंगच्या नावाखाली मोठे प्रॉफिट दाखवायचे आणि बी यू चा कागदी प्रॉफिट ग्राफ वर न्यायचा. ही पॉलीसी खरे तर अब्राहमची. नवी पोरे कामाला वाघ असतात. डाटा एन्ट्रीचे कंटाळवाणे रटाळ ते सुरवातीला अगदी आनंदाने करतात.

राजमाची उन्हाळी भटकंती: २

लेखक कंजूस यांनी रविवार, 25/05/2014 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
राजमाची उन्हाळी भटकंती: १ चार वाजले होते आणि गार वाऱ्याने बरे वाटले.इथे डावीकडच्या मनोरंजनच्या पायथ्यात कोणी घर /हॉटेल बांधले आहे. सरळ पुढे खाली करवंदीच्या जाळ्यांतून पंधरा मिनीटात उधेवाडी या गडावरच्या गावात आलो. उधेवाडी गावात तशी पन्नासच्या आत घरे आहेत.जानोरे यांच्या हॉटेल शिरिष मध्ये पडवीत बैग टाकली तेव्हा साडेचार वाजले होते.मालकांनी हसून स्वागत केल.ओळखतात."बऱ्याच दिवसांनी आलात?"तसा मी गेल्या दहा वर्षात सहावेळातरी इथे आलोय.लगेच पाणी आणले .चहा घेतला.पावसाळ्यात खूप गर्दी असते.पुण्याकडचे पर्यटक शनिवारी पाचनंतर निघतात आणि {खंडाळा कुणे गाव/लोणा

थांबा आणि वाट पहा !

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 25/05/2014 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा आणि वाट पहा ! भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा ! पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर

एक विलक्षण अनुभव

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 25/05/2014 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली. मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस.

सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 24/05/2014 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ =================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

तू मला वगळून उरणे शक्य नाही

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 24/05/2014 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
तू कुणावर प्रेम करणे शक्य नाही जन्मभर वणव्यात जळणे शक्य नाही तू सुखाच्या सोबतीने चाल राणी मी दगा दुःखास देणे शक्य नाही हे तुझे आंगण तुला लखलाभ आता ते पुन्हा केव्हा बहरणे शक्य नाही जीवना, हा छान बंदीवास आहे जो उभ्या जन्मात सरणे शक्य नाही मी सुगंधासारखा अस्थिर होतो मी तुझ्या हातात ठरणे शक्य नाही तू हवे तर आण उसनी चार दुःखे ती अशी आतून झरणे शक्य नाही .. तू कितीही बांध भिंती अस्मितेच्या तू मला वगळून उरणे शक्य नाही डॉ.सुनील अहिरराव

मला काही काळ शांती भेटली होती ……!

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 24/05/2014 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अचानक मला शांती भेटली …. रोहिणी हॉटेलच्या समोरून ती शांत पणे एकटीच चालली होती . तिला पाहून मी एकदम चमकलो ! शांती, आमची शाळेतील मैत्रिण ! नावाप्रमाणे शांत , शाळेत असताना सरळ मार्गी जाणारी, ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात , आपण बरे आणि आपला अभ्यास बरा. पण आज दिसलेली शांती एकदम वेगळीच वाटत होती शांते ए शांते , मी बिन्धास भर रस्त्यात तिला हाक मारली तिने मला पाहिले , अरे अमोल कसा आहेस ?

लटके आरोप ताठ मान !!

लेखक माहितगार यांनी शनिवार, 24/05/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मच्छरांनो :) ससुलापंत दिसतो कसा ? जजाने कोठडीत ठेवलाय जसा ! ससुल्या गडी करतो कडी, काढीन म्हणतो न्यायाची खोडी ! तुमचं न्यायालय हवं कशाला ? मी चावलो, तो गुन्हेगार झाला ! गुन्हेगाराला चावून, काय गून्हा केला ? प्रसिद्धीत रहायचय पुन्हा त्याला ! तक्रार यांची, त्यांचेच चूक चावल्याने भागते लालसेची भूक ! ससुलाल नाटक करतो छान, लटके आरोप ताठ मान !! :)
काव्यरस

तिहारी लावणी

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 24/05/2014 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
पक्षही हरला, मीही बुडालो, तरी मोडीत काढू नका! अन राया मला, जेलात धाडू नका... राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || गुरू अण्णांना उपासा बसविले, प्राण तयांचे पणास लाविले... साथ न देता लाभ उठविला कृतघ्न ठरवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका | अहो सख्या मला, जेलात धाडू नका || जने विश्वासली, दिल्लीची सत्ता, कशी राबवू, मला न पत्ता... खोटी आश्वासने, राजीनामा नाटक 'भगोडा' हिणवू नका... अन राया मला, जेलात धाडू नका || अहो सख्या मला, जेलात धाडू नका || सिंहासामोरी दंड थोपटले तरी तयाने मज दुर्लक्षियले, मिडियाशी बोंबललो तरीही गंगा न गिळे माझ्या चुका... अन राया मला, जेलात धाडू
काव्यरस