Skip to main content

डिस्कशन महत्वाचा

लेखक काळप्रवासी यांनी बुधवार, 20/05/2015 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस एक विचार डोक्यात होता ,खुप सार बोलायचे असत ,पण ऐकून घेईल असा समोरच कोणीतरी असाव लागत. गूगल वर खुप सर्च केल,पण मराठी जनांशी चर्चा करण्यासाठी मिसळपाव सारखा कोणीच मिळाला नाही. एक अजुन विचार होता डोक्यात,आजकालचा जमाना whatsapp चा आहे,तर एखादा whatsapp ग्रुप का नसावा,फ़क्त एखादया खास विषयापेक्षा जनरल गप्पासाठी. काय बोलता ?

चिंब

लेखक अर्व यांनी बुधवार, 20/05/2015 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही नेईल काळजासी तो तुझा हात नाही एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही ईथे श्रावणाला आता धार नाही किती सरी जळाल्या वणवा वादळात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... मी एकला कुठेसा बाकावरी विसावे.. क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे... कमरेत वाकलेला वड उभा अंगणात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
काव्यरस

माहिती हवी आहे - राजस्थान, पंजाब भटकंती.

लेखक मोदक यांनी मंगळवार, 19/05/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. जुलैचा दुसरा आठवडा ते ऑगस्ट या दरम्यान कधीतरी ९-१० दिवस सुट्टी घेवून अमृतसर भटकण्याचा विचार सुरू आहे. सध्या ठरलेला आराखडा म्हणजे पुण्यातून अमृतसर पर्यंतचा रस्ता दुचाकीने पार करणे व जालीयनवाला बाग, वाघा बॉर्डर*, सुवर्ण मंदिर तसेच राजस्थानातील वाटेत असणार्‍या ठिकाणांना भेटी देणे इतकाच आहे. एकूण ३ दुचाकींवर ३ जण जाण्याचे ठरवत आहोत. पुणे - अमृतसर - पुणे असा साधारणपणे ४००० किमीचा संपूर्ण प्रवास दुचाकीनेच होणार आहे. साधारणपणे ६ दिवस संपूर्ण प्रवासात जातील व ४ दिवस अमृतसर व वाटेतली ठिकाणे बघण्याचे ठरवत आहोत.

टाटा स्कायची लबाडी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 19/05/2015 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज सकाळी टाटास्काय कडून १४०९३४०४९४ या फोनवरुन माझ्या लँडलाईनवर फोन आला.टाटा स्काय व्यवस्थित चालू आहे ना असे चारले. मी काही अडचण नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने जावेद अख्तर ॲक्टीव या बद्दल माहिती दिली. १०२ नंबर वर दिसते असे संगितले. मी ठिक आहे असे सांगितले. त्यानंतर मला एसेमेस आल तुमची विनंती पुर्ण करण्यात आली आहे व जावेद अक्तर ॲक्टीव्ह ४९/- प्रतिमहिना. इथे मी त्यांना चालू करण्याबद्दल काहीही सांगितले नसताना स्वत:च फोन करुन तुमचीच विनंती असल्याची बतावणी करुन आपल्या लबाडीयुक्त मार्केटिंगचे दर्शन घडवले. त्यांच्या वेबसाईट वर तक्रार करण्याची सोयच नाही.

कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 19/05/2015 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना वाचून त्याचं क्रोधाग्नीने काळीज पेटून उठतंय फास्ट समजूच शकत नाही तो, नराधमांची मानसिकता म्हणतो सरकारने करावी, स्त्राटेजी कायद्याची कठोर जास्त पर नही जानता वो, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट …. चरफडून मग तो म्हणतो, कारे महान कल्चरला बोल लावतो ? तुला माहित्येका, बलात्कार भारतापेक्षा इंडियात होतात जास्त तंग कमी कपडे जीन्स, उशिरापर्यंत बाहेर फिरणे हेची कारणे यामागील वास्ट चुकीचे बोल तुझे की, कल्चर इट स्त्राटेजी फॉर ब्रेकफास्ट ….
काव्यरस

मदत हवी आहे.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 19/05/2015 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com

किल्ले वसई दर्शन व अभ्यास

लेखक ganeshpavale यांनी मंगळवार, 19/05/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान मुंबई विभाग यांच्यावतीने किल्ले वसई दर्शन आणि अभ्यास मोहीम हाती घेण्यात आली. इतिहासाबद्दल अभ्यासू वृत्ती व्हावी व दिन शिवस्मरणात जावा यासाठी मुंबईजवळच आसलेल्या किल्ले वसई या जलदुर्गाची निवड करण्यात आली. चिमाजी आप्पा आणि त्यांचा अद्वितीय पराक्रम, शौर्याची गाथा आपल्याला माहित आहेच. पण त्यांची खुबी. आणि लढाई कौशल्य फारच कमी लोकांना माहित आहे. या किल्ल्याचा अभ्यास आणि ओळख नुसत्या भटकंतीतून होणे श्यक्य नाही. हे आम्हाला माहित होते म्हणूनच या किल्ल्यावर प्रचंड अभ्यास आणि संशोधन करणारे इतिहास संशोधक श्री.

म्हणी मॅन्चेस्टर युनायटेडच्या

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 19/05/2015 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा a मी मॅन्चेस्टर युनायटेड चा फॅन आहे. हे सांगितल्यावर आणखी प्रस्तावनेची आवश्यकता नाही असं समजतो. तर, प्रिमियर लीग २०१४-१५, त्यातील मॅन्चेस्टर युनायटेड चा खेळ, यश/अपयश, पुढील लीगच्या दृष्टीने वाटचाल, खेळाडू, इत्यादी विषयांवरचा हा माझा एक म्हणी टेक. आय मीन, फनी टेक. मराठी म्हणींमधून मॅन्चेस्टर युनायटेड कडे बघण्याचा प्रयत्न. पुढे वाचूनतुम्ही काही मत बनवण्याच्या आधीच सांगतो. आय बिलीव्ह इन वॅन हाल अँड द प्लेयर्स.

भारतीय शेती व्यवसाय

लेखक चिनार यांनी मंगळवार, 19/05/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने भारतीय शेती व्यवसाय ह्या विषयावर एक लेख लिहिला आहे. कृपया खालील दुवा तपासावा. लेख आवडल्यास त्या दुव्यावर प्रतिसाद द्यव ही विनंती. लेखात मांडलेल्या मुद्द्यांवर इथे चर्चा करायला आवडेल. http://prafulnikam.blogspot.in/2015/03/who-is-killing-our-farmers.html?…