बॉडीलाईन - ४
बॉडीलाईन - १, २, ३
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जार्डीनवर केलेला अखिलाडूवृत्तीचा आरोप मागे घेतल्याने ब्रिस्बेन आणि सिडनी इथे मालिकेतील उर्वरीत दोन टेस्ट खेळल्या जाणार हे निश्चित झालं.
अॅडलेड टेस्टच्या दरम्यान बिल वूडफूल आणि पेल्हॅम वॉर्नर यांच्यादरम्यान झालेली बोलाचाली वॄत्तपत्रांपर्यंत पोहोचवण्यात जॅक फिंगल्टनचाच हात असावा अशी बर्याच जणांची खात्री झाली होती. त्यातच अॅडलेड टेस्टच्या दोन्ही इनिग्जमध्ये फिंगल्टनला भोपळाही फोडता आला नव्हता.
मिसळपाव