Skip to main content

(वाया) (मयपूर कथा)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 04/08/2015 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
*** आमची प्रेर्ना शनिवारच्या रात्री मस्त तीर्थ-प्रसाद चापून, वाँकिंग झॉँबी मँरेथॉन करता करता साधारणपणे मला अर्ध्याएक मिनिटे (काल सापेक्ष असतो, चुभुघ्याद्या.) सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला हलविल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावंस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझ्या घशातून बाहेर यायला पहात आहे असे वाटत होते.

माया -२ (भयगुढकथा)

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 04/08/2015 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रा . नावाप्रमाणेच चंद्रासारखा मुखडा . का त्या मुख्ड्यावरूनच नाव ठेवलं गेलं होतं कुणास ठावूक .गव्हाळ रंग . टपोरे बोलके डोळे आणि लांब केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते . तेवढ्याच भांडवलावर तिला पहिल्यांदा पाहताच राजीव ने आपली संमती कळवून टाकली . राजीव हि चांगला देखणा होताच . बाकी कुठल्याच गोष्टीत दोघांच्यात साम्य नवतं . चंद्रा उत्साहित , बडबडी, थोडीशी बालिश तर राजीव अबोल . कामापुरतं बोलणारा . एखाद्या दिवशी हसला तर आज सुर्य कुनिकड उगवला असा प्रश्न पडायचा सावित्रीला . थोडासा तिरसटच . राजीव च्या घरची परिस्थिती चांगली होती .तर चंद्रा गरीब .

[शतशब्दकथा स्पर्धा] लोकमान्य

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 04/08/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे.

[शतशब्दकथा स्पर्धा] बंटी आणि भोलू

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 04/08/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
बंटी ससुल्या आणि भोलू माकडोबा एकमेकांचे जिवलग मित्र. बंटी तिथे भोलू हे सगळ्या जंगलाला ठाउक होते. बंटी कोवळी गाजरे तोडत असला की भोलू झाडावरुन आजूबाजूला लक्ष ठेवायचा. जरासा धोका दिसला तरी बंटीला सावध करायचा. काळू कोल्हाने बंटीला पकडायचे अनेक प्रयत्न केले होते. प्रत्येकवेळी भोलू मुळे बंटी त्याच्या तावडीतून अलगद निसटत असे. एकदातर काळू पानांचा अंगरखा घालून बंटीच्या वाटेवर दबा धरुन बसला होता. बेसावध बंटी काळूच्या तावडीत जवळजवळ सापडणारच.... तेवढ्यात.... भोलूने झाडावरचा एक मोठा पेरु काळूला फे़कुन मारला. काळू दचकला.... तेवढ्यात बंटी तिकडून निसटला.

बाया (मयगुढकथा)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 04/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
* संपूर्णपणे काल्पनिक ** कमकुवत मनाच्या लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. *** आमची प्रेर्ना रविवारच्या दुपारी मस्त मटण चापून, वाँकिंगडेड मँरेथॉन पाहता पाहता साधारणपणे मला अर्ध्याएक तासाने सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला धरल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझा गळा आवळल्या सारखे वाटत होते.

[शतशब्दकथा स्पर्धा] अर्थस्य पुरुषो दासः

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 04/08/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल पण परत सतराव्यांदा का अठराव्यांदा त्यांचा फोन आला.तसा तो गेल्या आठवड्यापासून येत होताच.पण गेले ३-४ दिवस मात्र त्याची वारंवारता वाढली होती. त्यांच्या राज्यातील, आमच्या नविन कामासाठी, त्यांचे पण काही मजूर घ्यावेत, अशी त्यांची विनंती होती. हप्ता हेच त्या मागचे खरे कारण. शेवटी आजच काय तो सोक्ष-मोक्ष लावावा असा मी निर्णय घेतला आणि त्यांच्या बरोबर आजची भेट नक्की केली. मजूर आम्हाला नकोच होते पण त्यांना काहीतरी चिरीमिरी द्यायलाच लागणार होती.ते माझ्याच जाती-धर्माचे असल्याने, कंपनीने तडजोडीची जबाबदारी माझ्यावरच सोपवली. हो नाही करता, ५०,०००/- रु.

[शतशब्दकथा स्पर्धा] माफी

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 04/08/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन सकाळीच करून झालं होतं . दुपारी जेवण झाल्यावर तो निघणार होता त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जायला .रात्रीच्या जागरणाचा त्रास व्हायचा म्हणून तो दिवसाच प्रवास करायचा . पण अनेक वेळा होतं तसं आजहि नवरा बायकोचं भांडण झालं. भांडणाच्या नादात त्याची गाडी चुकली. मग पुन्हा दिवसभर धुसफूस. बायकोने जाऊच दिलं नाही . त्याने मनातल्या मनात बायकोला शिव्या घातल्या . (तोंडावर घालता येत नव्हत्या ;-) ) जावूदे २ दिवसांची राजा टाकता येईल . तोपर्यंत होईल शांत . मग जावू. असा विचार करत तो रात्रीचा बिछान्यावर पडला . सकाळी चहा पिताना हातात वर्तमानपत्र घेतलं .पहिल्याच ठळक मुख्य बातमीवर नजर गेली .

कळी

लेखक आनंदमयी यांनी मंगळवार, 04/08/2015 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
वसंत आला, नटली धरती, सुखे बहरल्या तरु-वेली पानांआडून अवघडलेली एक कळी का रुसलेली ? हर्ष बहरतो फुलांफुलांवर सुगंध उधळीत बेभान सतरंगी ही फूलपाखरे गाती गंधित मधुगान सोन सकाळी ह्या वेलींवर भृंग गुंफती सूर किती.. पानांवरती होवुन मोती दवबिंदू हे लखलखती देव उभ्या ह्या दिव्यत्वाला तेज अर्पितो सोनसळी, आणिक येथे बावरलेली झुरते का ही एक कळी?
काव्यरस

अव्यक्त

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 04/08/2015 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
कितीदा तरी रे आले होते, खूण ओळखीची शोधत होते, नाहीच झाली पण भेट आपली, मी उम्बर्यातच थिजले होते. किती जपून आणले शब्द होते, तुझ्या ओंजळीत ते द्यायचे होते, मौनात वेदना डोळ्यांत विझल्या, शब्द कधीच रे निसटले होते. किती अंतर चालून आले होते, आता कुठे बघ विसावले होते, दिशा साऱ्या का अंधारून आल्या, की गावच तुझे बदलले होते. अस्पष्ट जे मनास स्पर्शुन गेले होते, मूर्त रूप मी त्याला देत होते, कधीच नाही केले व्यक्त तू ज्याला, ते अव्यक्त प्रेम माझे आयुष्य होते.

क्रिकेट ते कबड्डी...

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 04/08/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
शाळकरी वयापासून कबड्डी आणि खो-खो हे माझे आवडते खेळ. क्रिकेटची मात्र पराकोटीची नावड. इतकी पराकोटीची की घरात कोणी क्रिकेटची मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टीव्ही बंद करायला लावायचे. तेंडुलकरमुळे क्रिकेट आवडू लागलेल्या वर्गात मी होते, आहे. त्याची खेळतानाची देहबोली, शांत स्थिर नजर आणि शब्दाला शब्द न देता कृतीतून प्रत्युत्तर देण्याची पद्धत. मग माझंच वागणं इतकं बदललं की असलेला अभ्यास बाजूला ठेवून, चक्क रात्री जागून मॅच बघू लागले. कधीतरी मी आणि धाकटा भाऊ रात्रीचे जागे राहून मॅच बघत बसलेले असायचो. ती संपता संपता आपली गाडी गडगडायची.