Skip to main content

जोर का झटका धीरे से लगे

लेखक तुडतुडी यांनी बुधवार, 05/08/2015 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरच्या कोपऱ्यावर अचानक ती त्याच्या समोर आली .गेल्यावेळच्या भेटी नंतर आज कितीतरी दिवसांनी ते दोघं भेटले . टंच बांधा , सुंदर गोरा मुखडा . टपोरे बोलके डोळे सौंदर्य खुलवत होते . त्याच्या एका झलकेसाठी ती आसुसलेली असायची . त्याचा स्वभाव , त्याचा रुबाब , त्याचं भरदार शरीर , सगळ्याच गोष्टींनी त्याच्यासाठी वेडी झालेली . पोरं हिच्यावर आणि पोरी त्याच्यावर जीव टाकून असायच्या .पण दोघंही कोणाला दाद देत नव्हती .तिला तोच हवा होता . त्याला समोर बघून तिच्या काळजातली धडधड वाढली .मादक नजरेत आव्हान देत ती त्याच्याकडे पाहत होती .त्याच्या स्मितहास्याने मनात कारंजी उडू लागली . अधिरतेने त्याच्याशी बोलण्यासाठी ती रसरशीत ओठ उघडणार तोच . . . . . . . . . . हात जोडून "जय बजरंगबली " म्हणून तो तिथून निघून गेला .

वाचने 2997
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by तुडतुडी

तुमचीच कथा आहे ही.. स्वताच काय पाठ थोपटून घेताय ? बाकी कथा आवडली.. इनोदी हाये ,.. :) +१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१ आवडली..