Skip to main content

कण्याचा धड़ा

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 07/09/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
-----------------कण्याचा धड़ा--------------- "26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा." सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा. पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे. 12वीत गॅप घेतलेला.

मोकळा आहे तरी ना मुक्त मी...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 07/09/2015 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास आहे घास नाही कोरडे नि:श्वास केवळ भाकरीचा चंद्र नाही, चांदण्याचा भास केवळ साव म्हणती, चोर म्हणती, ढोरही म्हणती कुणीसे माणसाची जात माझी, दांभिकांचा फास केवळ मिरग गेला हस्त गेला पांढरीला ओल नाही धान नाही पेरणीला, पावसाची आस केवळ प्राक्तनी सगळ्या जिवांच्या शेवटी मातीच आहे मोह संपे ना तरीही, खेळ 'त्याचा' ख़ास केवळ खोल नांदे जखम ओली वेदनेला अंत नाही मोकळा आहे तरी ना मुक्त मी... आभास केवळ अंतरीचा रामराया शोधिसी का एकट्याने? सोड आता नाद वेड्या, वेच थोडे श्वास केवळ विशाल ५/०९/२०१५
काव्यरस

कुठे भटकशी वरुणराजा!

लेखक Hrushikesh Marathe यांनी सोमवार, 07/09/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश झाले कोरडे, सुकले त्याचेही नरडे, कुठे भटकशी वरूणराजा, पाऊस इथे का न पडे. धरतीची दशा ही सुन्न, दाही दिशाही खिन्न, कुठे भटकशी वरूणराजा, कधी होशील तु प्रसन्न. तुझ्या आगमनाची आस, शेते पडली ही ओस, कुठे भटकशी वरूणराजा, घेऊदे मोकळा श्वास. भिजवुन टाक ही अवनी, आनंद पसरी या भवनी, दया करा हो वरूणराजा, भिक मागतो तुझ्या मी चरणी. ---- हृषीकेश ----

या पाच गोष्टी कोणालाही सांगू नयेत

लेखक हेमंत लाटकर यांनी रविवार, 06/09/2015 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील. 2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील. 3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील. 5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.

शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 06/09/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले.

द स्केअरक्रो - भाग ‍२४

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 06/09/2015 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २३ द स्केअरक्रो भाग २४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता आणि त्याच्या समोर असलेल्या मोठ्या स्क्रीनकडे बघत होता. जवळजवळ शंभर वेगवेगळ्या प्रतिमा त्याला समोर दिसत होत्या. इतक्या ठिकाणी त्याने कॅमेरे बसवले होते की त्यामुळे वेस्टर्न डेटाच्या इमारतीच्या आजूबाजूचा भाग आणि तिथपर्यंत येणारा मॅककेलिप्स रोडचा भाग या सगळ्यावर त्याला नजर ठेवता येत होती. त्यांना शोधायला त्याला वेळ लागला नाही. ते परत येतील याची तर त्याला खात्री होतीच.

बौद्ध दर्शन

लेखक शरद यांनी रविवार, 06/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
बौद्ध दर्शन खरे म्हणजे दर्शने हा काही वाचकप्रिय होण्यासारखा विषय नव्हे. त्या करिता एखादी जुनी, आपल्याला आवडलेली कविता घ्यावी, त्यात आपल्याला काय "भावले" सांगावे, मिपाकर (बहुधा पहिल्यांदीच वाचत असल्यामुळे असेल म्हणा वा सज्जन आहेत म्हणूम म्हणा !) "छान" म्हणतात, आपुन तरी खुष. दर्शनांचे तसे नाही. तो माझ्या आवडीचा विषय. पण डोके खाणारा. तेव्हा सुरवातीला विचार केला " लिहून तर बघू, १०० जंणांनी वाचला तर पुढे जावू, नाही तर दिले सोडून. सुरवातीचा प्रतिसाद सुखकारक वाटला म्हणून "तंत्रा" पर्यंत लिहले व थांबलो. थोडक्यात गोडी, एवढे नक्की कळते. नंतर आमचे मित्र श्री.

कोकणातील भटकंती.... माहिती पाहिजे....

लेखक बाबा योगिराज यांनी रविवार, 06/09/2015 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, पुढील महिन्याच्या १,२,३ आणि ४ तारखेस कोकणात फिरायला जायचा विचार आहे.... आम्ही दोघे आणि पिल्लू + साडूसाहेब, मेहुणी आणि त्यांच पिल्लू. १ तारखेला सकाळीच औरंगाबादवरुन निघून ४ तारखेला संध्याकाळी परत असा साधारण कार्यक्रम आहे.. मुक्काम नागाव (अलीबाग जवळ), कशिद या परिसरात करण्याचा विचार आहे. तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलय का?

कास्टीझम

लेखक कोमल यांनी रविवार, 06/09/2015 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्यादिवशी कॅफेटेरिया मधल्या सगळ्यांचे डोळे टीवी कडे होते. पटेल रॅली मुळे पेटलेला गुजरात सगळे भेदरलेल्या नजरेने पाहत होते. "का चालू झालंय हे सगळ पण?" तिने त्यांच्या टेबल वर विषय सुरु केला. "अरे पटेल कास्ट साठी आरक्षण पाहिजे म्हणे. तो म्हणतोय कि त्यांना द्या किंवा कोणालाच नको" त्याने माहिती पुरवली. "आणि त्याच्या साठी संपूर्ण गुजरातेत जाळपोळ सुरु झालीये" QA वाला म्हणाला. "कोणाचं काय जातंय तोडफोड केली आणि जाळपोळ केली तरी. भुर्दंड सरकारी तिजोरीला पडणारे आणि पर्यायाने आमच्या खिशाला. बर आठवलं टॅक्स रिटर्न फाईल करायचा आहे. आत्ता जाऊन करतो." TL उठला पाठोपाठ टीम पण उठली.

"येडाय का तु?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/09/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला. कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन. पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.