Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] बंटी आणि भोलू

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 04/08/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
बंटी ससुल्या आणि भोलू माकडोबा एकमेकांचे जिवलग मित्र. बंटी तिथे भोलू हे सगळ्या जंगलाला ठाउक होते. बंटी कोवळी गाजरे तोडत असला की भोलू झाडावरुन आजूबाजूला लक्ष ठेवायचा. जरासा धोका दिसला तरी बंटीला सावध करायचा. काळू कोल्हाने बंटीला पकडायचे अनेक प्रयत्न केले होते. प्रत्येकवेळी भोलू मुळे बंटी त्याच्या तावडीतून अलगद निसटत असे. एकदातर काळू पानांचा अंगरखा घालून बंटीच्या वाटेवर दबा धरुन बसला होता. बेसावध बंटी काळूच्या तावडीत जवळजवळ सापडणारच.... तेवढ्यात.... भोलूने झाडावरचा एक मोठा पेरु काळूला फे़कुन मारला. काळू दचकला.... तेवढ्यात बंटी तिकडून निसटला. काळूला झाडावर चढता येत नसल्याने काळू भोलूला काहिही करु शकत नव्हता. एकदिवस काळूला एक नामी संधी मिळते......... पैजारबुवा,

वाचने 3529
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by जडभरत

एका महिन्यात, "मी पहिला" पर्यंत प्रगती..... मस्त..... (कधी काळी "मी पहिला" ह्या संस्थेचा सभासद असलेला) मुवि (परत एकदा "मी पहिला" ही टाइमपास आणि कुणाच्याही इगोला धक्का न देणारी, चळवळ सुरु करावी का?)

भाग जरा लवकर येवू द्या.

ही कथा वाचून मला अजून एक प्रश्न पडला क्र. १. काळू बंटीला पकडण्यात यशस्वी होतो का ? २. (शशक वाचण्यापुर्वीचा १ क्रमांकाचा प्रश्न ) कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं ???

अरे व्वा.. हा पण एक मस्त प्रकार आहे..

प्रयत्न आवडला. पण पहिली कथा सुद्धा स्वतंत्रपणे एक कथा असायला हवी ना? सिक्वल नाही आला तरीही..

+१ आवल्ली..!!

+१ प्रकार आवडला. शेवट "काळूला संधी मिळते" असे नसते तर कथा जास्त आवडली असती.

चंपक किंवा ठकठक अशा मासिकांमधल्या कथा लहानपणी वाचल्या होत्या, त्याची आठवण झाली. लहान मुलांच्या लेव्हलला जाऊन त्यांना गुंगवणारी कथा लिहिणे म्हणजे गंमत नाही.

बाकी कथा आवडली!

आवल्लीच +१

आवडली. आमच्या गणूला वाचायला एकदा दिली पाहीजे.