Skip to main content

मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 15/03/2023 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले. पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्‍याची फोडणी. स्वाद चांगला होता. मुगाच्या डाळीत उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो.

तू जाताना...

लेखक Deepak Pawar यांनी बुधवार, 15/03/2023 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
अश्रू जरा ओघळले तू जाताना ना शब्द ओठी फुटले तू जाताना... जलप्रलय यावा तैसा पूर नदीला आभाळ ही कोसळले तू जाताना... ती रात होती पुनवेची तेव्हा ही का चांदणे ना पडले तू जाताना...? हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी ना फूल कोठे फुलले तू जाताना... उधळून जीवन गेले तेव्हा माझे वादळ जरासे उठले तू जाताना... ही वेस ओलांडूनी गेलीस तसे आधार सारे तुटले तू जाताना... दीपक पवार.
काव्यरस

शशक | नैवेद्यम

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी मंगळवार, 14/03/2023 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?” “टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम” “व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?” “आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?” “शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!” “पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?” “यु आर स्टील आफ्टर दॅट सिली शो? तुझे एम आय टी प्रेप क्लासेस नेक्स्ट वीक से शुरु होणार आहेत ना?

हळीवचे लाडू

लेखक Bhakti यांनी सोमवार, 13/03/2023 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहिलाच प्रयत्न आहे,योग आला म्हणून बनवले :).थंडीमध्ये हे मुख्यतः हे लाडू खाल्ले जातात.हळीव हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते.

माझी आवडती पुस्तके भाग: २

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 13/03/2023 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सर्वात आवडत्या पाच पुस्तकांबद्दलचा हा माझा दुसरा लेख आहे.. पहिल्या भागात मी दोन पुस्तकांबद्दल लिहिलंय, या भागात उरलेल्या तीन पुस्तकांबद्दल लीहतोय. पहिल्या भागाचा दुवा: माझी आवडती पुस्तके भाग: १ ३. एक होता कार्व्हर: हे पुस्तक व जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांची करुण व हृदयाला भिडणारी कहाणी अनेकांना वाईट काळात प्रेरणा देते.

माझी आवडती पुस्तके भाग: १

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 13/03/2023 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, परवा एका प्रश्न आणि उत्तर साईटवर तुमचे सर्वात आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न विचारला होता. त्यानिमित्ताने मी हा लेख लिहला होता. त्यामध्ये थोडेफार बदल करून तो मिपावर पोस्ट करतोय. तशी मी भरपूर पुस्तकं वाचली नाहीयेत पण फारच कमी वाचलीयेत असं पण नाही (अजुन बरीच पुस्तके वाचायची आहेत त्यामुळे मला स्वतःला नेहमी वाटत असतं की माझं वाचन अजुन खूपच कमी आहे.) आता त्या सगळ्या पुस्तकांमधून माझं सर्वात आवडत एकच पुस्तक निवडणं खूपच अवघड काम आहे.. खेळण्याच्या दुकानात सगळी आवडती खेळणी समोर पाहिल्यावर एखाद्या लहान मुलाची जी मनःस्थिती होते अगदी तशीच मनःस्थिती सर्वात आवडतं पुस्तक निवडताना माझीही होते.

दोन शशक- बटणाचा मोबाईल

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 13/03/2023 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
शशक१- बाबा, जाऊदेना तो जुनापुराणा बटणाचा मोबाईल आता?मी इकडे अमेरिकेत, तुम्ही काही इकडे यायला तयार नाही.आई गेल्यापासून मला सारखी तुमची काळजी लागून राहते. मी काय म्हणते? आजकाल सगळे म्हातारे लोक व्हाट्सअप वापरतात. व्हिडीओ कॉल करून मुला-नातवंडांशी छान बोलतात. तुम्हालाही मी इथून एक चांगला मोबाईल पाठवू का? हळू हळू जमेल तुम्हालापण. अग नको पोरी , मला काही ते समजत नाही. फक्त आलेला कॉल घ्यायचा किंवा कधीतरी कॉल करायचा इतकेच जमते ते बस आहे की. ते काही नाही बाबा.मी आता तुमचे काही ऐकणार नाही.पुढच्या आठवड्यात माझी मैत्रीण येणारे इंडियाला परत.

कलासक्त, संगीतप्रेमी, सौंदर्यासक्त रसिकांना 'बघण्याजोगे' बरेच काही... (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/03/2023 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापासून चित्रकला, संगीत, प्राचीन वास्तुरचना वगैरेंबद्दल यूट्यूबवर अनेक उत्तमोत्तम विडियो मी बघत आलेलो आहे. रसिकांकांसाठी ते हळूहळू इथे देत रहाण्यासाठी हा धागाप्रपंच करीत आहे. रसिक मिपाकरांनी त्यात आपापली भर टाकत राहून हा धागा समृद्ध करत रहावे, अशी विनंती करतो. सुरुवात पंडित मुकुल शिवपुत्र यांनी गायलेल्या 'जमुना किनारे मेरो गाव' या पारंपारिक रचनेने (ठुमरी ?) करतो. पं. कुमार गंधर्व, प्रभा अत्रे, राहुल/वसंतराव देशपांडे इ.