Skip to main content

भविष्य (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 03/09/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत. अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच ! पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.'' ''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . '' ''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते! म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.'' ''नको. . . हिंदीत नको. '' ''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?'' ''छेछे , भलतंच काय?'' ''ठीकाय तुमची इच्छा!

केमिकल लोच्या

लेखक फुंटी यांनी बुधवार, 03/09/2014 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोण रे तू? मासाच्या गोळ्यात अडकलेला तू , त्या मांसाच्या फ्रेशनेस वर अवलंबून आहेत तुझी इथली वर्ष , बाकी नियती वगैरे सगळेच खेळ मासातल्या काही सूक्ष्म तंतूंचे अशाच दोन मांसाच्या गोळ्यांच्या असंख्य अदृश्य शक्तीपैकी एक सूक्ष्म अंश तू , कसल्या भ्रमाचे ,कल्पनांचे मनोरे नाचवायला निघालाहेस?? विश्व वगैरे अस काही नसत तुझ्या कवटीच्या बाहेर.... येडा कुठला ....

नाही देखिले पंचानना

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/09/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत.

आळस

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 02/09/2014 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस.

काळसारं (लघूकथा)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 02/09/2014 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
तिने आपले हात धुतले न्हाणीमध्ये, चुलीवर आमटी गरम करायला ठेऊन, बाजूला ठेवलेली भाकरी ताटात घेतली, जरा वेळाने गरम आमटी वाटीत ओतली आणि भाकरीचा एक तुकडा मोडून त्यात बुडवला. बाजूची चिमणी रॉकेल संपल्यामुळे मंद मंद होत वीजू लागली होती, एकदाची ती विजली, तिने खस करून चुलीतले जळते लाकूड बाहेर काढले, झोपडी अगदी लाल रंगात उजळुन गेली.. तिने आपले हात ताटात धुतले व धडपडत बाहेर आली. बाहेर गच्च अंधार पसरला होता, दूरवर कोठेतरी एखादा फड जळत होता! तिने आपले त्याच्याकडे पाहिले न पाहिले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली.. "शेण पडो, त्याच्या तोंडात!" आपली वळकट सरळ करून ती झोपी गेली. "अंग, रुक्मीअक्का..

मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 02/09/2014 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा नोड क्र. 28707 अन्वये समीरसूर यांचा मंदिर काढा.. एका प्रस्तावावर चर्चा चालू आहे. धार्मीकस्थानांच्या मर्यादांबद्दल त्या चर्चेत उमटणार्‍या सूरांपेक्षा माझा सूर काही निराळा असतो असे नाही. पण त्याचवेळी चुकत माकत का असेना भारतीय मंदिरांनी स्थानिक संस्कृतींच्या वैवीध्यपूर्ण जोपासनेत मोलाचा हातभार लावला आहे. अर्थात भारतात नवीन मंदिरे बनवण्यात फारसे काही नवीन साधेल असे नाही.

आदिकैलास ओमपर्वतदर्शन यात्रा पार्वती सरोवर परिक्रमाभाग-६

लेखक खुशि यांनी मंगळवार, 02/09/2014 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
पाचवा दिवस: सिर्खा ते गालागढ. १८ किमी. उंची ९५०० फूट आज अठरा किलोमीटरच जायचे असले तरी आजचा प्रवास खडतर आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताच उठलो. आज आम्हाला बेड-टी मिळाला होता. चहा घेतला आणि भराभरा सर्व आवरले. आज नाश्ता सोबत बांधून मिळणार होता, त्यामुळे बोर्नव्हिटा पिऊन नाश्त्याचे पार्सल घेऊन वाटचालीला सिद्ध झालो. सिर्खाला मुक्कामाचे तंबू हे डोंगरमाथ्यावर होते. त्यामुळे थोडे पुढे जाताच खडांज्यांचा (ओबडधोबड दगडी पायर्‍या) उतार सुरू झाला. रात्री पाऊस पडून गेला होता त्यामुळे चिकचिक झाली होती. जपून हळूहळू उतरावं लागलं. उतरलो कसेबसे.

मंदिर काढा..

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 02/09/2014 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे.

पार्ट टाईम जॉब - काँप्युटर वर फॉर्म भरणे (आणि बहुतेक नंतर फसणे.)

लेखक बबन ताम्बे यांनी मंगळवार, 02/09/2014 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीतील एका गृहस्थाने I Biz Infosys Private Limited या कंपनीचे कॉम्प्युटरवर फॉर्म भरण्याचे काम घेतले आहे. पार्ट टाईम जॉब म्हणून ! कंपनीचे ऑफीस पुण्यात आहे. स्कीम अशी आहे. पहील्यांदा २१५० रुपये भरून नोंद करावी लागते. मग कंपनी जुजबी ट्रेनिंग देते. दोन प्रकारचे फॉर्म भरायचे आहेत. स्मॉल आणि मेडीयम. १००० स्मॉल फॉर्म भरले तर ३ रुपये एका फॉर्मसाठी. १००० मेडीयम फॉर्म भरले तर ६ रुपये एका फॉर्मसाठी. असे हजाराच्या पटीत भरले तर जास्त इन्कम. फॉर्म फिलींग घरी बसून स्वतःच्या काँप्युटर वर करायचे आहे. १० महीन्यांनी काँट्रॅक्ट रीन्यु (?) करता येते. म्हणजे परत ५०० रुपये भरायचे.

वरुण राजाला साकडं

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/09/2014 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
(चुकीच्या विभागात कविता टाकली होती आणि त्यात चुका ही होत्या) श्रावण सगळा सरला टिपूस नाही पडला. बळीराजाच्या अश्रूंनी धरती जळून गेली. साकडं घातल इंद्राला वरुणराजा धावत आला वादळ फोडून पाऊस बरसला. गुरं-ढोरं पुरात गेली वाहून पीक सगलं खलास झालं बळीराजाच नशीब फुटलं. वरुण राजा तू तर देव आकाशाचा का वागतो लहरी सारखा? गत जन्मांच्या कर्मांचा का हिशोब घेतो आता? झाल्या चुका माफ कर कृपा कर पामरांवर साकडं घालतो तुच्या चरणी पुढच्या वर्षी तरी पाऊस पाड नेमान.
काव्यरस