Skip to main content

द्वारकाधीश

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 22/04/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
मन श्रावण ओला, मन यमुनेचा तीर मन स्वैर पाखरू घुमणारे भिरभीर मन लहर जळाची उसळे व्यर्थ दहादा मन वृन्दावानिची अबोल वेडी राधा मन मागे पडले खिन्न आर्त गोकूळ मन माय एकटी अधिर, विरह-व्याकूळ मन क्षीर शुभ्र, मन फुटलेला घट ओला मन मोरपंख केसात जुना रुजलेला मन वेडा कान्हा, मन ओला घननीळ मन सांज केशरी, मन वेळूची शीळ मन अथांग सागर, मन तुटलेले पाश मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश... अदिती जोशी
काव्यरस

महात्मा घेता का ,महात्मा ??

लेखक नितिन शेंडगे यांनी बुधवार, 22/04/2015 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल आरक्षण विषयी ची बातमी दर दोन दिवसाआड येते . कितीतरी संघटना, पक्ष त्यावर भांडत असतात. हे सगळे चालू असताना कुणी त्यांची पत्रक किंवा जे ब्यानर लावले जातात त्या कडे पाहिले आहे का ? कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र त्यावर असते. त्याचा अर्थ काय ? आज आपण कितीही पुढे गेलो तरी काही राजकीय पुढारी आणि समाजातील स्वताला श्रेष्ठ समजणारी माणसे आपल्याला जाती आणि धर्मा मध्ये वाटून टाकतात . कितीतरी मोठ्या व्यक्तींना ह्या लोकांनी एखाद्या जाती आणि धर्मामध्ये अडकवून ठेवले आहे. आणि आम्हीपण ते मान्य केले आहे . खाली काही उदाहरणे देत आहे, छत्रपति शिवराय : मराठा महात्मा फुले : माळी डॉ .

तिची ओळख

लेखक अभिशेखि यांनी बुधवार, 22/04/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
“वैनी , नमस्कार.!!!” म्हणत ५-१० कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येउन स्थिरावला. वहिनींनी सुद्धा हसून नमस्कार केला. “दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका” असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात न्यायला सांगून त्या दादांच्या बेडरूमकडे निघाल्या. दादांची तयारी पूर्ण होत होती. नेहरू जाकीटाचं शेवटचं बटन लावून त्यांनी हात पुढे केला. वाहिनी लगबगीने पुढे सरसावल्या. खणातून काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रुमालावर अत्तराचे दोन थेंब लावून त्यांनी तो दादांच्या हातात दिला. “बाहेर कार्यकर्ते…. ” वाहिनीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दादा बेडरूमबाहेर पडले होते.

अकादमी 8 :- ऑब्स्टकल आणि रूटमार्च

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी बुधवार, 22/04/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
अकादमी मधे प्रवेश करून आता नऊ महीने झालेले. पासआउट परेड उर्फ़ पीओपी साठी फ़क्त दोन महीने उरले होते. आता नवीन काही शिकवत नव्हते , फ़क्त जे काही शिकलोय त्याची तंगड़तोड़ प्रैक्टिस चालली असायची, आम्ही ओसी ही आता बरेच seasoned झालो होतो, आता वेध होते फ़क्त पीओपी चे, कारण त्या दिवशी आम्ही आमच्या घरच्याना भेटणार होतो, बरेचवेळी "पीओपी ला काय होईल??" ह्या विचारात मी अन माझे आसेतु हिमाचल जमलेले मित्र विचार करत असु. पीओपी च्या वेळी कोणाला काय काम मिळेल हे आम्ही बोलत असु.

‘ती’ चा प्रवास....

लेखक प्रियंका देसाई यांनी बुधवार, 22/04/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
चविष्ट स्वयंपाक बनवणारी ‘ती’, नटण्या-मुरडण्याची आवड असणारी ‘ती’, नवीन साड्या पाहून हरखून जाणारी ‘ती’, मुलाबाळांचं वात्सल्यानं संगोपन करणारी ‘ती’, काटकसरीनं संसार चालवणारी ‘ती’....वर्तमानपत्रातून, टीव्हीवरील बातम्यांमधून, मालिकांमधून अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून ‘ती’ आपल्याला नेहमीच भेटत असते. तिच्या वेगवेगळ्या रुपांमधून ‘ती’ उलगडत जाते. मीही अशाच ‘ती’ला भेटलेय, अगदी तुमच्या माझ्यासारखी सामान्य स्त्री. मात्र तिच्या असामान्य कर्तुत्वाने चारचौघींपेक्षा वेगळी असलेली ‘ती’. चविष्ट स्वयंपाक बनवायला ‘ती’लाही आवडतं पण कच्चं-पक्कं कसही दोन वेळा लेकरांच्या पोटात जाव ह्या प्रयत्नात ‘ती’ असते.

स्वप्नं विकणारा माणूस

लेखक अभिशेखि यांनी बुधवार, 22/04/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं. माणसामधलं हे वेड त्याने हेरलं होतं आणि ठरवलं होतं, आपण स्वप्नं विकायची. छोटी , मोठी , लोभस , गोंडस , कधी अतर्क्य तर कधी आवाक्यातली अशी सगळी स्वप्नं विकायची. स्वप्नं पाहणं खरंतर सोप्पं असतं. कधी झोपेत तर कधी जागेपणी आपण स्वप्नं पाहिलेली असतातच. पण आपल्याला पडलेलं प्रत्येक स्वप्न आपल्या आवाक्यातल असेलच असं नाही. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार स्वप्नं दाखवणं आणि विकणं तसं जिकिरिचच काम, पण ते त्याला जमायचं. लोकांची स्वप्नं म्हणजे त्याच्यासाठी रंगीबेरंगी फुगे होते. लाल ,गुलाबी , हिरवा , पिवळा अशा रंगांचे.

ऐक स्वखे : त्रिधारा भाग-२

लेखक नाखु यांनी बुधवार, 22/04/2015 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तू भाग १ हो मी वास्तूच (वास्तुपुरूष म्हणा की वास्तु देवता ते फार महत्वाचे नाहीये.) या स्वखी आणि स्व यांच्या संसाराचा मूक साक्षीदार (मूक कसा म्हणू मी, स्वखी बोलते माझ्याशी अगदी मनापासून, काळजी घेते) सुरुबातीला मी यांच्यासोबत फ्लॅट्मध्ये होतो साधारण २ वर्ष नंतर त्याने बंगला बांधला तिथे गेलो.

अष्टवृक्षासौभाग्यवती

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 21/04/2015 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या 'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद. झाड झाडांचे सहोदर.

गुजरात..........६.........द्वारका-कुसडी-पोरबंदर...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 21/04/2015 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात-१ गुजरात-२ गुजरात-३ गुजरात-४ गुजरात-५ नॅशनल मरीन पार्कला अदल्या दिवशी भेट देऊन आल्यावर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळची न्याहरी करून द्वारकेला जाण्यासाठी जामनगर सोडले. खंबालिया-भाटिया-कुरुंगा-द्वारका असा मार्ग होता. द्वारकेला पोहोचल्या पोहोचल्या रसभंग झाला. तेथे इतका कचरा होता की माझा फोटो काढायचा मुडच खलास झाला. जसे जसे आत जाऊ तसा कचरा वाढतच होता.

पाहून घे महात्म्या

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 21/04/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.

पाहून घे महात्म्या

पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते