Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा]जगणं

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 05/08/2015 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच लवकर उठलो. खबदाडीमधून किलकिल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं.रात्रीच्या प्रकाराची कुठलीही खूण आजूबाजूला दिसत नव्हती. काल तो जमाव हातात काठ्या-दगड घेऊन मागे लागला होता.त्यांच्या हाती सापडलो असतो तर तिथेच ठेचलं असतं त्यांनी…. थोडीशी भूक लागली होती म्हणून एक पाव पळवला दुकानातून. कुठूनसं आणलं गेलं होतं इथे... तो बरोबर असताना असं नव्हतं… हेच लोक माझ्यावर खूष असायचे. अर्थात तो काही सरळपणे देत नव्हताच मला.तो म्हणेल तसंच वागायचं…कंटाळलो सगळ्याला …. पळून जावंसं वाटलं म्हणून पळालो…अजूनही पळतोय …पण जाऊ तरी कुठे? आता तो भेटेल की नाही देव जाणे… अरे…हे समोर काय दिसतंय ?

[शतशब्दकथा स्पर्धा] कातरवेळ

लेखक रातराणी यांनी बुधवार, 05/08/2015 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
अख्ख्या दिवसभरात तिची आवडती वेळ दिवेलागनीची. कातरवेळ. कधी रिकाम्या हाताने न येणारी. कधी कटू कधी गोड आठवणी सोबत आणणारी. कधी खूप त्रागा व्हायचा पण तरीही वाट पहायची रोजच. मैत्रीणच वाटायची तिला. आजसुद्धा न चुकता आलीच संध्याकाळ. तशी हुरहूर होतीच आधीपासून. पण आज तिनं निर्धार केला,नाही सोडवत बसायचं कुठलाच गुंता. तिन्हीसांजेला सांगितलं, बाई आलीस तशी चार घटका बस पण आज काही तुझा पाहुणचार करायला मला वेळ नाही. सांज म्हणाली..

[शतशब्दकथा स्पर्धा] बॉक्सर

लेखक यमन यांनी बुधवार, 05/08/2015 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरलो की बाप दात ओठ खाऊन हाणायचा. त्याच्या पुढे इतर स्पर्धकांचा मार काहीच वाटायचा नाही . बाप स्वतः नावाजलेला बॉक्सर ;त्याच्या मते तो पोराला घडवत होता . आजचा सामना महत्वाचा होता ;बापानी खूप पैसे लावले होते . हारून चालणार नव्हते . पहिल्या राउंडला लीड घेतलं ;पण समोरच्याला मारताना ताकतच येत नव्हती . समोरचा चेवून हाणत होता, बापासारखाच . मी गुमान मार खात होतो . बाप खूष .त्याचा रेट वाढत होता . मी जिंकणार हे त्याला नक्की माहित होते . आणि एकदाचा वार जिव्हारी लागला आणि मी कोसळलो . थडग्यात आई शेजारी शांत पहुडलोय .माझ्याकडे आई कौतुकानी बघतेय ….

जोर का झटका धीरे से लगे

लेखक तुडतुडी यांनी बुधवार, 05/08/2015 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरच्या कोपऱ्यावर अचानक ती त्याच्या समोर आली .गेल्यावेळच्या भेटी नंतर आज कितीतरी दिवसांनी ते दोघं भेटले . टंच बांधा , सुंदर गोरा मुखडा . टपोरे बोलके डोळे सौंदर्य खुलवत होते . त्याच्या एका झलकेसाठी ती आसुसलेली असायची . त्याचा स्वभाव , त्याचा रुबाब , त्याचं भरदार शरीर , सगळ्याच गोष्टींनी त्याच्यासाठी वेडी झालेली . पोरं हिच्यावर आणि पोरी त्याच्यावर जीव टाकून असायच्या .पण दोघंही कोणाला दाद देत नव्हती .तिला तोच हवा होता . त्याला समोर बघून तिच्या काळजातली धडधड वाढली .मादक नजरेत आव्हान देत ती त्याच्याकडे पाहत होती .त्याच्या स्मितहास्याने मनात कारंजी उडू लागली .

जडण घडण - २६

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 05/08/2015 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
संपर्क कायम आहे आमचा पण अर्थात विलंबित लयीत. आता भेटायची इच्छा अजिबातच नाही. ते दु:खं तसंच, तिथेच गोठलंय. समोर उभ्या समस्येला पाठ दाखवणं मान्य नव्हतंच कधी. मग जे घडलं, ते स्वीकारलं गेलं. संसाराची गाडीही रमतगमत चालली होती. कधी हसत, कधी रडत, चिडवत,रूसत असं चारचौघांसारखं सुरू होतं. भूतकाळ प्रत्येकाला असतो, असं सांगणाऱ्या नवऱ्याने लग्नानंतर आवर्जून सांगितलं होतं, मला खूप बहिणी, वहिनी, मित्रमंडळी आहेत आणि मी त्यांची वाट्टेल तशी मस्करी करत आलोय आजवर. खूप जणांचं लक्ष असेल आपल्याकडे. माझं नाव काहींशी जोडलं जाईल किंवा आणखी वेगळ्या प्रकारे तुझी मस्करी केली जाईल.

