ड्रेस्डेन - प्राग - १
एखाद्या शहराला भेट द्यायची असं खूप डोक्यात असतं पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने जमत नाही. मग पुन्हा एप्रिल-मे महिन्यात लागून चार दिवस सुट्ट्या आहेत म्हणजे कुठेतरी जाऊ शकतो असा विचार मनात येतो. मग दोघांनाही दोन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं. हवामानाचे अंदाज घेत, हातातला वेळ आणि खर्च, आपल्याला काय बघायचं यावर चर्चा होतात. उन्हाळा सुरु होतोय, तेव्हा यावेळी शांत, रम्य अशा ठिकाणी जाऊया असे ठरते. पण नियोजन काहीच होत नाही. ऑफिस आणि इतर कामाच्या गडबडीत हे मागे पडते आणि म्हणता म्हणता सुट्ट्यांना अगदी एक आठवडा राहतो. आता आधी ठरवले होते त्या ठिकाणाची तिकिटे अशक्यप्राय महाग झालेली असतात.
मिसळपाव
२००४ साली UPA 1 आलं. मनमोहन त्याचे प्रमुख बनले. लोकांना फार आशा होत्या. बर्यापैकी शैक्षणिक करीयर आणि भूषवलेलं मोठं पद ही जमेची बाजू होती. पण शासनावर त्यांची किती पकड होती हा प्रश्नच होता.