तव्यावरचा शेंगदाणे-मिरचीचा झटपट ठेचा
जिन्नस
सात-आठ मिरच्या
मूठभर शेंगदाणे
लसणाच्या चार-पाच पाकळ्या
जीरे
दोन चमचे तेल
कोथिंबीर, मीठ
मार्गदर्शन
- प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
- लसूण पाकळ्या चिराव्यात.
- तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
- ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे.
मिसळपाव