Stock (शतशब्दकथा स्पर्धेसाठी नाही

लेखक कहर यांनी बुधवार, 05/08/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
३१ जुलै २०१५ चंदू: "काही नवीन stock आहे का रे?" नंदन: "नाही यार" चं: "तुझ्याकडे नाही म्हणजे विशेष आहे?" नं: "अरे काल बाबांना मस्त २mbps चे नेट connection घ्यायला लावले प्रोजेक्ट च्या नावाखाली. उद्या चालू होतंय. आता Stock ठेवायची गरज नाही. रिस्क कोण घेणार? आता onlineच बघायचे फक्त. नवीन नवीन. without buffering दन दन दन " चं: "मजा आहे यार तुझी आम्हाला पण बोलाव कधीतरी" नं :"नक्की. आज रात्रीच सगळा जुना stock उडवणार. नही चाहिये वो पुराना सडेला माल." १ ऑगस्ट २०१५ नं :"यार काही stock आहे का 'पहायला'?" चं: "नवीन काही नाही रे तेच सगळे जुने" नं : "चालेल दे"

[शतशब्दकथा स्पर्धा] अंतर

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 05/08/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात? हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना. अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं.

[शतशब्दकथा स्पर्धा] बंदी

लेखक सनईचौघडा यांनी बुधवार, 05/08/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
पारावर चार म्हातारी टकुरी काय ती असायची. पन कालपास्नं सरकारनं निर्णय घेतल्यावर गावतली तरणीबी जमा होवु लागली. शिरप्या:- इच्चीभनं त्या सरकारच्या... झिपर्या:- सालं आमची मजा सरकारला बगवली नाय... मंद्या:- येकदम ८५७ साईटा बंद. पर काल आल्तं पेपरमंदी साईटा पुन्हा चालु झाल्याती. गणप्या:- म्या म्हंतु आपन तालुक्याला जावुया.. शिरप्या:- कश्यापाई ? गणप्या:- काय ते म्हंतात न्हवं माहिती अधिकार. सगली माहिती म्हंने जगतेला द्यावी लागत्ये. मंद्या:- मंग तु काय इचारनार? गणप्या:- माजं ठारलं. म्या निंघालो. शिरप्या:- आरं तु काय इचारनार पन? गणप्या वराडला " लई कंटाळा आलाय त्याच त्याच साईटा बगुनशान.

[शतशब्दकथा स्पर्धा] तो

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 05/08/2015 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तो शिखर नजरेच्या टप्प्यात...रस्तासुध्धा माहित झालेला...प्रतिस्पर्ध्याला खिजवून शिखर सर करणार...गेला महिना मीच गाजवलेला...आजसुध्धा सगळे उन्मादात...त्याला बाजूला मीच करणार...अरे अरे हे काय...माझ्यावर दादागिरी...बघू किती दम आहे...स्साला परत माझ्याशी पंगा...याच्याकडे बघतोच परत तूर्तास त्याच्या पार्टनरला कोपच्यात घेऊ...हाहाहा...बघ तुझे साथीदार कसे नांगी टाकत आहेत...आता तुझी पाळी...थाड...थाड...थाड...आपल्यातले कोणीही जागचे हलले सुध्धा नाही...पार भंजाळलोय...आकाशातल्या बापाची वेळेवर मदत आली...आता या वादळात कसला टिकतोय तो...आम्ही चिरडणारच त्याला...थाड...थाड...थाड... एक सूर्य

शिर्षकविहीन -सिक्वल (स्पर्धेकरीता नाही)

लेखक चिगो यांनी बुधवार, 05/08/2015 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन ************************************************************************************************* आज चार आठवड्यांनी तो परत येत होता. ह्या काळात 'कधी, काय करायचं' ह्याच्या हजारो रिहर्सल्स झाल्या होत्या त्याच्या मनातल्या मनात.. तीची प्रतारणा आठवून एसीतही डोकं तापलं त्याचं.. तिची रक्ताळलेली धडपडदेखील डोळ्यांसमोर नाचून गेली. कासावीस झाला तो.. ..पण सगळं सेट होतं ! आणखी आठवड्याभरात 'मिसींग कंप्लेंट' द्यायची. मग एक निनावी फोन.. बॉडी सापडेलच.. इन्श्युरन्स क्लेमचं घबाड. लाईफ सेट है, बॉस ! ...बेलच्या आवाजानं तंद्री भंगली त्याची.